दीपा चौरे यांच्या नेतृत्वात या महिला बचत गटाने मिळवला राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार

माझा जन्म नागपूर शहरातील प्रसिद्ध बाराखोली इंदोरा येथील झोपडपट्टीत झाला. कठीण काळात स्वतःचे अस्तित्व टिकवणे, तग धरून राहणे या गोष्टी मी आईच्या गर्भातूनच शिकून आले असे म्हणू शकतो. चार भावंडात मी सर्वात लहान. आईची तब्बेत आणि घरातील आर्थिक स्थिती खूप नाजूक त्यामुळे हा गर्भ ठेऊ नका, असे डॉक्टर आणि नातेवाईकांचे मत होते. परंतु गर्भपात करण्यास उशीर झाल्याने मी या जगात अवतरले. जन्मापासूनच घरी कमी आणि हॉस्पिटलला जास्त राहिले.

माझे वडील शाळा मास्तर आणि आई गृहिणी. तुटपुंजी आवक त्यात आम्ही चार भावंड. वडील स्वाभिमानी, मदतीसाठी कधी कुणापुढे हात पसरले नाहीत. आमचे वडील शिक्षक होते त्यासोबतच ते भाजीपाला विक्रीचा जोडधंदा करत. त्यामुळे लहानपणीच व्यावसायिक बाळकडू, जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम हे सर्व गुण आपोआपच रक्तात उतरलेत.

प्रकृती जरी कृश असली तरी बुद्धी मात्र तल्लख लाभली. सोबत घरातूनच व्यावसायिक संस्कार लाभले. त्यामुळे मोठेपणी उद्योजक होण्याचे स्वप्न मनी ठरले होते. पदवी शिक्षण झाले आणि ड्रेस डिझायनिंग डिप्लोमा व पदवी प्राप्त केली. व्यावसायिक अनुभवासाठी एका गारमेंट वर्कशॉपला दोन वर्षे बिनपगारी काम केले. दोन वर्षांनंतर स्वतःचे छोटेसे बुटीक चालू केले. सुरुवात निराशाजनक होती, पण अनुभवातून शिकत गेले.

२००६ साली लग्न होऊन नागपूरपेक्षा छोट्या बुटिबोरी शहरात आले. सुदैवाने यजमान समविचारी लाभले. एका खासगी कंपनीत नोकरी करतात, पण उद्योग करायचे वेड त्यांच्याही मनी होते. नागपूरच्या तुलनेत इथे माझ्या उद्योगासाठी भरपूर वाव दिसला. एक शिलाइ मशीन, एम्ब्रॉयडरी मशीन मला माहेरातून मिळाली होती. त्या भरावशावर घरीच छोटेसे बुटीक सुरू केले.

दीपा चौरे

माझा स्वभाव खेळकर, बोलका त्यामुळे काही दिवसातच या ठिकाणी नवीन ओळखी झाल्या; ज्यामुळे हळूहळू नवीन काम येत गेले. यजमानांचे आर्थिक परिस्थितिसुद्धा कर्जामुळे बेताचीच होती. उद्योगासाठी भांडवल उभारने कठीण वाटत होते. अशात बचत गटाबद्दल वाचनात आले. बचत गटामधून आपली आर्थिक उद्दिष्ट साध्य होऊ शकतात याची खात्री झाली.

तालुक्यातील एक संस्था महिला बचत गट निर्मिती व विकासासाठी कार्यरत आहे अशी माहिती मिळाली. त्यांचे मदतीने व मार्गदर्शनाने परिसरातील तुलनेने सारख्याच परिस्थिती असलेल्या महिलांना विश्वासात घेऊन २०१५ साली ‘क्रान्तिज्योती महिला बचत गट’ स्थापन केला. बँक ऑफ इंडियात बचत गटाचे खाते काढले. यात मासिक बचत जमा करणे सर्व सभासदनी चालू केले.

‘तेजस्विनी बहुद्देश्यीय महिला विकास संस्था, हिंगना’चे मार्गदर्शनात व प्रशिक्षण कार्यक्रमामधून आम्ही महिला बचत गटाबद्दल नवनवीन माहिती, प्रोजेक्ट, अकाउंटिंग, व्यवस्थापन शिकू लागलो. सहा महिन्यानंतर संस्थेच्या मदतीने गटाला बँकेतर्फे अर्थसहाय्य मिळाले. त्यातून शिलाई मशीन व कापड खरेदी केले व नवजात शिशूंचे तयार ड्रेस उत्पादन घेतले.

खरी कसोटी आमची तिथून सुरू झाली. आम्ही दोन-तीन जणी मिळून कपड्यांचे सेट घेऊन दवाखाने, मार्केटच्या फेऱ्या करू लागलो, पण प्रतिसाद शून्य. मार्केट रेटपेक्षा कमी किंमत असूनही आमच्या मालाला मागणीच नव्हती. हळुहळू गटातील महिला सदस्यांनी साथ सोडायला सुरुवात केली. कर्जफेड करू शकू का, या विवंचनेत रात्र रात्र झोप लागेना. टेन्शनमुळे इतर कामात लक्ष लागेना.

