उद्योगोपयोगी

डिजिटल मार्केटिंग : गरज आजच्या व्यवसायाची

स्पेशल ऑफर : ₹५०० प्रिंट मासिकाची वार्षिक वर्गणी भरा आणि डिजिटल अंकात अर्ध पान रंगीत जाहिरात मोफत मिळवा!
Book Now: https://imjo.in/Xx7Uq6

आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे, सर्वच क्षेत्रांत जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. व्यवसाय क्षेत्रात ही स्पर्धा पाहायला मिळते. आपल्याला व्यवसाय वाढवायचा असेल, स्पर्धेत टिकून राहायचे असेल, तर आपले उत्पादन, सेवा, आपले नाव लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज असते आणि यासाठी आपण आपल्या व्यवसायाची जाहिरात करणे अनिवार्य असते.

वर्तमानपत्रे, बॅनर, लिफ्लेट, रेडिओ आणि टीव्ही यांसारख्या अनेक माध्यमांतून आपण आपल्या व्यवसाय, सेवा किंवा उत्पादनांची जाहिरात करीत असतो. हे सर्वच मार्ग खर्चीक तर असतातच, पण यांचा प्रभाव हा अतिशय अल्पकाळासाठीच असतो, थोडक्यात ही सर्व माध्यमे मर्यादितच असतात.


'स्मार्ट उद्योजक' डिजिटल मासिकाची आजीवन वर्गणी मिळवा फक्त ₹ १२३ मध्ये! सोबत आतापर्यंतचे सर्व अंकही मोफत मिळवा!

BOOK NOW: https://imojo.in/3x3a5zn


आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅबलेट आणि स्मार्टफोन घराघरांत पोहोचले असल्याने प्रत्येक व्यक्ती इंटरनेटच्या माध्यमातूनच जगाशी जोडला गेलेला आहे. जगातील एकूण लोकसंख्येच्या ४६.१% म्हणजेच ३,४२४,९७१,२३७ एवढे लोक इंटरनेटशी जोडले गेलेले आहेत.

या इंटरनेटच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या लोकांना आपला ग्राहक बनवण्यासाठी आपल्या व्यवसायाला इंटरनेटशी जोडणे अनिवार्य आहे. म्हणूनच आपणाला या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात नवीन, प्रभावी मार्केटिंग पद्धत वापरणे अनिवार्य आहे, ती मार्केटिंग पद्धत म्हणजे डिजिटल मार्केटिंग होय.

डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी वेबसाइट, सोशल मीडिया, सर्च इंजिन, गुगल अॅडवईस, मोबाईल अॅप्स, ई-मेल यांसारख्या विविध इंटरनेट माध्यमांचा वापर केला जातो.

डिजिटल मार्केटिंगसाठी लागणारा खर्च अतिशय कमी व खिशाला परवडणारा असल्याने सर्व क्षेत्रांतील व्यावसायिक याचा वापर करू शकतात, तसेच पारंपरिक मार्केटिंगपेक्षा जास्त प्रभावी असल्याने पारंपरिक मार्केटिंगच्या तुलनेने रिझल्ट चांगला मिळतो.

डिजिटल मार्केटिंग करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपल्या वस्तूची किंवा सेवांची मार्केटिंग करताना जो समाज आपल्याला ग्राहकवर्ग म्हणून हवा आहे त्यांनाच टार्गेट करून मार्केटिंग करू शकतो.

समजा, आपला ग्राहकवर्ग मुंबईमधील वरळी ते कुर्लामध्ये राहणारे विद्यार्थी ज्याचे वय १८ ते २५ आहे असे असतील, तर आपण मार्केटिंग करताना फक्त त्यांनाच टार्गेट करू शकतो ज्यामुळे मिळणारा रिझल्ट हा चांगलाच मिळतो.

डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी विविध इंटरनेट माध्यमांचा उपयोग केला जातो. त्यातील काही माध्यमांविषयी थोडक्यात माहिती पाहू या.

