७० हजार रुपयांत सुरू केलेला व्यवसायाची झाली ३ वर्षांत २ कोटींची उलाढाल


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


मी शेतकरी कुटुंबातून असल्याने माझे बालपण हे गावाकडेच गेले. बारावीपर्यंतचे शिक्षण हे ‘रयत शिक्षण संस्थे’मध्ये झाले त्यानंतर मी Bsc Agri ला प्रवेश घेतला. शेतकरी कुटुंबातून असल्यामुळे शेती क्षेत्राकडे जास्तच ओढा होता. लहाणपणापासूनच माझ्यावर स्वावलंबी होण्याचे संस्कार घरातून झाले.

बोलका आणि निर्भिड असल्यामुळे लोकांमध्ये लगेच मिसळून जायचो. नवीन नवीन प्रयोग करायला नवनवीन शिकायला आणि लोकांशी बोलायला पहिल्यापासूनच आवडायचे. २०१८ मध्ये पदवीधर झाल्यानंतर मी बिझनेस करायच ठरवलं, पण त्यासाठी Technical knowledge ही असाव म्हणून पुण्यामध्ये MBA ला प्रवेश घेतला.

MBA च्या प्रथम वर्षामध्ये academics बरोबरच Market चा पण अभ्यास केला कोणत्या गोष्टींची गरज आहे, कोणत्या गोष्टींना मागणी आहे आणि भविष्यात काय scope आहे अशा सर्व गोष्टींचा अभ्यास करून Fruit supply chain मध्ये काम करायच ठरवलं.

त्यासाठी काही महिने अशाच एका कंपनीमध्ये काम करून प्रत्यक्षात अनुभव घेतला आणि त्यानंतर २०१९ मध्ये काही जवळच्या मित्रांना बरोबर घेवून ही कंपनी सुरू केली. सुरुवातीच्या काळामध्ये खूप पैसे जवळ नव्हते. साठवलेले जेमतेम ७०,००० रुपये जवळ होते आणि तेवढ्याच पैशामध्ये हा व्यवसाय आम्ही चालू केला.

सुरुवातीला फक्त पाच लोकांचा हा स्टाफ होता. आम्ही कंपनीचे डायरेक्टर होतो जे पडेल ते काम प्रत्येकाने करायचो. शेतकऱ्यांकडून माल आणणे, ग्राहकांच्या ऑर्डर घेणे, delivery देणे ही सर्व कामे आम्हीच करायचो.

आमच्याकडे तेवढा पैसा नव्हता की लोंकाना कामाला ठेवू किंवा delivery van ला driver ठेवू. सर्व कामे वाटून घेवून कमीत कमी झोप आणि जास्तीत जास्त काम हे मनाशी धरून दिवसरात्र काम करायचो. त्यावेळी या क्षेत्रामध्ये मोठमोठ्या कंपनी काम करत होत्या तरी चिकाटीने तग धरून राहिलो आणि हळूहळू कंपनी पुढे नेत राहिलो.

आज कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर दोन करोडपर्यंत पोहोचला आहे व जवळपास २८ लोकांचा स्टाफ कार्यरत आहे. अनेक वेळा कठीण प्रसंग आले ज्या ठिकाणी वाटलं की हे असह्य होतंय, खूप तणाव येतोय, पण त्या सगळ्या अडचणी आणि तणावांवर मात करून आम्ही पुढे निघालो आहोत.

कष्टाला यश हे आहेच, प्रामाणिकपणे आणि तग धरूण आपण काम करत राहिलो तर संकटांना तोंड देवून आपण पुढे जातोच आणि चिकाटी आणि धैर्याने नवीन मार्ग सापडतातच जे आपल्याला यश आणि समाधान देतील. शेवटी God is Great he his giving all who deserve by his hard work.

धनंजय शिवाजी जाधव

कंपनीचे नाव : Mybhumi Veg Cart
आपला हुद्दा : Founder
व्यवसायातील अनुभव : ३ वर्षे
तुमची उत्पादने व सेवा : Services to farmers:
1. Better pricing than agents
2. Guiding farmers on market demand
3. Sell produce and making brand of produces

Services to customers
1. Fresh and clean fruits
2. Quality assurance
3. Faster and on time delivery
व्यवसायाचा पत्ता : 4th floor, Gravitas, Pan card road, Baner, Pune
विद्यमान जिल्हा : पुणे

ई-मेल : dhananjayjadhav049@gmail.com
मोबाइल : 8698048484
संकेतस्थळ : www.mybhumi.in
LinkedIn Account URL : https://www.linkedin.com/in/dhananjay-jadhav-4a52281b4

प्रॉडक्ट किंवा सेवेविषयी थोडक्यात माहिती :

we are in the supply of seasonal, local and imported fruits to retailers, wholesalers and bulk buyers. For seasonal and local fruits we procure produce directly from farmers and selling to retailers and wholesalers thereby eliminating middlemen and tiers of commissions.

Typically we convince farmers to join our network by assuring them prices that are higher than what local agents would pay, so that the elimination of commission. Farmers are kept updated about the quantity of demand for a Fruits current prices offered.

MyBhumiVegCart is helping farmers by integrating them into the organized B2B supply chain and guiding them to cultivate right fruit at the right time as per market demand research. Retailers and other wholesale customers can place orders and are offered better prices, scheduled deliveries and a quality assurance.

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?