ओमकाराने जीवनशैलीत बदल करा


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


ओम ध्यानसाधनेला भारतीय जीवनात अत्यंत महत्त्व आहे. ओमकाराला अनाहत नाद असे म्हणतात. विश्वातील पहिला नाद हा ओमकार आहे. ओंकार हा ‘अ’कार, ‘उ’कार व ‘म’कार अशा तीन वर्णांनी बनलेला आहे. ओमकाराला प्रणव म्हटले आहे. प्रणव म्हणजे भगवंतासाठी उच्चारलेला स्तुतिपर शब्द. ओमकार हा आद्य स्वर असल्यामुळे ओमकाररुपी गणेशाला आपण आदी देवता म्हणतो.

कोणत्याही देवतेच्या पूजनाआधी गणेशाचे पूजन केले जाते. ओम मंत्राने आपल्या जीवनात सखोल परिणाम होतो. पण आपण ते जाणून न घेतल्यामुळे आपल्या अंतरात्म्याशी आपण एकरुप होऊ शकत नाही. ओम ध्यानसाधनेमुळे आपण आपल्या अंतरात्म्याशी एकरुप होतो. आपल्या दैनंदिन जीनवात आमुलाग्र बदल होतात व आपल्याला सुदृढ आयुष्य लाभते. म्हणूनच ओमला पवित्र चिन्ह मानले जाते.

ओमकार ध्यानसाधनेचे तंत्र :

  • एका शांत जागेची निवड करा.
  • ती जागा आरामदायक आणि सुखकारक असायला हवी.
  • आपले डोळे बंद करा आणि आपले स्नायू व नसा शिथील ठेवा.
  • आपल्या भुवयांमध्ये लक्ष केंद्रीत करा आणि शांत रहा.
  • आपले बहीर्मन शांत ठेवा आणि कशाचाही विचार करु नका, फक्त लक्ष केंद्रीत करा.
  • ओमकाराचा प्रारंभ करा, मनात अनंतकाळ, अमरत्व, असीम, आनंद अशा कल्पना करा. तुम्ही स्वतःला असीम आणि जणू तुम्ही ब्रह्मांडाला व्यापलेले आहात असे समजा.
  • केवल ओमचा पुनरुच्चार न करता, अर्थासहीत उच्चार करा. ओमकार उच्चारतान अत्याचा अर्थ मनात लक्षात ठेवा.
  • तुम्हाला हळूहळू पवित्र आणि परिपूर्ण वाटू लागेल. तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला सर्व काही माहित आहे आणि तुम्ही एका पक्षाप्रमाने मुक्त आहात.
  • तुमच्या शरीराच्या प्रत्येक भागात या विचाराने तरंग उठले पाहिजे. जेणेकरुन केवळ तुमचे मन नव्हे तर तुमचे शरीर, तुमच्या संवेदनासुद्धा ओमकाराच्या या पवित्र भावनेत मग्न होईल.
  • ही साधना न चुकता दररोज करा आणि विश्वास, प्रामाणिकपणा, उत्साह आणि चिकाटीने हे करा. सकाळ, सूर्यास्ताच्या वेळी आणि संध्याकाळी ही ओमकार ध्यानसाधना करता येईल.

ओमकार ध्यानसाधनेचे फायदे :

  • ओम ध्यानसाधनेमुळे आजार बरे होतात, असे म्हटले जाते. तुमच्य असंपूर्न शरीरात कंपन होते, त्यामुळे तुम्हाला सकारात्मक वाटू लागते व तुम्ही आयुष्याकडे अधिक गांभीर्याने पाहू लागता. यामुळे अध्यात्मिक होता.
    ओमकारामुळे तुमचे मन विचलित होत नाही.
  • जर तुम्ही उदासीन असाल तर लगेच ध्यानसाधना करावी. किमान ५० वेळा ओमकार जपा आनि तुम्हाला बरे वाटेल. तुमचा थकवा दूर होऊन, तुमच्या मेंदूला शांती मिळेल.
  • ज्यांना आत्मसन्मान मिळवायचा आहे, त्यांना ओमकारामुळे आमुलाग्र बदल दिसून येईल.
  • जर तुम्ही दीर्घकाळ ओम नामाचा जप करीत असाल, तर तुम्हाला प्रभावी आणि गोड वाणी प्राप्त होईल. सतत तालबद्ध ओमकाराने तुमचे मन खंबीर होईल.
  • तुम्हाला अशी जाणीव होईल की तुम्हाला एक वेगळी आणि आंतरिक शक्ती प्राप्त झाली आहे. तुम्ही येणार्‍या समस्यांशी दोन हात करायला सज्ज होता आणि या जगात तुम्ही मानाचे स्थान पटकावता. हे तुमच्या डोळ्यातून आणि चेहर्‍यातून दिसून येते.
  • ओमकारात वैश्विक ऊर्जा सामावलेली आहे, त्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मकता येते आणि तुम्हाला शुद्ध झाल्यासारखे वाटते.
  • या ध्यानसाधनेमुळे एक महत्वाचा बदल घडतो तो असा की तुम्ही चांगले विचार करु लागता आणि तुमची एकाग्रता वाढते.

हे लक्षात ठेवा :

अशा योग्य वातावरणाची निवड करा, जी जाग अनिर्जन असेल व तुम्ही योग्य पद्धतीने ध्यान करू शकाल. ओमकार करताना “ओ”पेक्षा “म”वर अधिक जोर द्या. या मंत्रोच्चारामुळे आपल्या भोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तुम्ही जप करत असताना जी स्पंदनं उमटतात, त्याचा प्रत्यय तुम्हाला येईल व ती स्पंदने तुम्हाला जाणवू लागतील आणि तुम्हाला फारच शांत व वेगळे वाटू लागेल.

– टीम स्मार्ट उद्योजक

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?