Advertisement
उद्योगवार्ता

काथ्या उद्योगाद्वारे शाश्वत रोजगारनिर्मिती : केसरकर

तुम्ही उद्योजक आहात का?

जर असाल, तर 'महाराष्ट्र उद्योजक सूची'मध्ये आजच आपली नोंद करा आणि अगणित लाभ मिळवा.

अधिक माहितीसाठी : udyojak.org/join-udyojak-list/

Print this Page

सिंधुदुर्ग (महान्युज) : झोळंबे येथे काथ्या प्रक्रिया उद्योग सामुहिक सुविधा केंद्र लवकरच सुरू होत आहे. यामुळे झोळंबे, तळकट, कळणे गावच्या पंचक्रोशीतील महिलांना रोजगाराचे नव दालन सुरू होईल. चांदा ते बांदा योजने अंतर्गत सुमारे पन्नास लक्ष रुपये खर्च करुन उभारण्यात येणाऱ्या या केंद्रामुळे मोठ्या प्रमाणात महिलांना रोजगार उपलब्ध होईल. काथ्या उद्योगाद्वारे महिलांसाठी शाश्वत रोजगारनिर्मिती होईल, असा विश्वास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दोडामार्ग येथे झोळंबे गावात बोलताना व्यक्त केले.

झोळंबे येथे चांदा ते बांदा योजनेखाली महाराष्ट्र राज्य लघू उद्योग विकास महामंडळामार्फत काथ्या उद्योग सामुहिक सुविधा केंद्राचे भूमिपूजन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. झोळंबे- तळकट पंचक्रोशीतील महिलांनी याबाबत प्रशिक्षण पूर्ण करावे असे सांगून पालकमंत्री केसरकर म्हणाले की, मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू झाले की, या ठिकाणी काथ्या पासून रबरी मॅटिंग बनवण्याचे टफ्टींग युनिटही सुरू केले जाईल.

महाराष्ट्र जिवनोन्नती अंतर्गत महिला सक्षमीकरणाच्या विविध योजनांसाठी जिल्ह्यात बावीस कोटी रुपये निधी आला आहे. झोळंबे- तळकट रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडकमधून केला जाणार असून यासाठी तीन कोटी रुपये निधी मंजूर आहे. चांदा ते बांदा अंतर्गत शेळी व गाय पालन तसेच कोंबडी पालनातून हॅपी एग्ज या योजनेतही महिलांनी मोठ्या प्रमाणावर उन्नती साधावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: