अभियांत्रिकी कौशल्य आणि वास्तुशास्त्र यांचा मेळ घालणारे दत्ता गोखले


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


वास्तुशास्त्र हे एक परिपूर्ण शास्त्र आहे. प्राचीन ऋषी-मुनींनी अफाट संशोधन-प्रयोग करून ते विकसित केले आहे. त्याचे नियम आजही लागू होतात. तेव्हा प्रत्येक व्यक्‍तीने या शास्त्राचा अभ्यास करावा. ते शक्य नसेल तर तज्ज्ञांचा सल्‍ला घेऊन आपले घर, कार्यालय, फॅक्टरी यांच्यात वास्तुशास्त्रीय दृष्ट्या आवश्यक ते बदल विना तोडफोड घडवावेत व आपले जीवन अधिक सुखी करावे, हे विचार आहेत कल्याण येथील सुप्रसिद्ध वास्तुतज्ज्ञ दत्ता मोरेश्वर गोखले यांचे.

शिक्षणाने इंजिनिअर असलेले दत्ता गोखले या विषयाकडे वळले ते अपघातानेच. पण नंतर त्यांना यात इतकी गोडी वाटली की ते वास्तुसल्‍ला सेवा हाच व्यवसाय करतात. ते वास्तुशास्त्राशी संबंधित अनेक वस्तु पुरवतात. विशेष म्हणजे त्यांनी आपले इंजिनिअरींगचे ज्ञान, टूलरुममधील अनुभव आणि तारतम्य यांच्या संयोगाने काही हॅण्डमेड पिरॅमीड उत्पादने विकसित केली आहेत.

त्यांचा वापर करणार्‍यांना आश्चर्यकारक परिणाम दिसून आले आहेत. कोणाचे थकलेले पैसे वसूल झालेत, कुणी आजारपणातून बरे झालेत, तर कुणाचे आर्थिक प्रश्‍न सुटले आहेत. दत्ता गोखले यांनी विकसित केलेली ही स्पेशलाइज्ड उत्पादने हीच त्यांची खरी ओळख आहे.

४ ऑक्टोबर १९५९ ला मुंबईत चेंबुर येथे जन्मलेल्या दत्ता गोखले यांचे कुटुंब पुढे कल्याणला स्थलांतरित झाले. बालवयातच त्यांचा संघपरिवाराशी व पुढे सोमैय्या पॉलिटेक्निकमधून मेकॅनिकल इंजिनिअरींगमधील डिप्‍लोमा करीत असताना कॉलेजजीवनतात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संबंध आला.

डोंबिवलीच्या स्टार टेक्सटाईलमध्ये टूल रुम इनचार्ज म्हणून नोकरी करीत असताना प्रबळ अंत:प्रेरणेने त्यांनी विद्यार्थी परिषदेच्या कामासाठी वाहून घेतले. पुढे पाच वर्षे ते नगर व जळगाव जिल्ह्यांत अभाविपचे पूर्णवेळ प्रचारक होते. नागरी जीवनात परत आल्यावर त्यांनी अनेक व्यवसाय केले. एकदा त्यांनी सहज म्हणून वास्तुशास्त्राचा एक सेमिनार अटेंड केला व त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली. या शास्त्राची त्यांना इतकी गोडी लागली की वास्तुशास्त्रासंबंधी अनेक कोर्सेस त्यांनी केले.


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


दत्ता गोखले मुळचे मेकॅनिकल इंजिनिअर. त्यामुळे वास्तुशास्त्रातील पिरॅमिड थेरपीत त्यांना विशेष रुची वाटली. या थेरपीच्या आधारे काही मित्रांना त्यांनी मोफत सल्‍ले दिले. त्याचे उत्तम परिणाम दिसून आल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला व त्यांनी लोककल्याणासाठी या शास्त्राचा प्रचार-प्रसार करण्यासाठी वाहून घेतले.

दत्ता गोखले यांनी आपल्या अभियांत्रिकी कौशल्याच्या आधारे विशेष प्रकारचे पिरॅमिड विकसित केले. ते आता अनेकांना लाभदायक ठरत आहेत. डिव्हाइन एंटरप्रायझेस या त्यांच्या कंपनीतर्फे ते घर, ऑफीसेस, प्‍लॉटस्, फॅक्टरीज यांचे वास्तुशास्त्रीयदृष्ट्या मूल्यमापन करतात. त्यांच्यातील दोष निवारण व नकारात्मक घालवण्यासाठी करण्यासाठी विनातोडफोड उपाय करतात.