या कठीण काळात आम्हाला नागपुर जिल्हा समन्वयक समिती DRDO चे बचत गट अधिकारी मदतीला धावून आले. त्यांनी आमच्या उत्पादनातील उणिवा नजरेस आणून दिल्या. तसेच काही रेफरन्ससुद्धा दिले ज्यामुळे आम्हाला पहिली ऑर्डर मिळण्यास खूप मदत झाली. सोबत आमचे यजमानसुद्धा डयूटी सांभाळून या उद्योगात मदत करायला लागले.

ऑनलाइन प्रसार माध्यमाद्वारे ‘क्रांतीज्योती महिला बचत गटा’च्या उत्पादनाची जाहिरात करण्याची जबाबदारी त्या सगळ्यांनी घेतली. ज्यामुळे आज आम्ही आमची उत्पादने संपूर्ण देशभर विक्री व मार्केटिंग करीत आहोत.

उत्पादनाची प्रक्रिया पूर्णपणे बचत गटाच्या महिला सदस्यांनद्वारे पार पाडली जाते. कच्चा माल खरेदीपासून कटिंग, शिलाई, पॅकिंग, अकाऊंटिंग अध्यक्ष दीपा चौरे यांचे देखरेखीखाली प्रशिक्षित महिलांद्वारे या प्रक्रिया पार पाडल्या जातात.

क्रान्तिज्योती महिला बचत गट हा देशातील पहिला बचत गट आहे की जो यशस्वीरित्या ऑनलाइन प्रसारमाध्यमांचा वापर करून आपल्या उत्पादनांचे मार्केटिंग व विक्री करत आहे. सोबतच ऑनलाइन माध्यमांद्वारे मिळालेल्या ऑर्डर कुरियरद्वारे ग्राहकांना घरपोच पाठवणे यातसुद्धा आम्ही देशात प्रथम आहोत.

ग्रामीण भागातील महिला, जुजबी शिक्षण व अल्प अनुभव या गोष्टीवर मात करीत देश पातळीवर स्वतः तयार केलेला माल विक्री, विपणन व डिलीवरी करतात या संकल्पनेसाठी क्रान्तिज्योती महिला बचत गटाला वर्ष २०१९ ला भारत सरकार तर्फे दिला जाणारा मानाचा National Entrepreneurship Award मिळाला. ज्यात प्रशस्तिपत्र व पाच लाख रुपये असा पुरस्कार गटाला प्राप्त झाला आहे. सोबतच वर्ष २०२० ला नाबार्ड भारत सरकारतर्फे उत्कृष्ट महिला बचत गट पुरस्कार मिळाला आहे.

ही पूर्ण उपलब्धी दीपा चौरे यांच्या अध्यक्षतेखाली क्रान्तिज्योती महिला बचत गटाला प्राप्त झालेली आहे. २०२१ मध्ये नाबार्डतर्फे गटाला “रूरल मार्ट” नामे प्रोजेक्ट मिळाला आहे. ज्या अंतर्गत जिल्ह्यातील इतर बचत गटाची उत्पादन वस्तू, मार्केटिंग व विक्रीसाठी दुकान उभारणे आहे आणि यासाठी अर्थसहाय्य नाबार्डतर्फे मिळणार आहे.

व्यवसाय कुठलाही असो, तो यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्ने आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी घेतलेली प्रामाणिक मेहनत.

दीपा प्रशांत चौरे

कंपनीचे नाव : क्रान्तिज्योति महिला बचत गट
आपला हुद्दा : अध्यक्ष
व्यवसायातील अनुभव : 12 वर्षे
तुमची उत्पादने व सेवा :

  • नवजात शिशुचें तयार कपडे, मुलींचे फ्रॉक, महिलांसाठी तयार सलवार कुर्ता, विविध प्रकारची वस्त्र प्रावरण, गाउन इ.
  • घरी लागणार दोहळ, उशी कवर, लोड कवर, टेबल क्लॉथ, पडदे, सोफा कवर इ.
  • विविध प्रकारच्या कापडी पिशव्या, डिझाइनर बॅग, पर्सेस, बटवा, हँड बग्स, जुट बग्स इ.
  • होलसेल उत्पादन व विक्री तसेच गरजु महिलांसाठी शिलाई प्रशिक्षण, आर्थिक बचत व उन्नतीचे कार्यक्रम.

व्यवसायाचा पत्ता : वार्ड क्र 04, प्रभाग क्र 02, नवीन वसाहत , बुटिबोरी, पोस्ट बुटिबोरी, जिला नागपुर, महाराष्ट्र – 441108
विद्यमान जिल्हा : नागपूर

ई-मेल : krantijyotishg2015@gmial.com
मोबाइल : 7798133219
संकेतस्थळ : www.krantijyotishg.com
Facebook Account URL : https://www.facebook.com/krantijyotishg
फेसबुक बिझनेस पेज URL https://www.facebook.com/ruralmartbtbr/

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?