Advertisement
उद्योग कथा

आज मे आगे, जमाना है पिछे

कमीत कमी खर्चात जाहिरात देऊन आपला ब्रॅण्ड ५ लाख लोकापर्यंत पोहोचवायचा आहे का?
तर स्मार्ट उद्योजक दिवाळी अंकात जरूर जाहिरात द्या!

जाहिरातीची सुरुवात : फक्त रु. ५०० पासून
Book here: shop.udyojak.org/p/0046/

‘क्वीन ऑफ सोप ऑपेराज’ एकता कपूर

शो बिझनेसमधलं अगदी महत्त्वाचं नाव म्हणजे, ‘एकता कपूर’. “कुछ पाना है, कुछ कर दिखाना है।” म्हणत या व्यवसायात उतरलेल्या एकता कपूरने ‘क्वीन ऑफ सोप ऑपेराज’ हे बिरूद कधी पटकावलं ते समजलच नाही.

एखाद्या व्यवसायाची सुरुवात करून त्यात यशस्वी होणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. हिंदी मालिका म्हटलं की एकता कपूर आणि ‘बालाजी टेलिफिल्म्स’ असंच काहीस समीकरण आपल्या डोक्यात आहे. या यशापर्यंत पोहोचण्याचा एकता कपूरचा मार्ग काही सोपा नव्हता. खरं तर सहज मिळालं तर ते यश कसलं? अपयश एकतालाही चुकलं नाही.

वयाच्या सतराव्या वर्षीच एकताने इंडस्ट्रीत प्रवेश केला, पण जम काही बसला नाही. आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून तिने पुन्हा एकदा या व्यवसायात येण्याची जिद्द दाखवली.


दरमहा संपूर्ण ‘स्मार्ट उद्योजक’ मासिक मिळवा तुमच्या WhatsApp वर । वार्षिक वर्गणी फक्त रु. ८०

आजच वर्गणीदार व्हा : https://imjo.in/YSMSQK


आपल्या स्वप्नांवर आपल्या इतकाच कोणीतरी विश्र्वास ठेवला की पुढच्या गोष्टी करायला हुरूप येतो. तसंच तिच्या मागे तिचं कुटुंब खंबीरपणे उभं होतं. अभिनेते जितेंद्र म्हणजे एकताच्या वडिलांनी आर्थिक सहाय्य करून १९९४ मध्ये ‘बालाजी टेलिफिल्म्स’ उभं केलं.

त्यानंतर ‘बालाजी टेलिफिल्म्स’ जोमाने कामाला लागलं. ‘बालाजी’च्या यशाचा आलेख आपण बघतच आलोय, पण यशालाही अपयशातून तावून सुलाखून निघावच लागतं. ‘बालाजी टेलिफिल्म्स’चही काही वेगळं झालं नाही. त्यांचे 6 Pilots, 3 Filmed Ventures अपयशीच ठरले. १९९५ मध्ये ‘हम पांच’ या उत्तम विनोदी मालिकेने तिने जी सुरुवात केली ती कायमची. त्यानंतर ‘बालाजी टेलिफिल्म्स’च्या जवळजवळ आठ मालिका स्टार प्लस वाहिनीवर एकाच वेळी सुरू होत्या.

या सगळ्या मालिका अगदी आवर्जून बघणाऱ्या प्रेक्षकांची आवड हळूहळू बदलत होती आणि शो बिझनेस म्हटलं की, त्यात प्रेक्षकांची आवड हा तर त्या व्यवसायाचा आत्मा असतो. इथेच ‘बालाजी टेलिफिल्म्स’चं गणित थोडं चुकलं आणि मालिकांमध्ये तोच तोचपणा येत गेला. टेलिव्हिजन व्यवसायाचा महत्त्वाचा फंडा म्हणजे TRP. तो बऱ्याच अंशी घसरला.

या सगळ्याचा परिणाम नफ्यावर झाला नाही तर नवलच. सगळं प्रोडक्शन हाऊस हादरलं, पण एखाद्या व्यवसायात पडल्यावर जे समोर येईल त्याला तोंड द्यावच लागतं. हे लक्षात ठेवूनच एकता कपूर या व्यवसायात पडली होती.