ते काही ब्रॅण्डेड टोप्या वा कॅप्स बनवतात. त्यांनी मानसिक शांततेसाठी स्ट्रेस मॅनेजमेंट कॅप्स, उत्साह वाढण्यासाठी एनर्जी कॅप्स व विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागावे व जास्त मार्क मिळावे म्हणून स्टडी कॅप्स विकसित केल्या आहेत. त्यात त्यांनी कलर व इमेज थेरपीचाही वापर केला आहे.

त्यामुळे या कॅप्स वापरणार्‍यांना आश्चर्यकारक परिणाम दिसून येतात. त्यांची स्टडी कॅप घालून अभ्यास केल्याने केलेला अभ्यास विद्यार्थ्यांच्या लक्षात राहतो. यासंबंधी त्यांनी काही शाळांत प्रयोग केले. तेव्हा हुशार विद्यार्थ्यांचे मार्क वाढले तर पास-नापासच्या काठावर असलेल्या सामान्य विद्यार्थ्यांचे गूण अनेक पट वाढले.

पूजा व ध्यान करताना मन शांत राहावे यासाठी त्यांनी पूजा-मेडीटेशन सीट बनवली आहे. त्यावर बसून पूजा वा ध्यान केल्यास अगाध मानसिक शांती लाभते. विशेष म्हणजे या सर्व गोष्टींच्या किंमती अतिशय माफक, सर्वसामान्यांना परवडण्याजोग्या आहेत.

वास्तुशास्त्रीय ज्ञानाचा आधार घेऊन लोकांनी आपले जीवन सुखी बनवावे, लोकांच्या जीवनातील अस्वस्थता दूर व्हावी ही दत्ता गोखले यांची तळमळ आहे. परगावच्या ग्राहकांसाठी त्यांची सर्व उत्पादने ई-कॉमर्सद्वारेही उपलब्ध आहेत व त्यांना तुफान मागणी आहे.

ऊर्जा अक्षय्यतेच्या नियमानुसार ऊर्जा ही निर्माण व नष्ट करता येत नाही. तिचे फक्‍त स्वरुप बदलता येते. याच शाश्वत सिद्धांताचा व पिरॅमिड थेरपीतील ऊर्जा संचयाच्या संकल्पनेवर त्यांची सर्व उत्पादने आधारित आहेत. या पलीकडे जाऊन ते त्यांची सर्व उत्पादने सिद्ध करून म्हणजे प्रोग्रामिंग करून देतात. त्यामुळे त्यांच्या उत्पादनांमुळे आश्चर्यकारक क्रांतिकरी बदल घडतात. त्यांची उत्पादने वापरल्याने अनेक दु:खी, पीडित, गांजलेल्या लोकांच्या जीवनाचा स्तर बदलून गेला आहे.

दत्ता गोखले म्हणतात की वास्तुशास्त्र हाच सुखी जीवनाचा मूलमंत्र आहे. बरेचदा खूप कष्ट करूनही आपल्याला अपेक्षित यश लाभत नाही. निरनिराळ्या प्रश्‍नांनी आपण बेजार झालेले असतो. अशा परिस्थितीत वास्तुशास्त्राचा आधार घ्यावा. दत्ता गोखले यांच्या पिरॅमीड थेरपीवर आधारित उत्पादनांचा वापर करून परीक्षेत यश, मन:शांती, ऊर्जा मिळवावी.

तसेच त्यांचा सल्‍ला घेऊन आपल्या वास्तुत वास्तुशास्त्रीय दृष्टीने विना तोडफोड उपाय करून आपल्या घरातील दोषनिवारण करून घ्यावेत. त्यामुळे घरातील नकारात्मकता कमी होते व सकारात्मक ऊर्जा वाढल्याने अनेक समस्या निवारण होतात. त्याने आपल्या जीवनात क्रांतिकारी परिवर्तन घडते. याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी दत्ता गोखले यांना जरूर संपर्क साधावा.

संपर्क : दत्ता गोखले
9892259859, 0251-2208322


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?