जे करायला आवडत नाही, परंतु आवश्यक आहे ते कराच!

यशाच्या या प्रवासात आपण बघितलेल्या अनेक विचारांपैकी हा एक प्रभावी विचार आहे, परंतु त्याला कृतीची जोड द्यायला लावणारा एक प्रभावशाली विचार आहे. तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हीही त्याचं अनुकरण करायला काही हरकत नाही.

जे तुम्हाला करायला आवडत नाही, परंतु आवश्यक आहे आणि आतापर्यंत तुम्ही ज्या गोष्टी टाळत आलेले आहात. आयुष्यात यशस्वी झालेल्या व्यक्तींनीही त्या गोष्टी केल्या, ज्या त्यांना मुळीच आवडणार्‍या नव्हत्या, परंतु त्या करणं आवश्यक होत्या.

तुमच्या बाबतीतही हेच सूत्र लागू पडतं. तुम्हाला सकाळी उठून व्यायाम करायचा कंटाळा येतो, मग तेच करा. तुम्हाला वेगवेगळ्या विषयांचं ट्रेनिंग घ्यायला आवडत नाही, नेमकं तेच करा. तुम्हाला पुस्तकं वाचायचा कंटाळा येतो, नेमकं तेच करा. तुम्हाला रोज दाढी करायला आवडत नाही, परंतु तुमच्या प्रोफेशनमध्ये आवश्यक आहे, तर तेच करा.

तुम्हाला कोट घालणं, टाय बांधणं आवडत नाही, परंतु तुमच्या व्यवसायात त्याची आवश्यकता आहे, तर तेच करा. अशाने तुम्हाला यशाची शिखरं साद घालू लागतील. फक्त करायची तयारी ठेवा, मनाची तयारी ठेवा आणि मोठ्या यशाला तयार राहा. तुमची प्राथमिकताच तुमच्या यशाची व्याख्या ठरवत असते.

हे होऊ शकतं!

 • तुम्ही आतापर्यंत टाळत आलेल्या, परंतु तुमच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या गोष्टी तुम्ही करू लागता.
 • तुमच्या यशातला अडथळा हटू शकतो.
 • तुम्ही ज्या गोष्टींपासून दूर पळत होतात, पुढे त्याच तुम्हाला नव्या मार्गावर आणून ठेवू शकतात.
 • थोड्याच दिवसांत तुमची मास्टरी ही तुम्ही आतापर्यंत चुकवू पाहत असलेल्या विषयात होऊ शकते.
 • अशाने तुमचा आत्मविश्वास कित्येक पटीने वाढतो.
 • नव्या दमाचा आत्मविश्वास तुमच्या अंगात बारा हत्तींचं बळ देऊ शकतो.
 • अशाने तुम्ही यशाच्या अनेक पावलं जवळ जाता.
 • तुमची प्राथमिकता यशाविषयीचा तुमचा दृष्टिकोन बदलते.

हे करून तर बघा!

 • तुम्हाला यशस्वी व्हायला आवश्यक असणार्‍या, परंतु तुम्ही सध्या करत नसलेल्या गोष्टींची यादी करा.
 • त्या गोष्टींची त्यांच्या गरजेनुसार प्राथमिकता ठरवा आणि त्वरित अमलात आणा.
 • सध्या त्या गोष्टी न केल्यामुळे झालेल्या नुकसानाची यादी करा.
 • तुम्ही टाळत असलेल्या गोष्टी तुम्ही लवकरच करायला सुरू करणार आहात, हे तारखेससह किमान चार-पाच व्यक्तींना सांगा.
 • जो तुम्हाला प्रश्‍न विचारू शकतो त्याला या गोष्टींविषयी ‘कमिटमेट’ द्या.
 • अशाने तुमच्यावर त्या गोष्टी लवकर करण्याचा दबाव येईल व तुम्ही त्या करू लागाल.
 • सुरुवातीला कंटाळा येईल, परंतु तुम्ही स्वतः हरू नका. करत राहा, करत राहा आणि करत राहा.
 • पुढे याची तुम्हाला सवय होईल व तुम्हाला यातही आनंद वाटू लागेल.

– विश्वास वाडे

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?