सुक्या फुलांचा नाविन्यपूर्ण उद्योग

आंतरराष्ट्रीय आणि भारतीय बाजारात सुक्या फुलांना खूप मागणी आहे. आपला देश जपान, यूरोप, अमेरिका आदी देशांना याची निर्यात करतो. आपला मुख्य ग्राहक इंग्लंड हा देश आहे.

आपला देश निसर्गसंपन्न आहे, त्यामुळेच आपल्या देशात फुलांचे वैविध्यपूर्ण असे सर्वात जास्त प्रकार उपलब्ध आहेत. त्यामुळे आपला देश या व्यवसायात अग्रस्थानी आहे.

उद्योग सुरू करताना आपल्याला काही पारंपरिक उद्योगांचीच माहिती असते, परंतु असे अनेक उद्योग आहेत ज्याद्वारे उत्पादनाचे साधनही प्राप्त होते आणि नावीन्यपूर्ण कामाचा आनंदही मिळतो.

सुक्या फुलाचे उत्पादन करणे हासुद्धा एक असाच उद्योग आहे. याची बाजारपेठ ही खूप मोठी आहे. आपल्याला मात्र याची माहिती फार कमी प्रमाणात असते. सुक्या फुलांचा आणि त्यातही निवडक सुक्या फुलांचा उद्योग हा आजघडीला जगातला खूपच फायदेशीर उद्योग आहे.

सध्याच्या शेती क्षेत्रात फुलशेती करणे हा एक नवा ट्रेंड रुजू पाहतोय. मागील दहा वर्षांत सुक्या फुलांना खूपच मागणी वाढली आहे. तुम्हाला बागकाम करायला आवडत असेल आणि बागकामाला जोडव्यवसाय हवा असेल, तर या उद्योगाचा नक्की विचार करा.

नव्यानेच उद्योगजीवनाची सुरुवात करत असाल, तर सुक्या फुलांचा उद्योग हा एक असा पर्याय आहे, ज्याने तुम्ही अल्पावधीतच आपला जम बसवू शकाल. कमी खर्चात आणि घरच्या घरी तुम्हाला याची सुरुवात करता येऊ शकते.

सुक्या फुलांचा उद्योग करताना सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे फुलांच्या दर्जाची काळजी घेणे आणि आपली बाजारपेठ समजून घेणे, कुठे या फुलांना मागणी आहे याचा अभ्यास करणे. आपण पीक घेत असलेली फुले कोणत्या दर्जाची आहेत यावरून त्याची किंमत आणि मागणी कळते.

या उद्योगात यशस्वी होण्यासाठी फुलांच्या जातीची योग्य निवड करता आली पाहिजे. त्याचे व्यवस्थित नियोजन होणे आवश्यक असते, कारण काही फुले सुकली की, त्यांचा कस नाहीसा होतो. मग त्याचा आपणास काही फायदा होत नाही.

सुक्या फुलांना अविनाशी म्हणूनही ओळखले जाते. Celosia आणि Straw ही अशीच अविनाशी फुलं आहेत. ही फुलं जोपासणं आणि वाढवणं सोपं आहे तसेच ती सुकवणंही सहज शक्य आहे. हवेवरच ही सुकवता येतात. यासाठी तुम्हाला उत्तम बाजारपेठ म्हणजे क्राफ्ट शॉप, अँटिक शॉप तसेच विविध रेस्टॉरंट किंवा फुलांची सजावट करणारे व्यावसायिक.

फुलांसोबत त्यांचे कोंब, देठ, बिया, सालं इ. गोष्टींचीसुद्धा निर्यात केली जाते. भारतीय निर्यातीपैकी सुमारे शंभर कोटींची निर्यात ही या व्यवसायातून होते.

सुक्या फुलांचा वापर नक्की कशाकशात होतो असा तुमचा प्रश्न असेल, तर हातकागद, कँडल होल्डर, ज्यूटच्या पिशव्या, वॉल हँगिंग, फोटो फ्रेम, बॉक्स, पुस्तके अशा एक ना अनेक प्रकारच्या वस्तू यापासून तयार होतात. या उद्योगातून वीस देशांत पाचशे प्रकारच्या फुलांचे प्रकार पाठवले जातात.

एकदा का उद्योगात जम बसला, की त्याच्या वाढीसाठी अनेक प्रकारचे पर्याय उपलब्ध होतात. मोठ्या जागेत फुलांची शेती करून किंवा मोठ्या प्रमाणात फुलं विकत घेऊन आपण सुकवू शकतो आणि ही फुलं घाऊक भावाने विकता येतील.

फुलांची कापणी आपण कशी करतो हेही महत्त्वाचे आहे. योग्य वेळी फुलांची कापणी करण्याची काळजी आपण घ्यायला हवी. फूलं संपूर्ण फुललेली असणं ही त्यांच्या कापणीची योग्य वेळ आहे.

आंतरराष्ट्रीय आणि भारतीय बाजारात सुक्या फुलांना खूप मागणी आहे. आपला देश जपान, यूरोप, अमेरिका आदी देशांना याची निर्यात करतो. आपला मुख्य ग्राहक इंग्लंड हा देश आहे. आपला देश निसर्गसंपन्न आहे, त्यामुळेच आपल्या देशात फुलांचे वैविध्यपूर्ण असे सर्वात जास्त प्रकार उपलब्ध आहेत. त्यामुळे आपला देश या व्यवसायात अग्रस्थानी आहे.

