Smart Udyojak Billboard Ad

५ सुशिक्षित तरुणांनी एकत्र येऊन निर्माण केला ‘Delishko’ हा फुड ब्रँड

ब्रँडचे नाव : Delishko
डेलिश्को ग्लोबल फूड प्रा. लि.

ब्रँडची स्थापना : जानेवारी २०२०

ब्रँड कशाचा आहे?

विविध प्रकारचे नैसर्गिक,स्वादिष्ट, पौष्टिक आणि ग्राहकांना परवडणारे रेडी टू कूक,रेडी टू फूड आणि फ्रोजन फूड सोल्यूशन्स

ब्रँडच्या नावाची कथा :

Delishko’s – सर्व भागीदारांच्या आडनावाचे आद्याक्षरे

De- Deore (देवरे)
li- Limaye (लिमये)
sh- Shirudkar (शिरुडकर)
ko- Koyande (कोयंडे)
‘s – Sadavarte (सदावर्ते)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या प्रेरणादायी संकल्पनेतून प्रेरित होऊन २०२० मध्ये पाच सुशिक्षित, अनुभवी आणि विविध क्षेत्रांत कार्यरत तरुणांनी एकत्र येऊन डेलिश्को ग्लोबल फूड प्रा. लि. ची स्थापना केली. त्यांचा उद्देश स्पष्ट होता सामान्य ग्राहकांना परवडणाऱ्या दरात १००% नैसर्गिक, स्वादिष्ट आणि पोषक अशी ‘रेडी टू कूक’, ‘रेडी टू इट’ आणि फ्रोजन फूड उत्पादने उपलब्ध करून देणे.

या प्रवासाला सुरुवात झाली ती स्वप्न आणि समर्पणाच्या जोरावर, ज्याने भारतीय खाद्यपदार्थांच्या बाजारपेठेत क्रांती आणण्याचा मार्ग मोकळा केला. ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्याने अल्पावधीतच ‘डेलिश्को’ हा ब्रँड १००% नैसर्गिक प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांचा अग्रगण्य निर्माता आणि निर्यातदार म्हणून उदयास आला.

आमची सर्व उत्पादने आयएसओ २२००० प्रमाणित मॅन्युफॅक्चरिंग सुविधेमध्ये, स्वच्छ आणि सुरक्षित वातावरणात, अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करत तयार केली जातात. आमचे अनुभवी अन्न तंत्रज्ज्ञ नवनवीन साधनांचा वापर करून उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्तेची खात्री करतात. रिटॉर्ट, फ्रोजन आणि मल्टीलेअर पॅकेजिंगच्या माध्यमातून ही उत्पादने विविध आकारांमध्ये पॅक केली जातात, ज्यामुळे त्यांचे शेल्फ लाइफ, ताजेपणा आणि चव दीर्घकाळ टिकून राहते.

डेलिश्कोने आपल्या प्रवासात सतत नावीन्याचा अवलंब केला आहे. अलीकडेच आम्ही ‘डेलिश्को हंगर वाईब्ज्’ या नावाने फ्रँचायझी कॅफे चेनमध्ये पाऊल ठेवले आहे. या उपक्रमाद्वारे आम्ही नवीन तरुण उद्योजकांना त्यांचे स्वतःचे कॅफे आणि रेस्टॉरंट्स सुरू करण्यासाठी आणि यशस्वीपणे चालवण्यासाठी मार्गदर्शन आणि पाठबळ देत आहोत.

हा विस्तार आमच्या दृष्टीकोनाचा एक भाग आहे जिथे आम्ही केवळ दर्जेदार खाद्यपदार्थच नव्हे, तर स्वप्ने पूर्ण करण्याची संधी देखील उपलब्ध करून देतो. डेलिश्कोमध्ये आम्ही १००% नैसर्गिक, स्वादिष्ट आणि पोषक उत्पादने देण्यास कटिबद्ध आहोत.

‘आत्मनिर्भर भारत’च्या संकल्पनेला बळकटी देत, आम्ही स्थानिक आणि जागतिक ग्राहकांना उत्तमोत्तम खाद्यपदार्थांचा अनुभव देत आहोत. डेलिश्कोसोबत, चव, गुणवत्ता आणि पोषणाचा हा स्वादिष्ट प्रवास सुरू ठेवा!

आमची टॅगलाइन :

“जब लाइफ हो बिझी, डेलिश्को बनाये खाना इझी!!!”

