Advertisement
उद्योगसंधी

उद्योगसंधी : तुमच्या भागात आवश्यक वस्तू/सेवा पुरवणे

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


प्रकार : ऑफलाईन
कॉम्प्युटरचे ज्ञान : अनिवार्य नाही.
गुंतवणूक : नाही
शिकण्यासाठी वेळ : १-६ आठवडे

हा प्रकार ऑफलाईन प्रकारचा, विना गुंतवणुकीचा आणि वेळ व मेहेनत देण्याचा आहे. हा अगदी साधा, प्राथमिक आणि कोणत्याही विशेष प्राविण्याशिवाय, करता येणारा मार्ग आहे. हा फक्त वस्तू व सेवा “पुरवठा” करणे, असा प्रकार आहे. “खरेदी – विक्री” करून ट्रेडिंग करण्याचा दुसरा मार्ग, पुढील एखाद्या भागात पाहणार आहोत.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

आज बऱ्याच घरात काही कारणाने घरातील व्यक्तींना बाहेर जाणे शक्य नसल्याने, त्यांना घरपोच वस्तू व सेवा पुरवण्याची प्रचंड आवश्यकता आहे. कोणत्या वस्तू आणि सेवा देता येतात त्याची उदाहरणे :

• धान्य किराणा
• भाजी पाला
• औषधे व वैद्यकीय साहित्य
• बँक सेवा
• विमा, आरक्षण, कागद पत्रांची ने आण

• जेवणाचे डबे आणि इतर खाद्य पदार्थ
• पोस्ट किंवा कुरिअर विषयक सेवा
• रुग्ण सेवा
• इलेक्ट्रिक, प्लंबिंग किंवा इतर तंत्र कुशल व्यावसायिकांना मदत करणे
• इतर व्यावसायिकांची वस्तू ने-आण करणे

तुम्ही लोकांशी बोलून त्यांना कशाची गरज आहे आणि ती कशी पुरवता येईल, ह्याचा कल्पकतेने विचार करून, आवश्यक पुरवठादार आणि इतर माहिती मिळवून, तुम्हाला ह्याचा विस्तार हवा तसा, हवा तेवढा करता येईल, पण आधी तुमच्या जवळच्या भागातून सुरुवात करा. लोकांशी बोलल्यावरच, तुम्हाला ह्यातील मागणी आणि पुरवठा लक्षात येईल.

ह्यासाठी ह्या वस्तू व सेवा विकणाऱ्या उद्योजकांशी संपर्क करून त्याची माहिती मिळवावी. दुसरीकडे, ज्यांना ही सेवा हवी आहे, अशा व्यक्ती व कुटुंबाशी संपर्क करून माहिती मिळवावी. सोसायटी, मंडळे, वरिष्ठ नागरिक संघ, सामाजिक संस्था ह्यांच्याशी संपर्क करून त्यांना तुमच्या सेवा आणि त्यांचे दर, ह्या विषयी कळवावे. फोनवर बोलून, WhatsApp किंवा प्रत्यक्ष भेटून तुम्ही अशी सेवा कोणाला हवी आहे, त्याची यादी बनवू शकता.

हे तुम्ही एकट्याने करू शकता किंवा तुमचे ४-५ मित्र वगैरे एकत्र मिळून, काम विभागून करू शकता. प्रत्येकाला एखाद्या प्रकारचे नाव एखाद्या विभागाचे काम देऊ शकता. फोन करणे आणि घेणे, माहिती जमवणे, वगैरे कामात तुम्ही घरच्यांची मदत घेऊ शकता. तुमची दुचाकी असेल तर त्याचा सर्वात उत्तम वापर आता होणार आहे.

ह्यामध्ये, तुम्ही ठराविक कामांसाठी मासिक सेवा देण्याची रक्कम सांगू शकता किंवा काम अनुसार त्या त्या वेळी फी घेऊ शकता. वस्तू, पदार्थ, सेवा पुरवठादारसुद्धा तुम्हाला त्याच्या बऱ्याच ग्राहकांसाठी हे काम करायला देऊ शकतो.

आज, एक २०० पानी वही करा. त्यात, आपल्या पुढील अनेक भागात सांगितल्या जातील त्या कल्पना आणि त्यासंबंधी तुमचे विचार, तुमचे प्रश्न, तुम्ही जमवलेली माहिती “लिहून” ठेवा. कारण नुसता मनात विचार करून, तुम्ही तो विसरू शकता. कुटुंबीय आणि मित्र आणि व्यावसायिक ह्यांच्या बरोबर चर्चा करा. त्यातूनच तुमचे उत्पन्नाचे ४-५ मार्ग नक्की होणार आहेत. विचार करा, अभ्यास करा आणि कृती करा. काम होईल.

– सतीश रानडे


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!