स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
काही वर्षांपूर्वी इंटरनेट वापरणारे लोक माहिती वेबसाइट, ब्लॉग, चित्रे इत्यादीच्या माध्यमातून मिळवायचे; परंतु जेव्हापासून युट्युब तसेच सोशल मीडियावर व्हिडीओ वापरण्याचा वेग वाढला आहे, तेव्हा आपल्या नावाचा प्रचार व प्रसारासाठी सर्व व्यक्ती, संस्था, ब्रँड यांनी व्हिडीओ बनवून त्याद्वारे आपला प्रसार करण्यास सुरुवात केली.
आज जगभर शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंट्री मेकिंग व सेलिंग उद्योग जोरदार सुरू आहे. उदा. शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, एखाद्या पार्टी, संस्था किंवा व्यक्तीच्या कार्याची ओळख सांगण्यासाठी, एखाद्या ब्रँड, प्रॉडक्ट सेवांचा उपयोग, वापर कसा करायचा याची संपूर्ण माहिती सांगण्यासाठी, तसेच एखादी घटना एखाद्या लहान आकाराच्या चित्रपटाप्रमाणे दाखवण्यासाठी शॉर्ट फिल्म किंवा डॉक्युमेंट्री बनवली जाते. सर्वसाधारण डॉक्युमेंट्री या ३० मिनिटे ते १ तासाच्या असतात.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
अगदी ताजं उदाहरण द्यायचं झालं म्हणजे नागराज मंजुळेनी केवळ १० लाखांत बनविलेली शॉर्ट फिल्म ‘पिस्तुल्या’ जगभर गाजली, त्याला अनेक अॅवॉर्ड्स मिळाले.
त्यातूनच पुढे ‘फॅन्ड्री’, ‘सैराट’सारख्या चित्रपटांना त्याला फायनान्स करणारे मोठे निर्माते मिळाले, म्हणजे डॉक्युमेंट्री बिझनेसमध्ये १० लाखांतून १०० कोटीपर्यंत जाण्याची ताकद आहे. या व्यवसायासाठी तुमची बुद्धी, मन हे कलाकाराचं असावं लागतं. तुम्हाला कथा, स्क्रिप्ट, कथेचा फ्लो, कॅमेरा, अभिनय इत्यादीबद्दल माहिती घ्यावी लागते. या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी तुम्हाला १० ते १५ लाखांचे भांडवल असावे लागते, त्याचबरोबर ह्या क्षेत्राची सखोल माहिती घ्यावी लागेल.
तुम्ही सतत एखाद्या चांगल्या कथेच्या शोधात असलात पाहिजे. चांगली स्टोरी हाताला लागली की तुम्ही शॉर्ट फिल्म बनवू शकता. कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन व अनेक संस्थासुद्धा मदत करतात. अशा शॉर्ट फिल्म अनेक डिजिटल फ्लॅटफॉर्मवर विकल्या जातात. तसेच तुम्हाला एखाद्या विषयावर फिल्म बनवण्यासाठीसुद्धा काम मिळते.
उदा. एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर शॉर्ट फिल्म, एखाद्या उत्पादनावर किंवा एखाद्या कंपनीवर फिल्म बनवणे वगैरे अशा एखाद्या शॉर्ट फिल्मचे काम तुम्हाला मिळाले तर सर्वसाधारण ३० ते ४५ लाखांचे असते. अगदी एकाच फिल्मच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तुमचे सर्व भांडवल वसूल होते.
तुम्हाला मराठी, हिंदी, इंग्रजी किंवा इतर भाषांमध्येसुद्धा फिल्म बनविण्याचे काम मिळते. ह्याच डॉक्युमेंट्री मेकिंग उद्योगातून पुढे तुम्हाला मोठ्या चित्रपटाचा निर्माता, दिग्दर्शक होण्याची वाट सापडते. ह्यासाठी तुम्हाला २० बाय १० ची खोली, कॅमेरा व शूटिंग साहित्य, २ ते ३ मदतनीस व सुमारे १० लाखांचे भांडवल असल्यास तुमचा हा उद्योग सुरू करता येतो. महिना 1 लाख नफा मिळू शकतो.
– प्रकाश भोसले
स्मार्ट उद्योजक पोर्टलवर तुमची यशोगाथा मांडण्यासाठी येथे क्लिक करा
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.