पाळणाघर : शहरी भागाची गरज
उद्योगसंधी

पाळणाघर : शहरी भागाची गरज

स्पेशल ऑफर : ₹५०० प्रिंट मासिकाची वार्षिक वर्गणी भरा आणि डिजिटल अंकात अर्ध पान रंगीत जाहिरात मोफत मिळवा!
Book Now: https://imjo.in/Xx7Uq6

‘पाळणाघर’ आज नोकरी व व्यवसाय करणार्‍या दांपत्याच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. नवरा-बायको दोघेही नोकरी करत असल्यामुळे मुलांना हवा तो वेळ त्यांना देता येत नाही. नोकरदार पालकांसाठी मुलांची सुरक्षितता हा महत्त्वाचा विषय आहे. आता एकत्र कुटुंबपद्धती संपत चाललीय. घरात नवरा-बायको दोघेंच असतात. कधी नोकरीमुळे घरापासून दूर असतात तर कधी इतर काही कारणांनी अशावेळी मग मुलांकडे पाहण्यासाठी कोणीच नसते. त्याचमुळे नकळत्या वयात मुलांना अनोळखी ठिकाणी ठेवणे हा खूप मोठा धोका पालकांना पत्करावा लागतो. प्रत्येक पालकांना आपल्या मुलांवर योग्य संस्कार, योग्य संगत आणि त्याचे योग्य पालनपोषण याची काळजी असते त्यामुळे चांगल्या पाळणाघराच्या शोधात पालक असतात. अर्थार्जन आणि गरजवंतांना मदत असा दुहेरी हेतू ‘पाळणाघर’ या संकल्पनेतून साकारला जाताे.

गृहिणी असणाऱ्या महिला हा व्यवसाय खूप यशस्वीरित्या करू शकतात. त्यांच्यासाठी हा एक चांगला आणि गृहउद्योगाचा पर्याय आहे. तुम्हाला घरच्याघरी काही करण्याची इच्छा आहे? मुलांची आवड आहे? मुलांच्या बालपणात रमण्याची इच्छा आहे? मग तुम्ही नक्कीच या व्यवसायाचा विचार करू शकता. सुरुवातीला छोट्या पातळीवर घरच्याघरी सुरुवात करून नंतर हा व्यवसाय वाढवूही शकता. पाळणाघर सुरू करण्यासाठी सुरुवातीला अगदी नगण्य गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या व्यवसायाला सुरुवात करू शकता.


'स्मार्ट उद्योजक' डिजिटल मासिकाची आजीवन वर्गणी मिळवा फक्त ₹ १२३ मध्ये! सोबत आतापर्यंतचे सर्व अंकही मोफत मिळवा!

BOOK NOW: https://imojo.in/3x3a5zn


मासिक तत्त्वावर पाळणाघर चालवण्यासाठी मुलांच्या पालकांकडून काही रक्कम आकारली जाते. मुलांना किती वेळ पाळणाघरात ठेवले जाणार याची पूर्व कल्पना पालकांनी अगोदर दिली पाहिजे. मुलांनी पाळणाघरात रमण्यासाठी त्यांना खिळवून ठेवणाऱ्या गोष्टी आपल्याला त्यांना तेथे उपलब्ध करून देणे महत्त्वाचे असते. उदा. मुलांचे भावविश्व हे खेळण्यामध्ये रमणारे असते त्यामुळे मुलांना खेळणी, मुलांसाठी गाणी, गोष्टी, रंगीबेरंगी झुले अशा मनोरंजनाच्या आणि सोबत शिक्षणाच्या गोष्टींची उपलब्धता करून द्यावी लागते. ज्यामुळे मुलांना आपल्या पाळणाघरात रमण्यास सोपे जाते.

पाळणाघरात जेवण, दूध, नाश्ता या सर्व सोयी मुलांच्या वाढीच्यादृष्टीने पोषक आणि पोटभरीच्या असावयास हव्यात. मुलं पाळणाघराच्या वातावरणात रमण्यासाठी सतत वेगवेगळ्या संकल्पना, युक्त्या राबवून कार्यक्रम घेतले पाहिजेत. उदा. मुलांचे वाढदिवस साजरे करणे, त्यांना चित्र काढायला लावणे, त्यांच्यासोबत वेगवेगळे खेळ खेळणे इ.

पाळणाघर वाढवण्याच्या दृष्टीनेही काही नियम आणि अटी स्वत:च स्वत:ला लावून घेणे प्रत्येक पाळणाघर चालवणाऱ्यांसाठी गरजेचे आहे. ‘० ते १२’ या वयोगटातली मुलं ही पाळणाघरात राहतात. त्यामुळे मुलांचे संस्कारक्षम वय असताना त्यांना योग्य संस्कार आणि संगोपन देण्याची खूप मोठी भूमिका पाळणाघराचीही असते. याची जाणीव प्रत्येक पाळणाघर चालवणाऱ्यांना असावी लागते. त्यासाठी आग्रहीही असावे. मुलांच्या संवेदनशील मनांना जपत आणि कौशल्याने त्यांना घडवणं हे या उद्योगाचं खरं यश म्हणावं लागलं तर खोटं ठरू नये.

