Advertisement
उद्योगोपयोगी

ध्येय साध्य करण्यासाठी कनिष्ठांवर जबाबदाऱ्या सोपावणे गरजेचे

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v

या लेखात आपण अधिकार (Authority), जबाबदारी (Responsibility) आणि उत्तरदायित्व (Accountability) याबद्दल माहिती घेणार आहोत. ‘व्हर्जिन ग्रुप’चे संस्थापक रिचर्ड ब्रॅण्डसन यांचं मत आहे की, “If you really want to grow as an entrepreneur, you’ve got to learn to delegate.”

एखादा उद्योजक किंवा कंपनीचा प्रमुख सगळीच्या सगळी कामं स्वतः करू शकत नाही. तसं करायला गेला तर त्याची दमछाक तर होईलच, पण कंपनीची उद्दिष्ट्ये आणि ध्येय कदाचित गाठताही येणार नाहीत. म्हणूनच लक्ष्य पूर्ण करण्यासाठी, उद्योजकाने किंवा व्यवस्थापकाने त्याच्या कनिष्ठांना त्याचे अधिकार सोपवावेत. आपले अधिकार अशा तऱ्हेने सोपवावेत की उत्तम परिणाम साध्य करता येतील.


फक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा!

या वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak

जेव्हा कधी एखादे काम साध्य करण्यासाठी एका कर्मचाऱ्याला सांगितले जाते, त्या वेळी तीन घटक असतात :

१) अधिकार : निर्णय घेण्यासाठी, आदेश देण्यासाठी, ध्येय गाठण्यासाठी उपलब्ध असलेल्या वस्तूंचे वाटप करण्यासाठी उद्योजकाकडे किंवा कंपनीच्या विशिष्ट अधिकाऱ्यांकडे जी शक्ती असते त्याला Authority किंवा अधिकार म्हणतात. या अधिकारांची व्याख्या व्यवस्थितपणे लिहून ठेवायला हवी म्हणजे कुठलेही संभ्रम होणार नाहीत.

ज्या अधिकाऱ्यांकडे किती अधिकार आहेत हे त्यांना आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांना माहीत असायला हवेत चुकीचा त्या अधिकारांचा गैरवापर होणार नाही. अधिकारांबरोबर समान प्रमाणात जबाबदारी असणे आवश्यक आहे. वरिष्ठ व्यवस्थापक वर्ग आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना योग्य ते काम करण्यासाठी अधिकार देतात, जे वर्धित, कमी करणे किंवा मागे घेता येतात.

२. जबाबदारी : आपल्याला दिलेली कामे पूर्ण करणे हे त्या व्यक्तीचे कर्तव्य आहे. यालाच जबाबदारी म्हणतात. ज्या व्यक्तीला जबाबदारी देण्यात आली आहे त्याने खात्री करून घ्यावी की त्याने अपेक्षित कामगिरी पूर्ण केली आहे. जबाबदारी असेल पण पुरेसे अधिकार नसतील तर असंतोष वाढतो.

जबाबदारी तळापासून वरून वाहते. मध्यम पातळीवरील आणि निम्नस्तरीय व्यवस्थापनावर अधिक जबाबदारी आहे. जबाबदारी सोपवली जाऊ शकत नाही, परंतु त्याला assign केले जाऊ शकते.

३. उत्तरदायित्व : एखाद्या सोपवलेल्या कार्याची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी जी नैतिक सक्ती असते, ते म्हणजे उत्तरदायित्व. उत्तरदायित्व कोणाला दिले जात नाही. उदाहरणार्थ, जर ‘XYZ’ नावाच्या व्यवस्थापकाला एखादी कामगिरी करण्यासाठी अधिकार दिले असतील आणि ‘XYZ’ने हे काम ‘PQR’ला करायला सांगितलं, तर ‘PQR’कडे जबाबदारी असेल, पण त्या कामाचे उत्तरदायित्व हे ‘XYZ’कडेच असेल. कोणत्याही कंपनीमध्ये विविध कामांचे उत्तरदायित्व हे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेच असते.

असे म्हणतात की, अधिकार सोपवला जातो, जबाबदारी तयार केली जाते आणि उत्तरदायित्व हे लादलं जातं. उत्तरदायित्व जबाबदारीतून आणि जबाबदारी अधिकारातून निर्माण होते. अधिकार सोपवताना काही अडचणी येऊ शकतात. उदाहरणार्थ :

१) वरिष्ठ सगळे अधिकार स्वतःकडेच ठेवतो, ज्यामुळे त्याला कडक नियंत्रण ठेवता येते.
२) कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या नोकरीत असुरक्षितता.
३) कनिष्ठ कर्मचाऱ्यांना काम करण्यास आवश्यक आत्मविश्वासाचा अभाव.

अधिकार कसे सोपवायचे?

१) कामाची व्याख्या, अपेक्षित कामगिरी समजावून सांगणे.
२) कनिष्ठ कर्मचाऱ्यांना काम कारण्यासाठी आवश्यक अधिकार देणे.
३) जबाबदारीची आणि उत्तरदायित्वाची जाणीव करून देणे.

अधिकार सोपवण्याचे काही फायदे :

१. व्यवस्थापनावरचा कार्यभार कमी होतो, जेणेकरून ते अधिक गंभीर क्षेत्रावर लक्ष केंद्रित करू शकतात आणि नवीन गोष्टीत प्राविण्य मिळवू शकतात.
२) वरिष्ठ आणि कनिष्ठ कर्मचाऱ्यांमध्ये अधिक अर्थपूर्ण नातेसंबंध होऊ शकतात, ज्यामुळे अपेक्षित परिणाम मिळू शकतात.
३) कनिष्ठ कर्मचाऱ्यांना त्यांच्या क्षमता आणि कौशल्य वाढवण्याची संधी मिळते. त्यांना कामात प्रेरणा, प्रोत्साहन आणि समाधान प्राप्त होउ शकते.

अधिकार सोपवणे केवळ एक प्रक्रिया नाही, तर हा एक मार्ग आहे; ज्याद्वारे व्यवस्थापक कंपनीच्या कार्यपद्धतीत स्थिरता, क्षमता आणि सामर्थ्य निर्माण करू शकतात.

– सीए जयदीप बर्वे
9820588298
cajaideepbarve@gmail.com


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!