अनेक मानसिक त्रासांचा बळी पडू शकतो उद्योजक


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


व्यवसाय करायचे ठरवणे आणि तो प्रत्यक्ष सुरू करणे व चालवणे हे वाटते तितके सोपे नाही. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की ७२ टक्के उद्योजकांना मानसिक स्वास्थ्यासंबंधीत विकार जडतायत. जसे की डिप्रेशन, Anxiety ADHD, bipolar सारखे आजार डोकं वर काढत आहेत.

सध्या स्थितीत सोशल मीडियाचा प्रत्येक आयुष्यावर खूप जास्त प्रभाव आहे. उद्योजकसुद्धा याला अपवाद नाहीत. अनेकांचे स्वातंत्र्य, त्यांची उच्च जीवनशैली पाहून समाजात असा संदेश जातो की अगदी कमी वेळात एक उद्योजक हे मिळवतो अथवा उपभोगतो. खरं तर वास्तव मात्र यापेक्षा वेगळे असते. उद्योजकीय प्रवास हा फारच कठीण असतो.

सोशल मीडियावर जे दाखवले जाते, ते नेहमी एखाद्या व्यक्तीच्या वास्तविक जीवनशैलीचे चित्रण नसते. उद्योजकांना या गोष्टी स्वतःच्या मनाला सांगायला हव्यात की अनेक वर्षांच्या संघर्ष आणि आर्थिक त्रासानंतरच प्रत्येक क्षेत्रातल्या दिग्गजाना यश मिळाले आहे. ते सहज शक्य नाही. संघर्ष, त्रास आणि काळ हे प्रत्येक यशस्वी उद्योगामागचे रहस्य म्हणावे लागेल.

माध्यमांचा प्रभाव एवढा असतो की आजकाल उद्योजक होणे म्हणजे एखाद्या दुर्गम बेटावर जागे होणे आणि परदेशात खाजगी जेटने जाण्यापूर्वी काही ई-मेल पाठवणे अशी लोकांची धारणा असते. तर तसे न होता व्यवसाय हा दैनंदिन मिळणारे मानसिक समाधान असते.

नवीन तयार झालेला लहान व्यवसाय सुरुवातीच्या टप्प्यात वाढू शकत नाही किंवा पैसे कमवू शकत नाही. जर त्याच्या नेत्याकडे दिवसेंदिवस पिसण्याची ‘धडपड’ मानसिकता नसेल.

या व्यावसायिक प्रवासात आपले मानसिक स्वास्थ्याची काळजी आपणच घ्यायला हवी. धकाधकीच्या जीवनात आपण काही गोष्टींचे पालन करायला हवे, पण स्वत:चा व्यवसाय उभा करण्याच्या प्रवासात उद्योजक त्यांच्या मानसिक आरोग्याचे रक्षण करू शकतात असे काही मार्ग येथे आहेत.

आपली आर्थिक काळजी घ्या : जीवनाच्या कोणत्याही क्षेत्राप्रमाणेच, आर्थिक समस्या हे उद्योजकांमध्ये तणाव आणि चिंतेचे सर्वात पहिले कारण आहे. काही लोक आपली संपूर्ण आयुष्याची बचत स्टार्टअपमध्ये घालवतात. एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की लहान व्यवसाय मालक त्यांच्या कंपन्यांना निधी देण्यासाठी रोख वापरतात.

ही पद्धत काही लोकांसाठी काम करत असली तरी, पण इतरांच्या बाबत हे लागू होईल असे नाही. अशाने अनेक व्यवसाय धोक्यात येतात. स्टार्टअप व्यवसायात खूप तणाव असतो. कामाचा ताण जास्त असतो. ९० टक्के वेळा अपयशाची टांगती तलवार असते.

या काळात आर्थिक नियोजन नीट असायला हवे. म्हणजेच जेव्हा व्यवसायात उतार असेल तेव्हा घरखर्च कसा करावा हा ताण राहत नाही. गरज असेल तर सुरुवातीच्या काळात अर्धवेळ नोकरीचा विचार करा. एकूणच काय तर वैयक्तिक खर्चासाठी जेवढी शक्य असेल तेवढी आर्थिक तजवीज केलेली असावी.

– टीम स्मार्ट उद्योजक

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?