दुर्दैवानं पाळणाघरांवर अंकुश ठेवण्यासाठी अजूनही परिपक्व अशी नियमावली आपल्याकडे नाही. थेट कायदाही नाही. प्रत्येक गोष्टीला चांगला-वाईट, योग्य-अयोग्य, सकारात्मक-नकारात्मक असे अनेक कांगोरे असतातच. ‘महिला व बाल विकास’ महामंडळ या व्यवसायावर अंकुश ठेवण्यासाठी सजग झाले आहे.

पाळणाघर कसं असावं?
याविषयी काही अटी आणि नियमावलीसुद्धा तयार केली जात आहे त्यातीलच काही महत्त्वाचे मुद्दे खाली देत आहे.

हे ई-बुक खरेदी करण्यासाठी जाहिरातीवर क्लिक करा.
 • पाळणाघरात कमीत कमी पाच व जास्तीत जास्त २५ मुलांसाठी सोयी उपलब्ध असाव्यात.
 • प्रत्येक मुलासाठी ३0 चौरस फूट याप्रमाणे जागा असावी.
 • मुलांचं पोषण साहित्य तयार करण्यासाठी कमीत कमी १00 चौरस फुटांचं स्वयंपाकगृह असावं.
 • पाळणाघर परिसर स्वच्छ व शक्यतो ते मोकळ्य़ा जागेत असावं.
 • पाळणाघरात प्रथमोपचार पेटी असावी आणि तीही अद्ययावत असावी.
 • पाळणाघरात जर मुलांना आहार दिला जात असेल तर तो कसा असावा? हे बालरोग तज्ज्ञांकडून ठरवून घ्यावं व त्याप्रमाणेच तो दिला जायला हवा.
 • आपत्कालीन स्थितीत पाळणाघरात  वैद्यकीय अधिकारी तातडीनं उपलब्ध व्हावेत.
 • पाळणाघरातील सर्व कर्मचारी वर्गाची वैद्यकीय तपासणी करूनच त्यांना कामावर ठेवावं. त्यांची दर ३ महिन्यांनी वैद्यकीय तपासणी करावी.
 • पाळणाघरात पाच मुलांमागे एक काळजीवाहक असावा. काळजीवाहक शक्यतो महिला असावी. तसेच ती प्रशिक्षितही असावी.
 • पाळणाघरात मुलांची दैनिक उपस्थिती, आहार, कर्मचारी हजेरी यांची नोंदवही असावी.
 • पाळणाघरात आकस्मिक प्रकाशव्यवस्था व अग्निशमन यंत्रणा असणं आवश्यक आहे. कर्मचार्याेस अग्निशमन यंत्र वापराबाबत प्रशिक्षण दिलेलं असावं.
 • पाळणाघरातील खिडक्या जमिनीपासून कमीत कमी ३.५ फूट उंच असाव्यात.
 • दर तीन महिन्यांनी पाळणाघरांची तपासणी महिला व बाल विकास विभागाअंतर्गत ग्रामीण व नागरी भागातील संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत केली जाईल.
 • एखादं व्यावसायिक संकुल किंवा कार्यालयामध्ये काम करणार्याग सर्व महिलांची संख्या ५00 किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास, तेथे किमान एक पाळणाघर असणं बंधनकारक राहील.
 • मोठय़ा शहरांतील रेल्वे स्थानकं, बस स्थानकं या सर्व ठिकाणी पाळणाघर असणं बंधनकारक राहील.
 • प्रस्तावित नवीन व्यावसायिक संकुलात पाळणाघराची तरतूद असल्याशिवाय संकुलाला परवानगी दिली जाणार नाही.

नियमांच्या चौकटीत पाळणाघर स्थापन करणं व ते चांगल्या रीतीनं न चालविल्यास संबंधित मालक किंवा व्यवस्थापकांना दरवर्षीप्रमाणे २५ हजार रुपये दंड आकारला जाईल. तसेच दंड केल्यानंतर तीन महिन्यांत पाळणाघर सुरू न केल्यास त्याला एक महिन्यापेक्षा जास्त इतक्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकेल.

हे सर्व नियम आणि अटी या प्रस्तावित आहेत. परंतु या सर्वाचा अभ्यास करून व्यवसाय म्हणून या उद्योगाकडे पाहणाऱ्यांना यशस्वी उद्योग सुरू करता येऊ शकतो.

Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

WhatsApp chat
error: Content is protected !!