ERP अर्थात एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


कुठल्याही संस्थेमध्ये विविध प्रकारच्या विभागांमध्ये वेगवेगळ्या वेळी, अनेक प्रकारच्या, अनेक प्रक्रिया सुरू असतात. उदा. उत्पादन, पुरवठा साखळी, वित्त, विपणन, विक्री, मानव संसाधन विकास, खरेदी, कायदेशीर बाबी इ. जर उल्लेख केलेल्या प्रक्रिया स्वतंत्ररीत्या चालू असल्या म्हणजेच एकमेकांशी सलंग्न नसल्या, तर त्यामुळे माहितीचे बहुविध संग्रह निर्माण होतात.

यामुळे जर कोणत्याही क्षणी, एखाद्या उद्योजकास त्याच्या धोरण, वाढ, नियंत्रण याबद्दलच्या किंवा आपला व्यवसाय चालविण्यासाठी विशिष्ट माहितीची आवश्यकता असेल, तर पूर्ण, अचूक आणि वास्तविक माहिती मिळवणे कठीण जाऊ शकते.

डेटाचा अहवाल देण्यासाठी बर्‍याच एक्सेलशीट वापरल्या जातात, ज्यामध्ये त्रुटी असण्याची शक्यता असते. तसेच, विविध स्त्रोतांकडून माहिती काढणे आणि पुनर्प्राप्तीसाठी बराच वेळ लागू शकेल. या सगळ्यावर उपाय ERP असू शकेल.

एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग (ERP)

अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ईआरपी म्हणजे अशी प्रणाली जी कंपनी चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व मूलभूत प्रक्रिया, लोक आणि तंत्रज्ञान समाकलित करते. एक कॉमन डेटाबेस शेअर करून कंपनीचे वेगवेगळे भाग आणि त्यांच्या प्रक्रिया संलग्न करते.

असे केल्याने माहिती तंत्रज्ञान वापरून, रीअल टाईममध्ये निर्णय घेता यावा, यासाठी आवश्यक माहिती देते. ईआरपी प्रणालीमुळे लेखा, खरेदी, प्रकल्प व्यवस्थापन, जोखीम व्यवस्थापन व अनुपालन आणि पुरवठा साखळी प्रक्रिया इ. कोर प्रक्रियांचे व्यवस्थापन होतेच, शिवाय एखाद्या संस्थेच्या आर्थिक निकालांची योजना, अर्थसंकल्प, अंदाज आणि अहवाल देण्यातदेखील मदत होते.

ईआरपीची अंमलबजावणी कुठे कराल?

  • स्वतःच्या आवारात. उदा. ऑफिस,कारखाना, गोदाम इ.
  • क्लाउडवर
  • मिश्रपद्धत – क्लाउड आणि स्वतःच्या आवारात

नेहमी वापरले जाणारे ईआरपी :

आपल्या धंद्याचा आकार, त्याचे स्वरूप, त्यातली  गुंतागुंत आणि असलेले बजेट यानुसार ईआरपीची निवड केली जाते. साधारणतः टॅली ईआरपी, सॅप (एसएपी), ओरॅकल, माइक्रोसॉफ्ट डायनॅमिक्स ३६५ असे ईआरपी  वापरले जातात.

ईआरपीचे मुख्य फायदे :

  • उच्च उत्पादकता आणि ऑपरेशन्सवर किमान खर्च.
  • सर्वोत्तम पद्धतींचा वापर आपल्या कार्यात होऊ शकतो.
  • सुधारित आणि सखोल माहिती
  • वेगवान, पूर्ण आणि अचूक अहवाल मिळतात.
  • माहितीच्या परिपूर्णतेमध्ये आणि अखंडतेमध्ये सुधारणा पाहायला मिळते आणि आर्थिक नियंत्रणाद्वारे जोखमीचा अंदाज घेता येतो व उपाययोजना करता येते.
  • माहिती तंत्रज्ञान चांगल्याप्रकारे हाताळता येते.
  • कार्यक्षम प्रक्रिया आणि रीअल-टाइम डेटामुळे नवीन संधींना वेगाने ओळखून प्रतिक्रिया देता येतात.

ईआरपी वापरण्याचे काही तोटे :

  • मूलभूत ईआरपी मध्ये योग्य ठिकाणी सुधारणा नाही केल्या, तर समस्या निर्माण होतील.
  • अस्तित्वात असलेल्या कार्यपद्धती ईआरपीमध्ये बसवायच्या असतील तर स्पर्धात्मकता हरवू शकेल आणि गंभीर कार्यांकडे दुर्लक्ष होईल.
  • चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी झाल्यास ईआरपीमूळे बजेट वाढू शकते.
  • वरिष्ठ व्यव्यस्थापनाने त्यांच्या अपेक्षा आणि गरज स्पष्ट नाही केल्या तर अंमलबजावणी बरोबर होणार नाही.
  • अंमलबजावणीनंतर श्रेणी सुधारणा आणि देखभाल यावर खर्च करावा लागतो.
  • ईआरपीच्या प्रशिक्षणामध्ये कर्मचारीवर्गाचा वेळ जातो. त्यामुळे दैनंदिन कार्यात अडथळे येऊ शकतात.

उद्योजकाला सहज, उपयुक्त, खरी, पूर्ण, अचूक आणि योग्य वेळी माहिती हवी असेल तर ईआरपीचा उपयोग होतो. म्हणूनच धंद्याचा आकार, त्याचे स्वरूप, त्यातली गुंतागुंत आणि असलेले बजेट यानुसार बरोबर ईआरपीची निवड केली पाहिजे आणि अर्थातच त्याचे अंमलबजावणीसुद्धा योग्यरीतीनेच व्हायला हवी.

–  सीए जयदीप बर्वे
9820588298
Email  : cajaideepbarve@gmail.com

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?