कोरोनामध्ये विद्यार्थ्यांचे होणारे हाल बघून स्पर्धा परीक्षांची तयारी सोडून धनश्री झावरे झाली शिक्षिका

Udyojak dhanashri zaware story

कधी कधी आपण आयुष्यात एका मार्गावर चालत असतो. आपल्याला वाटत असतं आपल्याला काय हवयं हे पक्के ठाऊक आहे आणि आपण त्या दिशेने मार्गक्रमण करत असतो. पण खरंतर आपला रस्ता कधी कुठे कसा बदलेल हे कळत नाही. धनश्री झावरे या २८ वर्षीय तरुणीचंही असंच काहीसं आहे.

धनश्री २०१९ साली गणित विषयात एमएस्सी झाली आणि तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. तिला यातच आपलं करिअर करायचं होतं. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू होता आणि त्याच दरम्यान कोरोना आला. कोरोनामध्ये सगळं ठप्प झालं. लॉकडाऊनमध्ये मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला. शाळा, कॉलेज बंद. कोचिंग बंद. यामुळे मुलांच्या अभ्यासावर परिणाम झाला.

धनश्रीच्या आजूबाजूला राहणार्‍या पालकांनी धनश्रीला त्यांच्या मुलांना शिकवण्याविषयी विचारलं. खरं तर धनश्रीचा स्वत:चा अभ्यास चालू होता, पण तिनेही विचार केला आपण मुलांना शिकवलं तर त्यांचा फायदा होईल आणि आपलाही सराव होईल. यासोबत अर्थार्जनसुद्धा सुरू होईल. हे करता करता धनश्रीचा यात रस निर्माण झाला आणि इथेच ‘धनश्रीज् अकॅडमिक क्लासेस’ची सुरुवात झाली.


'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹२२२ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)

कोरोनाच्या काळात क्लासेस सुरू केले त्यामुळे ते घरातून सुरू झाले. आज धनश्री ऑनलाईन-ऑफलाईन असे दोन्ही प्रकारे क्लासेस घेते. ‘धनश्रीज् अकॅडमिक क्लासेस’ दहावीपर्यंत आहेत. विज्ञान, गणित, इंग्रजी, एसएसटी असे वेगवेगळे विषय ती शिकवते.

प्रत्येक मुलाकडे ती वैयक्तिक पातळीवर लक्ष देते. त्यांचे प्रश्न, समस्या सोडवायला त्यांना मदत करते. एखाद्या विषयात एखादा विद्यार्थी जर कच्चा असेल तर त्यावर काम करणं जास्त गरजेचं आहे, असं तिचं मत आहे. रीव्हिजन, सराव आणि कॉन्सेप्ट क्लिअर करण्यावर तिचा भर असतो.

धनश्री एसएससी व सीबीएससी बोर्डचे विषय शिकवते. त्यामुळे इंग्रजी, सेमी इंग्रजी माध्यमाची मुले तिच्याकडे येतात. मुलांना त्यांच्यातलंच एक होऊन कळेल अशा भाषेत संकल्पना नीट स्पष्ट कशा होतील यावर तिचा भर असतो.

कोरोना काळात मुलांचे खूप नुकसान झालं. अनेक मुलांना वाचताही येत नाही त्यामुळे अभ्यासात ती खूप मागे पडलीत. हे जसंजसं दिवस पुढे सरकले तसं तिच्या लक्षात आलं. या दोन वर्षांत विद्यार्थांचे शिक्षण बुडाल्याने त्यांना आताच्या अनेक गोष्टी शिकताना अडचणी येतात. मग त्यांना अगोदर त्या संकल्पना स्पष्ट कराव्या लागतात.

मग पुढचं शिकवावं लागतं. पण हे गरजेचं आहे, तरच मुलं नीट शिकू शकतात त्यामुळं धनश्री यांच्या वर्गात एका वेळी एका बॅचला फक्त सात ते आठ मुलंच घेते. या मागचा उद्देश हाच की त्यांना नीट वेळ देता येईल. हे ‘धनश्रीज् अकॅडमिक क्लासेस’ला इतरांपेक्षा विशेष करते.

मुलांना शिकवताना धनश्री डिजिटल बोर्डचा वापर करते. लाइव्ह डेमो, एक्सपेरिमेंटल किट्स यांचाही वापर करते. खूप वेगवेगळी चॅलेंज समोर येतात, पण वेळोवेळी त्यावर काम करून त्यांची वाटचाल चालू आहे.

दरम्यानच्या काळात धनश्रीचे लग्न झाले. पती सैन्यात असल्याने मग काही काळ ती पंजाबला गेली. तिथे आर्मी कॅम्पमध्ये राहिल्यावर तिच्या लक्षात आलं की तिथल्याही मुलांना हवं तसं कोचिंग मिळत नाही. कॅम्पमधून बाहेर जाणं प्रत्येक विद्यार्थ्याला शक्य नसतं. जरी बाहेर पडले तरी तीन ते चार किलोमीटर प्रवास असतो.

आपल्या महाराष्ट्रात जसं भौगोलिक वातावरण आहे, तसं सगळ्या राज्यात नसतं. हीसुद्धा एक अडचण शिक्षण घेताना मुलांना येते. कधी काही ठिकाणी खूप जास्त ऊन असतं तर कधी प्रचंड थंडी मग अशा वातावरणात मुलं बाहेर पडू शकत नाहीत. काही काळ तिथेसुद्धा धनश्रीने मुलांना शिकवलं.

आज धनश्री पुण्यात असते. इथूनच तिचे क्लासेस चालतात. म्हणूनच आर्मी कॅम्पमधील विद्यार्थ्यांनासुद्धा ऑनलाईन शिकवणी देण्याचा तिचा प्रयत्न आहे. याशिवाय धनश्रीला स्कॉलरशिप, नवोदय, एनएमएमएस, एनटीएसई, एमपीएससी असे स्पर्धा परीक्षेसाठीचे वर्गसुद्धा घ्यायचे आहेत.

या तिच्या प्रवासात कुटुंबाची भक्कम साथ आहे. लग्नानंतरसुद्धा आज पती आणि कुटुंबीय यांची खूप साथ आहे. म्हणूनच आज मी हे करू शकते, असं धनश्री सांगते. या प्रवासात विद्यार्थ्यांच्या पालकांचा विश्वास वाढलाय. आर्थिक, सामाजिक पातळीवरसुद्धा वाढ झालीय. त्यामुळे लवकरच तिला क्लासेसचा विस्तार करायचा आहे. त्या दृष्टीने तिचे प्रयत्न सुरू आहेत.

संपर्क : धनश्री – 96993 99536

Author

  • यांनी पदव्युत्तर पत्रकारितेत पदविका केली आहे. प्रिंट माध्यमांत काही काळ काम केल्यानंतर त्यांनी स्मार्ट उद्योजक हे मासिक सुरू केले.

    View all posts

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे वार्षिक वर्गणीदार होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस व्हिसिटिंग कार्डचं महत्त्व उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?