उद्योगसंधी

घरी करता येण्यासारखा उद्योग – डेस्क टॉप पब्लिशिंग (डीटीपी)

स्पेशल ऑफर : ₹५०० प्रिंट मासिकाची वार्षिक वर्गणी भरा आणि डिजिटल अंकात अर्ध पान रंगीत जाहिरात मोफत मिळवा!
Book Now: https://imjo.in/Xx7Uq6

घरगुती करता येण्यासारख्या उद्योगांमध्ये डेस्क टॉप पब्लिशिंग (डीटीपी) हा एक चांगला पर्याय आहे. स्त्री-पुरुष दोघांसाठीही हा सोयीचा व्यवसाय आहे. घरातील वैयक्तिक संगणकापासून याची सुरुवात करता येऊ शकते. सोबत थोडे मुद्रणाचे ज्ञानही असल्यास तुम्हाला छपाईची कामेही घेता येतात व चांगले अर्थार्जन होते.

डीटीपीमध्ये कॉम्प्युटराइज टायपिंग, फोटो एडिटिंग, ले-आउट डिझायनिंग, प्रोसेसिंग या गोष्टी अंतर्भूत आहेत. यांचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले असणे गरजेचे आहे. मात्र हल्ली डीटीपी कोर्सच्या नावे काहीही खपवले जाते, त्यामुळे कोर्स निवडताना काय काय शिकवले जाणार आहे, याची व्यवस्थित चौकशी करावी. इन्स्टिट्यूटमधून शिकण्यापेक्षा या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींकडून व्यक्तिगत शिकणे अधिक चांगले.


'स्मार्ट उद्योजक' डिजिटल मासिकाची आजीवन वर्गणी मिळवा फक्त ₹ १२३ मध्ये! सोबत आतापर्यंतचे सर्व अंकही मोफत मिळवा!

BOOK NOW: https://imojo.in/3x3a5zn


डीटीपीच्या कामांसाठी लॅपटॉपपेक्षा डेकस्टॉप कॉम्प्युटरच चांगला.

सोबत मराठी, हिंदी, गुजराती अशा प्रादेशिक भाषांमध्ये सेवा देता याव्यात यासाठी भाषेची सॉफ्टवेअर्स घेणे गरजेचे आहे. इंग्रजीमध्ये टाइपिंग करणे कोणत्याही संगणकावरून शक्य आहे मात्र प्रादेशिक भाषांमध्ये भाषेच्या सॉफ्टवेअरशिवाय डीटीपी करणे शक्य नसते, त्यामुळे तुमच्याकडे प्रादेशिक भाषांमध्ये डीटीपी करून मिळत असेल तर खूप काम मिळू शकते.

डीटीपी करण्यासाठी मुख्यत: मायक्रोसॉफ्टचे एम.एस.वर्ड, एडॉबचे पेजमेकर अथवा इन-डिझाइन, फोटोशॉप व इल्युस्ट्रेटर ही सॉफ्टवेअर्स लागतात. दुसरे एक कोरेल हे सॉफ्टवेअरही वापरले जाते. एडॉबचे इल्युस्ट्रेटर हे कोरेल-ड्रॉप्रमाणेच आहे. त्यामुळे दोन्ही कंपन्यांची सॉफ्टवेअर्स वापरायलाच हवीत असे नाहीय. सॉफ्टवेअर्स शक्यतो विकत घेतलेली असावीत.

प्रकाशन क्षेत्र, जाहिरात क्षेत्र, विधिविषयक कामे करणारे असे तुमचे संभाव्य ग्राहक होऊ शकतील.
हे ई-बुक खरेदी करण्यासाठी जाहिरातीवर क्लिक करा.

काम मिळवण्यासाठी वैयक्तिक ओळखींचा उपयोग होऊ शकतो. तसेच तुमची स्वत:ची वेबसाइट असल्यास गुगलद्वारे अनेक लोक तुमच्यापर्यंत काम करून घेण्यासाठी पोहोचू शकतील. जस्ट डायल, सुलेखा, यल्‍लो पेजेस अशा बिझनेस वेबसाइटवर नोंदणी केल्यास त्यावरूनही ग्राहक तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील.

मात्र त्यांची पेड पॅकेजेस घेण्यापूर्वी सारासार विचार करूनच मग निर्णय घ्यावा. अन्यथा चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला अशातली गत होऊ शकेल. ‘प्रकाशन विश्‍व’ या प्रकाशनविषयक डायरीमध्ये तुमची नोंद जरूर करा.

व्यवसायाची नोंदणी सोल प्रोप्रायटरशिप अथवा भागीदारी स्वरूपाची घेता येऊ शकेल. नव्याने आलेली ‘वन पर्सन कंपनी’ हाही नोंदणीसाठी चांगला पर्याय होऊ शकतो. व्यावसायिक तसेच आयकर भरणे सयुक्तिक होते. करविषयक कर सल्लागार अथवा चार्टर्ड अकाऊंटंटचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

शैलेश राजपूत


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

WhatsApp chat
error: Content is protected !!