एक उद्योजक म्हणून लागणारी जिद्द, इच्छा, मेहनत करण्याची तयारी, नवीन काहीतरी करण्याची उमेद या सगळ्या गोष्टी तिच्याकडे आहेत म्हणूनच इतके चढउतार पाहूनही आपले पाय घट्ट रोवून उभी आहे ती.

Subscribe ‘Smart Udyojak’ Magazine

आज प्रत्येक क्षेत्रातच महिलांनी आपली एक ओळख निर्माण केलीय. हातात घेतलेलं काम जिद्दीने पूर्ण करण्याची इच्छाशक्ती प्रत्येक महिलेत असते. त्या इच्छाशक्तीला फक्त योग्य खतपाणी घालण्याची गरज असते. एकता कपूरला ते मिळालं आणि कुटुंबाच्या आधारामुळे एकता कपूर हे नाव पुन्हा एकदा हळूहळू वर यायला लागलं.

TRP च्या या खेळात, ‘बालाजी टेलिफिल्म्स’च्या जवळजवळ चार मालिका off air गेल्या आणि कमालीचं नुकसान ‘बालाजी टेलिफिल्म्स’नी अनुभवलं. अशाही परिस्थितीत डगमगून न जाता हे सगळं अपयश एकता कपूरने खूप समजूतदापणे मान्य केले आणि पचवलंही, पण आता पुढे काय ह्याचा विचार मात्र एकाबाजूला सुरू झाला. नुसता विचारच नाही तर आता लोकांना काय देणं गरजेचं आहे, त्यांची आवड काय हे ओळखून तिने शो बिझनेसमध्ये पुन्हा एकदा पदार्पण केलं. फक्त सासू-सून मालिकांमध्येच अडकून न पडता अनेक वेगवेगळ्या विषयांना हाताळणाऱ्या मालिकाही केल्या. अगदी Web Series ही केल्या. या स्पर्धात्मक व्यवसायात टिकून राहण्यासाठी काय महत्त्वाचं आहे हे आता तिला पुरतं उमगल. तेव्हा पुन्हा मागे वळून पाहणे नाहीच एकताने फक्त मालिका, अगदी Web Series च नाही तर चित्रपटनिर्मितीही केली आणि आपलं स्थान पक्क केलं.

प्रत्येकच व्यवसायाचा पाया मुळात हाच आहे लोकांने जे आवडतंय किंवा त्यांची जी गरज आहे आपण तेच त्यांना पुरवतोय ना. काळाप्रमाणे गरजेप्रमाणे आपणही आपल्याला बदलणं गरजेचं आहे. व्यवसाय म्हटला की चढ-उतार येणारच, पण त्याही परिस्थितीत आपल्याला त्या व्यवसायात कसं टिकवून ठेवायचं हे खरंच एकता कपूरकडून शिकण्यासारखं आहे आणि तिची हिच जिद्द मेहनत तिला इथवर घेऊन आली.

एक सतरा वर्षांची मुलगी व्यवसायात येते काय आणि Great Indian Woman Award for most successful woman, Startup Entrepreneur of the year by (E&Y) 2001 Phalke Iconic Film & Television Producer Award by Dadasaheb Phalke Academy Award (2012) सारखे मानाचे पुरस्कार मिळवते काय. इतकच नाही तर आशियातल्या पन्नास प्रभावशाली महिलांमध्येही तिची नोंद होते.

एकअता कपूरची ही जिद्द व मेहनत खरंच वाखाणण्यजोगी आहे. आपल्या प्रत्येकामध्येच काही ना काही सुप्त गुण असतात. काहींना ते माहीतही असतात, पण जे चाललंय ते छान चाललंय म्हणत त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. पण तसं न करता काही तरी नवीन घडवण्याचा ध्यास ठेवून, त्याच्या जोरावर प्रगतीच्या नवीन वाटा चोखंदळू या आणि ज्यांना आपल्या गुणांची ओळख झालेली नाही त्यांनी आपल्यालाच नव्याने ओळखायला लागूया.

– अंकिता प्रदीप सोवनी

Smart Udyojak | e-Magazines | All Issues

व्यवसाय आणि उद्योजकताविषयक लेख व बातम्या आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहता तो जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: