Advertisement
उद्योजकता

तुमच्या शालेय शिक्षणाबद्दल चिंता करू नका

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


हेन्‍री फोर्ड

तुमच्या शालेय शिक्षणाचा आणि तुमच्या यशाचा तसा काही संबंध नाही. आज अशा अनेक व्यक्ती तुमच्या आजूबाजूला तुम्हाला दिसतील, की ज्या शिक्षण क्षेत्रातील अनेक पदव्या घेऊन अपयशाच्या गर्तेत अडकलेले आहेत.

याउलट त्या मानाने कमी शिकलेले, परंतु यशाच्या नियमाचे पालन करणारे जगावर आणि लोकांच्या मनावर राज्य करत आहेत. उच्च-शिक्षित असलेले अनेक पदवीधर या लोकांसाठी कामं करताना दिसताहेत.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

याचा अर्थ असा नाही की, आपण शालेय शिक्षण घेऊच नये. घ्यावं, परंतु आजच्या घडीला व्यावहारिक ज्ञान असणंही तेवढंच गरजेचं आहे. असं म्हटलं जातं की, या आजच्या जगात, “पुस्तकांपेक्षा माणसंच जास्त शिकवतात, म्हणून जरी पुस्तकं वाचली नाहीत, तरी किमान माणसं वाचायला शिका. जास्त यशस्वी व्हाल.”

या आयुष्यात कमी शालेय शिक्षण घेतलेली, परंतु उभ्या आयुष्यात प्रचंड यश संपादन केलेली अनेक नावं आपल्या समोर आहेत.

त्यात फोर्ड या अमेरिकन मोटार कंपनीचे संस्थापक हेन्‍री फोर्ड, क्रिकेटविश्वाचं दुसरं नाव सचिन तेंडुलकर, आजच्या घडीला जगातील पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत असलेले आणि मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे संस्थापक बिल गेट्स, अशा अनेक नामवंत मंडळींचं शालेय शिक्षण तसं मोजकंच आहे, किंबहुना तुमच्यापेक्षाही कमी आहे; परंतु त्यांच्या आवडत्या विषयात ते कष्टाच्या जोरावर आणि यशाच्या नियमावर वाटचाल करत आज यशस्वितांच्या यादीत दीपस्तंभ बनले आहेत. शालेय शिक्षणाचा आणि यशाचा तसा काही संबंध नाही.

हे होऊ शकत!

१. शालेय शिक्षण आणि यश यांच्यात तफावत असू शकते.
२. तुमचं शिक्षण बघून यश तुमच्या खिशात येत नाही.
३. तुमची गुणवत्ता, तुम्ही करत असलेली कृती आणि त्याच्यासोबत तुम्ही वापरत असलेल्या यशाच्या मंत्रांचा उपयोग तुम्हाला यशस्वी करू शकतो.
४. तुमचा शालेय शिक्षणात तसा रस जास्त नसू शकतो, परंतु प्रत्यक्षात येणार्‍या आव्हानांशी दोन हात करण्याची कला तुमच्याकडे चांगल्या प्रकारे असू शकते.

५. तुम्ही तुमच्या शैक्षणिक आयुष्यात जरी अपयशी असलात, तरी तुम्ही यशाची शिखरं पादाक्रांत करू शकता. त्याला कसलीच मर्यादा नाही.
६. लोकांच्या मनात प्रथम तुमच्या यशाविषयी साशंकता असू शकते, परंतु तुमची कृतीच त्यांना उत्तर देऊ शकते.
७. आपल्या कर्तृत्वाने मोठेपण प्राप्त केलेली अनेक नामवंत मंडळी, ह्या त्यांच्या शैक्षणिक आयुष्यात फार मोठं नाव नव्हतं.

हे करून तर बघा!

१. तुम्ही फक्त तुमच्या शालेय शिक्षणालाच महत्त्व न देता, तुम्हाला यशाकडे नेणार्‍या मार्गावर जास्त लक्ष द्या.
२. तुम्हाला यशस्वी करणार्‍या गोष्टी आत्मसात करा.
३. त्यासाठी पुस्तके वाचा, व्हिडीओज् पहा, ट्रेनिंग घ्या, तुमचा वैयक्तिक कोच नेमा व आयुष्यात यशस्वी व्हा.
४. तुम्हाला तुमचं यशच ‘हिरो’ बनवतं, शिक्षण नाही.

५. मोठं यश संपादन केलेल्या अनेक व्यक्ती, या त्यांच्या शालेय कारकीर्दीत सर्वसाधारण गुण मिळवणारे होते आणि बरेच जण तर नापास झालेले किंवा शिक्षकांनी शाळेतून हाकललेले आहेत.
६. केवळ शालेय शिक्षणावर फोकस करण्यापेक्षा, तुम्हाला यशाकडे घेऊन जाणार्‍या रस्त्यांवर चला.
७. तुम्हाला तुमची क्षमता आणि यशस्वी होण्याची ज्वलंत इच्छाशक्तीच यशस्वी करू शकते.
८. आयुष्य हे फार सुंदर शिक्षण देत असतं.

९. इथे रोजच परीक्षा असते आणि रोजच तुमचा निकाल/रिझल्ट लागत असतो.
१०. तुम्हाला कोणता प्रश्न विचारला जाईल याची खात्री नसते.
११. परंतु तुम्ही काही नियमांचं पालन केलंत, तर तुम्हाला यशापासून कोणीच रोखू शकत नाही, हे नक्की.
१२. माणसं आणि परिस्थितीच तुम्हाला पुस्तकांपेक्षा जास्त शिकवत असते, त्याचा अभ्यास करा.

– विश्वास वाडे


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!