कंपनीचे संचालक :

swapna limayeस्वप्ना चेतन लिमये

स्वप्ना लिमये यांनी संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असून सुरुवातीला संगणक अभियंता म्हणून ३ वर्षे एचसीएल टेक कंपनीत नोकरी केली आणि काही वर्ष पूर्णवेळ गृहिणी होण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीला २-३ ट्रेडिंगमधील व्यवसाय करून पाहिले व त्या अनुभवाचा उपयोग करून स्वतःचा काहीतरी ब्रँड असावा आणि त्या नावाने उत्पादन करून व्यवसाय करावा असे ठरवले. आज डेलिश्को ग्लोबल फूड प्रा. लि. या कंपनीच्या संचालिका या पदावर त्या कार्यरत आहेत.

sampada shirudkar delishkoसंपदा तुषार शिरुडकर

सौ. संपदा शिरुडकर या संस्कृत विषयाच्या पदवीधर असून करिअरची सुरवात त्यांनी शिक्षक म्हणून २०१० पासून केली. स्वयंपाकाच्या आवडीतून त्यांनी एक छोटासा खाद्य व्यवसाय सुरू केला आणि सध्या त्या डेलिश्को ग्लोबल फुड प्रा. लि. या कंपनीत संचालक पदावर कार्यरत असून ऑपरेशन्स आणि प्रशासन विभाग सांभाळत असून डेलिश्कोच्या हंगर वाईब्ज् या रिटेल आऊटलेटच्या ऑपरेशनल प्रमुख आहेत.

‘डेलिश्को’ची उत्पादने:

रेडी टू कूक :

  • रेड बेस ग्रेव्ही
  • ब्राउन बेस ग्रेव्ही
  • भुना बेस ग्रेव्ही
  • व्हाईट बेस ग्रेव्ही
  • यल्लो बेस ग्रेव्ही
  • चॉप मसाला

रेडी इंडियन बेस ग्रेव्हीज :

  • मेदू वडा मिक्स
  • सांबार पेस्ट
  • कोकोनट चटणी

रेडी पेस्ट :

  • जिंजर पेस्ट
  • गार्लीक पेस्ट
  • जिंजर गार्लीक पेस्ट
  • चिकपीज पेस्ट
  • कॅशु पेस्ट (रेग्युलर/प्रीमियम)
  • रेड/ग्रीन चिली पेस्ट

ओनिअन व्हेरिअंट :

  • फ्रेश फ्राइड ओनिअन
  • साऊते ओनिअन
  • साऊते ओनिअन वीथ जिंजर गार्लीक
  • बॉइल्ड ओनिअन पेस्ट

बॉइल्ड सेरीयल :

  • बॉइल्ड चिकपीज
  • बॉइल्ड ब्लॅक चिकपीज
  • बॉइल्ड रेड किडनी बीन्स
  • बॉइल्ड ब्लॅक आइड बीन्स
  • बॉइल्ड तूर डाळ
  • बॉइल्ड ग्रीन मूग डाळ
  • बॉइल्ड उडद डाळ

साऊथ इंडियन मिक्स :

  • डोसा मिक्स
  • इडली मिक्स

Delishko products

रेडी टू इट :

  • राजमा मसाला
  • छोले मसाला
  • पनीर बटर मसाला
  • पालक पनीर
  • पनीर मेथी मटर मलाई
  • स्मोक्ड पनीर
  • पनीर लबाबदार
  • दाल मखनी
  • दाल फ्राय
  • बटर चिकन
  • चिकन बिर्याणी
  • व्हेज बिर्याणी
  • गुलाबजाम
  • मूग डाळ हलवा
  • कॉम्बो मील

फ्रोजन फूड : (नवीन लाँच)

  • व्हेज / नॉनव्हेज रोल
  • व्हेज / नॉनव्हेज कबाब
  • व्हेज / नॉनव्हेज समोसा
  • व्हेज / नॉनव्हेज पिझ्झा
  • व्हेज / नॉनव्हेज पॅटी
  • नॉनव्हेज सॉसेजेस
  • नॉनव्हेज सलामी

संपर्क : ए-५, विनयगुरू CHS., गुरूमंदिर रोड, सारस्वत कॉलनी, डोंबिवली- पू. – ४२१२०१

मोबाईल : ७४००१४७१६८ | ई-मेल: info@delishko.com | वेबसाईट: www.delishko.com

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

तुम्ही उद्योजक / व्यापारी / व्यावसायिक आहात आणि तुमचीही बिझनेस प्रोफाइल या पोर्टलवर प्रसिद्ध करायची आहे? तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: Content is protected !!
Scroll to Top