फुले सुकवण्याच्याही विविध पद्धती आहेत. फुलं सुकवताना त्याला बुरशी लागण्याची शक्यता जास्त असते. उन्हाळ्यात फुलं उन्हात सुकवणं सोपं आणि पर्यायाने स्वस्तही पडतं, परंतु पावसाळ्यात किंवा थंडीत फुलांचे गुच्छ बांधून ते खुंट्यांना टांगून ठेवून सुकवावे लागतात. त्यांची खूप काळजी घ्यावी लागते.

व्यवसायासाठी पर्याय शोधणार्‍यांनी या पर्यायाचा जरूर विचार करावा. आपल्या देशाच्या कृषी विभागातून या व्यवसायाविषयी अधिक माहिती मिळू शकते. पूरक व्यवसाय म्हणूनही याचा विचार करता येऊ शकतो.

सुक्या फुलांची गुणवत्ता ही आपण ती कशी सुकवतो त्यानुसार ठरते. फुले सुकवण्याच्या विविध पद्धती आपल्याकडे उपलब्ध आहेत. भारतात NBRI लखनऊ ही पहिली संस्था आहे, जिथे फुले सुकवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. अधिक माहितीसाठी NBRI च्या www.nbri.res.in या संकेतस्थळाला भेट द्या.

फुले सुकवण्यासाठी विविध प्रकारच्या पद्धतींचा शोध घेऊन त्यावर संशोधन करण्याचे काम इथे केले जाते. देशातील विविध ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. तसेच लोकांमध्ये जास्तीत जास्त या व्यवसायाची ओळख व्हावी यासाठी वेळोवेळी जनजागृतीचे कार्यक्रमही केले जातात.

आपल्याकडील बेरोजगार तरुण, शहरी/निमशहरी भागातील स्त्रिया, निवृत्त, विद्यार्थी आणि छोटे शेतकरी यांना आपली आर्थिक आणि सामाजिक पत सुधारण्याची संधी या कार्यक्रमातून लोकांना देण्याचा प्रयत्न आहे.

फुले खुडण्यासाठी आणि वाळवण्यासाठी उत्तम काळ

फुले सकाळच्या वेळी जेव्हा त्यांच्यावरील दव उडून जाते तेव्हा खुडावीत. एकदा खुडल्यावर देठ एकत्र करून त्यांना रबर बँडने बांधा आणि शक्यतो लवकर उन्हातून बाजूला करा.

उन्हात वाळवणे :

  • उन्हात वाळवणे हा सर्वात सोपा आणि स्वस्त उपाय आहे, पण पावसाळ्यात हे शक्य नसते.
  • फुलांचे गुच्छ दोरीने बांधून बांबूच्या काड्यांनी लोंबते ठेवतात. रसायनांचा वापर करीत नसतात. चांगले वायविजन मात्र हवे.
  • या पद्धतीत बुरशी लागण्याचा फार धोका असतो.

व्यावसायिक सुक्या फुलांचे उत्पादन
फुले व वनस्पतींचे भाग :

कोंबड्याचा तुरा, जाई, अमरांथस, ऍरेका आणि नारळाची पाने आणि खुडलेली फुले या वर्गात येतात. सुकी पाने व कोंब देखील वापरतात. गेल्या वीस वर्षांपासून भारत या प्रकारची निर्यात करीत आहे.

https://www.youtube.com/watch?v=bHwcLdek0gQ

पॉटपाउरी

  • हे सुगंधी सैल अशा सुक्यात फुलांचे मिश्रण आहे जे एका पॉलिथीनच्या पिशवीत ठेवतात.
  • सामान्यपणे कपाटांत ड्रॉवरमध्ये किवा बाथरूममध्ये ठेवतात.
  • या पद्धतीत तीनशेपेक्षा जास्त प्रकारच्या फुलांचा समावेश आहे.
  • बॅचलर्स बटन, कोंबड्याचा तुरा, जाई, गुलाबाच्या  पाकळ्या, बोगनविलियाची फुले, कडुलिंबाची पाने आणि फळांच्या बिया इत्यादींचा उपयोग भारतात पॉटपाउरीसाठी करतात.
  • सुके देठ आणि कोंब वापरतात. याची मागणी कमी असली तरी उच्च उत्पन्न वर्गातून याचा वापर आहे व पैसेही जास्त मिळतात. साधारणपणे वापरात येणारे पदार्थ आहेत कापसाच्या वाळलेल्या बिया, पाइनची फुले, सुक्या मिरच्या, सुका दुधी भोपळा, गवत, जाईचे रोपटे, एव्हरलास्टिंग फुले, अस्पॅ्रॅगसची पाने, फर्नची पाने, झाडांच्या साली आणि तुरे.

सुक्या फुलांची हस्तकला

सुक्या फुलांच्या बाजारातील अलीकडचा विकास. सुक्या फुलांच्या तसबिरी, ग्रीटिंग कार्डे, बुके, कँडल स्टॅण्ड, काचेचे बाऊल यांचा वापर या फुलांच्या रचना करण्यासाठी वापरतात.

– प्रतिभा राजपूत
(लेखिका ‘स्मार्ट उद्योजक’च्या कार्यकारी संपादक आहेत.)

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?