ग्राहक समाधानी असेल, तरच व्यवसाय मोठा होईल

गेल्या बऱ्याच काळात आपण पाहत आलो आहोत की अनेक उद्योजक काळानुसार आणि ग्राहकांनुसार वेगवेगळ्या प्रमोशनच्या पद्धती वापरत आहेत. त्याचप्रमाणे २०१८ मधे प्रचंड लोकप्रिय होत असलेली प्रमोशन पद्धत म्हणजे ग्राहकांना समाधानी आणि आनंदी ठेवणे.

आज भारतात सर्वच क्षेत्रांत स्पर्धा खूप वाढली आहे. त्यामुळे नवीन ग्राहक मिळवण्याशिवाय आहेत त्या ग्राहकांना समाधानी ठेवणेसुद्धा अत्यंत महत्त्वाचे झाले आहे.

एखाद्या उद्योगातून खरेदी करताना ते कोणत्या सोयीसुविधा पुरवतात हे आज सर्वच ग्राहक पाहू लागले आहेत. जर आपण त्यांना हव्या तशा सोयीसुविधा उपलब्ध करून देऊ शकलो, तर हे समाधानी ग्राहक आपल्याला त्यांच्या खरेदीतून नफा देतात, शिवाय ते आपले मोफत विक्रेतेसुद्धा होतात.

वर वर पाहता हे खूप साधे आणि सोपे वाटते, परंतु आज जर आपण ग्राहकांना नेमक्या कोणत्या सोयीसुविधा अपेक्षित आहेत हे पाहायला गेलात तर आपल्याला असंख्य उत्तरे मिळतील ज्यांचा ना आपण कधी विचार केला असेल, ना त्या आपल्या बजेटमध्ये बसणाऱ्या असतील. त्यामुळे आज आपण काही अशा गोष्टी पाहू ज्या कोणताही उद्योजक सहज अमलात आणून आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त आनंदी आणि समाधानी ठेऊ शकेल.

  • आनंदाने आणि आपुलकीने स्वागत करणे.
  • प्रत्येक ग्राहकाकडे वैयक्तिक लक्ष देणे.
  • ग्राहकांच्या जास्तीत जास्त प्रश्नांचे निवारण करणे.
  • वारंवार/ सामान्यपणे विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची सूची बनविणे. (FAQs)
  • ग्राहकांच्या अपेक्षेप्रमाणे शंकांचे निवारण करणे.
  • वेळेच्या आधी उत्पादन पुरवणे.
  • आपली चूक झाली असेल तर त्यावर पांघरूण घालत बसण्यापेक्षा ती मान्य करणे.
  • छोटी वस्तू घेवोत आथवा मोठी, प्रत्येक ग्राहकाला समान दर्जा देणे.
  • सणांच्या दिवशी ग्राहकांना शुभेच्छा देणे.
  • जे ग्राहक आपल्याकडून पुन्हा खरेदी करतील त्यांना काही सवलती देणे.
  • आपल्या उद्योगाच्या विविध कार्यक्रमांत ग्राहकांना आवर्जून बोलावणे.
  • ग्राहकांच्या फोन कॉल्सना उत्तर देणे आणि त्यांच्याशी आपुलकीने बोलणे.

याप्रकारे आपल्या ग्राहक आणि उद्योगानुसार अनेक छोट्या-छोट्या गोष्टींतून प्रत्येक ग्राहक आपल्याला किती महत्त्वाचा आहे हे जर आपण दाखवून देत राहिलात तर आजच्या स्पर्धेच्या युगात आपण नक्कीच इतरांच्या पुढे जाऊ शकाल.

– टीम स्मार्ट उद्योजक

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?