मनाचे दोरखंड तोडा…

एकदा एक माणूस एका हत्तीच्या बाजूने जाता जाता अचानक थांबला. अवाक होऊन तो समोरचे दृष्य पाहत होता. त्या एवढ्या बलाढ्या हत्तीच्या पायात साखळदंड नव्हते तर केवळ एक छोटी दोरी त्याच्या पुढच्या पायाला बांधली होती. खरं तरं तो महाकाय प्राणी अशा अवस्थेत कोणतीही नासधूस करू शकला असता, पण तो शांत उभा होता.

नेमकी हीच गोष्ट त्या पाहणार्‍याला खटकली होती आणि तो याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत होता. त्या हत्तीचा माहुत तिथेच जवळ होता. तो माणूस त्याच्याकडे गेला आणि त्याला विचारलं, “हा महाकाय प्राणी केवळ एका पायात एवढीशी दोरी बांधलेली असूनही इतका शांत कसा?”

माहुताने उत्तर दिलं, “जेव्हा हा हत्ती लहान होता, तेव्हा त्याच्या पायात हा दोर बांधत असू. त्यावेळी त्याला काबूत ठेवण्यसाठी तो दोर पुरेसा होता. तेव्हा त्याने हा तोडण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याला तेव्हा ते शक्य नव्हतं. पुढे जसंजसा तो मोठा होत गेला तसं त्याच्या मनात हे रूजलं की आपण हा दोरखंड तोडू शकतच नाही. त्यामुळे आता तो ते तोडण्याचा प्रयत्नच करीत नाही.

ऐकणार्‍याला हे आश्चर्य वाटलं. एवढा अवाढव्य प्राणी कधीही तो दोरखंड दूर करून स्वत:ला स्वतंत्र करू शकला असता, परंतु त्याच्या मनात हे रूजलं की हे बंधन आपण तोडू शकत नाही, त्यामुळे तो आजही जिथल्या तिथेच खिळला आहे.

अगदी या हत्तीप्रमाणेच आपणसुद्धा आपल्या आयुष्यात आपल्याला काही जमणार नाही, अशी समजूत बाळगून जगत असतो. एकदा अपयश आलं की पुन्हा जमणारच नाही, असं मनाशी ठाम करून घेतो.

निष्कर्ष : अपयश आपल्याला खूप काही शिकवते, पण त्या अपयशाने खचून न जाता सतत प्रयत्न करत राहिले की एक ना एक दिवस यश नक्की मिळते.

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?