आजुबाजूच्या आवाजांचा तुमच्या व्यवसायावर होणारा परिणाम


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


हे शब्द ऐकताच आपल्याला आठवतो तो अमीन सयानी. चार दशकांहून अधिक काळासाठी ‘बिनाका गीतमाला’ नावाच्या एका जबरदस्त यशस्वी रेडिओ कार्यक्रमाचे तो सूत्रसंचालन करायचा, रेडिओ सिलोनवर किंवा आपण असे म्हणू शकू की, तो सूत्रसंचालन करायचा म्हणून तो कार्यक्रम इतका जबरदस्त यशस्वी झाला.

त्याच्या आवाजावर जनता अगदी फिदा असायची. काही काही वेळा तर गीतांपेक्षादेखील त्याच्या टिप्पण्या जास्त नावाजल्या जायच्या. त्यानंतरच्या काळात अमिताभ बच्चन यांच्या आवाजानेदेखील लोकांना असेच भुलवून टाकले आहे. या आवाजांमध्ये नक्कीच काही तरी खास आहे.

त्या खास गोष्टीमुळे माणूस त्याकडे आकर्षिला जातो. त्याच वेळी सिनेमातील प्रेम चोप्राचा आवाज घ्या किंवा शक्ती कपूरचा संवाद घ्या, याबद्दल एक प्रकारची बिभत्सता किंवा किळस जाणवते आणि ते त्यांच्या सिनेमातील भूमिकेला पोषकच असते. सिनेमा हे दृक्श्राव्य माध्यम असून प्रत्येक संवाद डब करून नंतर सिनेमात घातला जातो तो या प्रकारचा परिणाम मिळावा म्हणून.

वानगीखातर आठवा पाहू. जॉनी वॉकरचा चिरका आवाज, शमशाद बेगमचा किनरा आवाज, रजा मुरादचा भारदस्त आवाज, परेश रावलचा गोंधळ्या आवाज, अक्षयकुमारचा खेळकर आवाज आणि अर्थात गब्बर सिंगचा कितने आदमी थे?

आता हे आवाज जरा एकाचे दुसर्‍याला लावून पहा बघू. म्हणजे गब्बरसिंगच्या आवाजात जॉनी वॉकरचे संवाद. परेश रावलच्या गळ्यात रजा मुरादचा आवाज. येथेच मुद्दा येतो आवाजाच्या सुसंगतीचा आणि विसंगतीचा.

आपल्या उद्योग क्षेत्रात अनेक प्रकारचे आवाज असतात. त्यात काही आपल्या उद्योगाशी सुसंगत असतात तर काही विसंगत. सुसंगत आवाजामुळे आपल्या उद्योगाची प्रत वाढते, तर विसंगत आवाजामुळे आपल्या उद्योगाची प्रत कमी होते. या प्रतीचा अर्थातच इतर अनेक गोष्टींवर कमी किंवा अधिक प्रमाणात परिणाम होतो. कसे ते आपण पाहू.

ऑफिस, फॅक्टरी किंवा दुकानात आपल्याला ऐकू येणारे आवाज व त्यांची प्रतवारी खालीलप्रमाणे करता येते.

नकारात्मक आवाज

* च च च आवाज तोंडाने केलेला. * फस्सफस्स * सुस्कारा * बोटे मोडल्याचा आवाज * घसा साफ केल्याचा आवाज * कबूतराचे घुमणे किंवा तसा आवाज करणे * दरवाजा, फॅन किंवा खिडकीचा किरकिर आवाज * कूच कूच आवाज * पाय आपटल्याचा आवाज * रडण्याचा आवाज * रडेल सूर * खुर्चीचा खरखर आवाज * कुईकुई आवाज * लिफ्टचा दरवाजा बंद किंवा उघडतानाचा खडखड आवाज * शेम्बडाचे आवाज

* खोकल्याचे आवाज किंवा खोकल्याची ढास * सकारात्मक आवाज * संथसंगीत * हळू वाहणारा धबधबा * लाटांचा आवाज * विविध पक्ष्यांचे आवाज किंवा किलबिलाट (पक्षी गात आहेत याचा अर्थ सगळे सुरळीत चालू आहे.) * बासरी * पियानो संगीत * आवाज म्हणजे काही कृती किंवा क्रिया करण्यास उद्युक्त करणारे आवाज * व्यायाम- शाळेतील संगीत * ठेका * ढोलकी किंवा ढोलक * आफ्रिकन संगीत

* आयटम साँग्स * प्रेरणादायी गीते जसे भक्तिगीते किंवा वीरगीते सज्ज व्हा उठा चला, सुसज्ज व्हा उठा चला इत्यादी * नकारात्मक बोलणे * काही कळतंय का तुला? * ते काय आहे, माहितीय का? * माहितीय का? * तुझे हे नेहमीचेच * अक्कल आहे का? * फार हुशार समजतोस का? * मला शिकवतोस? * घेणार काही नाही, उगाच चौकश्या * तो येडचॅप, ती वेडसर काकू, तो फॅशनवाला बाब्या * मोठ्या पिशव्या आणि लहानशी पाकिटे घेऊन येतात कशाला?

ज्या दुकानात फारसे ग्राहक नसतात तेथील दुकानदार अशा प्रकारच्या प्रतिक्रिया करत आपला वेळ घालवतो. त्याला हे लक्षात येत नाही कि अशाप्रकारच्या संवादाने (तो मनातल्या मनात असला तरी) तो आपल्या दुकानात येणार्‍या ग्राहकावर कुपरिणामकरीत असतो. ग्राहकाला तेथे जावेसे वाटत नाही आणि दुकान ओस पडते.

दुकानातील दोन नोकर जर एकमेकांबद्दल कुरबुरी करत असतील तर त्याचा देखील ग्राहकावर त्वरित परिणाम होतो. या किंवा अशा गोष्टी तुम्ही जरी मनातल्या मनात म्हटल्या तरी त्यांचा परिणाम तुमच्या चेहर्‍यावर दिसतो, तुमच्या वागणुकीत उतरतो आणि तुमच्या ग्राहकावर परिणाम करतोच करतो.

आपण मागील एका लेखात प्रकाशयोजना आणि विक्री यांचा संबंध पाहिला. प्रकाश हि जशी शक्ती आहे तसेच आवाज हिदेखील एक शक्ती आहे. त्याचा वापर सकारात्मकदृष्ट्या, सुसंवाद निर्माण होण्यासाठी केला तर तुम्हाला त्याचा फायदा होतो आणि विसंवाद तयार होत असल्यास तोटा होतो.

तुमच्या दुकानातील, ऑफिसमधील किंवा इतर कार्यक्षेत्रातील आवाज तुमच्या उद्योगाशी किंवा तुम्ही तेथे करीत असलेल्या क्रियांशी कितपत सुसंगत आहेत ते पहा आणि सुसंगती वाढवायचा प्रयत्न करा. याचे उत्कृष्ट परिणाम उत्पादन क्षमता आणि विक्री वाढीत तुम्हाला दिसून येतील.

सुसंगत आवाज आणि विसंगत आवाज म्हणजे काय ते आपण थोड्या तपशिलात पाहू.

प्रिंटिंग प्रेसमध्ये प्रिंटिंग प्रेसचा खटखट आवाज हा सुसंगत म्हटला जाईल. तो आवाज येतो आहे म्हणजे तेथे काम व्यवस्थित चालू आहे असा विश्वास वाटतो. आपली मिळकत ते काम व्यवस्थित चालू असण्यावर अवलंबून असण्याने आपल्याला तो आवाज सुसंगत वाटतो. यासाठीच चरकवाला आपल्या चारकाला घुंगरू बांधतो.

याच प्रकारे रेस्टॉरंटमध्ये तव्यावर डोसा टाकल्याचा आवाज, आम्लेट घालायचा आवाज, कुकरची वाफ निघाल्याचा आवाज हे सुसंगत आवाज आहेत. साडीच्या दुकानात साडी उघडण्याचा आवाज, फॅक्टरीमध्ये हातोड्याचा आवाज, लेथमशीनचा आवाज, हे सगळे त्या व्यवसायाशी सुसंगत आहेत आणि व्यवसायवाढीस कारणीभूत ठरतात.

तुम्हाला माहित असेलच कि एका कंपनीने सायलेंट कॉम्पुटर कीबोर्डस विक्रीसाठी आणले होते. बिलकुल चालले नाहीत. कारण ऑफिसमधील टायपिस्टस लोकांनामुळी उत्साहच वाटेना टायपिंग करायला. म्हणून आजदेखील सगळे कॉम्पुटर कीबोर्डस आवाज करत करत काम करतात. आतादेखील आवाज न करता काम करणारा माउस शोधून दाखवा.

तेव्हा आता तुमच्या उद्योगाचा एक आवाजी आढावा घ्या. तुमच्या उद्योग क्षेत्रातील प्रत्येक आवाज लक्ष एकवटून ऐका. तो सुसंगत असल्यास त्यास वृद्धिंगत करा. विसंगत असल्यास तो नाहीसा कसा करता येईल याचा विचार करा. नष्ट करणे शक्य नसल्यास कमी करण्याचा प्रयत्न करा.

कमी करणे शक्य नसल्यास, स्वरुप बदल करून घ्या किंवा पर्यायी आवाजाने तो दडवा. तुमच्या बोलण्यात वागण्यात सकारात्मकता, मार्दव आणा आणि आम्हाला जरूर सांगा तुमच्या प्रगतीचा आलेख कसा उंचावला ते.

– आनंद घुर्ये
९८२०४८९४१६

Author

  • आनंद घुर्ये

    आनंद घुर्ये हे लौकिकदृष्ट्या अभियंता व एमबीए असून अनेक मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये त्यांनी वरिष्ठ पातळीवर नोकरी केली आहे. थायलंड येथे नोकरीनिमित्ताने असताना अनेकांनी त्यांना भारतीय प्राचीन संस्कृतीबद्दल प्रश्न विचारले. यातून प्रेरणा घेऊन त्यांनी प्राचीन भारतीय ज्ञानाचा अभ्यास सुरू केला. तसेच ते ज्योतिषी म्हणूनही कार्यरत आहेत. उद्योग ज्योतिष हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?