वेबसाइट

वेबसाइट हे डिजिटल मार्केटिंगचे सर्वांत महत्त्वाचे आणि प्रभावी माध्यम आहे. वेबसाइटशिवाय डिजिटल मार्केटिंगचा हेतू पूर्णच होऊ शकत नाही. डिजिटल मार्केटिंगच्या इतर माध्यमांतून वापरकर्त्याला आपल्या वेबसाइटवर घेऊन जाणे हा प्रमुख हेतू असतो. तो वापरकर्ता आपली वेबसाइट पाहून आपल्या कंपनीविषयी मत तयार करत असतो, त्यामुळे आपल्या वेबसाइटवर आलेल्या वापरकर्त्यांचे समाधान करणे, तसेच त्याला आपल्या वस्तू व सेवा विकत घेण्यास प्रेरित करून त्यास आपले ग्राहक बनवणे हे वेबसाइटचे मुख्य काम असते.

सोशल मीडिया

फेसबुक, यूट्यूब, गुगल प्लस, ट्विटर, लिंक्डइन, पिंटरेस्ट यांसारख्या अनेक सोशल मीडियाचा वापर करून आपल्या वस्तू किंवा सेवांची मार्केटिंग आपण मोफत किंवा अतिशय कमी पैशात करू शकतो.

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन ही ऑरगॅनिक सर्च इंजिनमध्ये वरच्या स्थानी (सर्वात वरती) येण्यासाठीची एक प्रोसेस आहे. समजा, आपली प्रिंटिंग प्रेस मुंबईमध्ये आहे. जर एका व्यक्तीला प्रिंटिंगचे काम करायचे आहे, तर तो सर्च इंजिन (उदा. गुगल) मध्ये जाऊन ’Printing Press in Mumbai’ असे टाइप करेल तेव्हा आपल्या कंपनीची वेबसाइट वरच्या (उच्च) स्थानी येण्यासाठी करावी लागणारी प्रोसेस म्हणजेच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. २०० पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रोसेस आहेत ज्यामुळे आपली कंपनी सर्च इंजिनमध्ये वरच्या स्थानी येऊ शकते.

हे ई-बुक खरेदी करण्यासाठी जाहिरातीवर क्लिक करा.

गुगल ऍडवर्डस

गुगल ऍडवर्डस ही एक ऑनलाइन जाहिरात सेवा असून की-वर्ड, डिस्प्ले बॅनर, व्हिडीओ ऍडचा वापर करून आपल्या बजेटमध्ये जाहिरातीची मोहीम राबवू शकतो. आपल्या जाहिरातीवर वापरकर्त्याने क्लिक केल्यास आपल्या गुगल खात्यामधील पैसे कमी होतात तसेच तो वापरकर्ता कंपनीच्या वेबसाइटवर आपोआप गेला जातो.

मोबाईल अॅप्स

सध्या जगातील एकूण इंटरनेट युजरपैकी ८०% पेक्षा जास्त लोक स्मार्टफोनचा वापर करत असल्याने या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या कंपनीचे, वस्तू किंवा सेवांची माहिती असलेले मोबाइल अॅप्स तयार करणे ही आजच्या काळाची गरज झालेली आहे. कंपनीच्या मोबाइल अॅप्सद्वारे लोक त्यांना हव्या असलेल्या वस्तू किंवा सेवा विकत घेऊ शकतात.

ई-मेल

ई-मेल मार्केटिंग ही डिजिटल मार्केटिंगमधील सर्वात सोपी आणि अतिशय महत्त्वाची पद्धत आहे. ई-मेल मार्केटिंगचा वापर करून नवीन ग्राहक मिळवू शकतो तसेच आपल्या ग्राहकांना आपल्या कंपनीची माहिती, नवीन वस्तू किंवा सेवांची माहिती, नवीन ऑफर्स याविषयी ई-मेलद्वारे कळवू शकतो, ज्यामुळे ते ग्राहक आपल्या वस्तू किंवा सेवा पुनःपुन्हा विकत घेतील.

आज डिजिटल मार्केटिंग करणार्‍या अनेक प्रोफेशनल कंपन्या मार्केटमध्ये आहेत, त्या आपल्याला आपल्या व्यवसायाची डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी मदत करू शकतात. तुम्हाला तुमच्या कंपनीची वेबसाइट, सोशल मीडिया, सर्च इंजिन, गुगल अॅडवर्ड्स, मोबाइल अॅप्स, ई-मेल या डिजिटल मार्केटिंग सेवाविषयी मदत हवी असल्यास माझ्याशी संपर्क करू शकता.

– जोतीराम सपकाळ
(लेखक डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत आहेत.)
संपर्क : ८१०८५५१५५१


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!