उद्योजकात असायला हवेत हे दहा गुण

एका उद्योगाचे नेतृत्व करणे हे एक आवाहनात्मक काम आहे. केवळ कार्यालयात जाणे, विचार मंथन करणे म्हणजे उद्योग नेतृत्व नव्हे. आपल्या उद्योगाच्या सुरुवातीच्या काळात प्रत्येक उद्योजकाला उद्योगातील सर्व आघाड्यांवर काम करावे लागते. शिपायापासून वित्तीय विश्लेषकपर्यंत अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात.

व्यवसायाच्या उर्जितावस्थेत आपल्याकडे संसाधनांची कमी असते. मनुष्यबळ कमी असते तेव्हा या सर्व गोष्टींना लक्षात घेऊन आपल्या उद्योगाचा पाया भक्कम करण्यासाठी सुरुवातीला उद्योजकाला यावर काम करावे लागते. एक उद्योजक त्याच्या दैनंदिनी कामासाठी या दहा महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असतो.

नेता : प्रत्येक उद्योजकामध्ये एक नेता दडलेले असतो. उद्योगात एक नेता म्हणून वावरताना आपापसात विश्वास निर्माण करणे, आपल्या सहकार्‍यांसमोर एक चांगले उदाहरण निर्माण करणे, कठीण परिस्थितीवर मात करणे, आणि त्याचवेळी सर्वांचे मनोबल खंबीर करणे अश्या सर्वच भूमिका पार पाडत असतो. प्रत्येक वेळी हे सोपे नसते. परंतु उद्योजकाला ते करावे लागते.

कुशल व्यक्तिमत्व चित्र : लोकांसमोर एक व्यक्ती ही नेता म्हणून काम करत असते. इतरांना आपण आपल्या व्यवसायाविषयी संगतो, नेटवर्किंगमध्ये जोडले जातो, ऑनलाईन व्यक्तिगत पातळीवर ब्रँड स्थापित करतो अश्या सगळ्या ठिकाणी तुम्ही एक त्या उद्योगाचा भाग होता. त्यामुळे तुम्ही तुमच्या उद्योगाचा चेहरा होता. म्म्हणून आपल्या व्यक्तिमत्वाला प्रभावी बनवायला हवे.

दुरदर्शी : उद्योजकाने दुरदर्शी असायलाच हवे. उद्योजक हा सदैव नवनवीन गोष्टींच्या शोधत असतो तसेच प्रत्येक अडचणीवर मात करायला तयार असतो. एकदा उद्योग सुरू झाला अथवा स्थावर झाला म्हणजे ही भूमिका संपत नाही तर उद्योगाच्या वाढीसाठी नवीन मार्ग सतत शोधत राहावे लागतात.

प्रसंगावधान : उद्योजकाला प्रसंगावधान आणि ताळमेळ घालणे जमले पाहिले. आपल्या कंपनीत चालू असलेल्या सर्वच घडामोडी आपल्याला अगोदरच माहीत नसतात कारण तेवढा वेळ आपल्याकडे नसतो. तुम्ही प्रमुख असल्याने वेळोवेळी येणार्‍या समस्या घेऊन तुमचे टीम मेंबर्स तुमच्याकडे येतात. वेळ कमी असतो अथवा समस्या लवकर सोडवणे गरजेचे असते अशावेळी तुम्ही कसा निर्णय घेता हे महत्वाचे आणि व्यवसायावर परिणाम करणारे असते.

अर्थ नियोजन : व्यवसायाचे स्वास्थ हे त्याच्या आर्थिक पायावर असते. त्यामुळे वेळोवेळी तुमचे निर्णय आणि तुमचे नियोजन खूप महत्वाचे असते. उद्योजकांच्या अग्रणी कामांमध्ये आर्थिक नियोजन असायला हवे. जमा खर्चाचा ताळमेळ, नफा तोटा यावर सतत लक्ष असायला हवे.

मार्केटींग / विपणन : आपल्या कंपनीच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीची प्रमुख भूमिका उद्योजकाची स्वतःची असते. आपल्या ब्रँडला एक ओळख मिळवून देण्यासाठी त्याला स्वतःला खूप मेहनत करावी लागते. आपण या कामासाठी कुशल, तज्ज्ञ मंडळींकडून हे काम करून घ्यायला हवे पण तेवढेच स्वतःही यात उतरावे लागते. अंतिमतः निर्णय हा उद्योजकांचा असतो.

स्वागतिक : स्वागतिक म्हणजेच रेसेप्शनिस्ट. आपला उद्योग जेंव्हा वाढीला लागतो तेंव्हा आपल्याला सहकार्य करायला अनेक हात असतात. पण जेंव्हा आपला सुरवतीचा काळ असतो तेंव्हा अनेक छोटी छोटी काम जसे की ई-मेल, कॉल, कार्यालयात दिल्या जाणार्‍या भेटी अश्या अनेक गोष्टींना स्वतःच पाहावे लागते. ई-मेल वाचणे, उत्तरे देणे, दूरध्वनीवर संभाषण करणे, माहिती देने आदि कामे करावी लागतात.

ग्राहक सेवा प्रतिनिधी : सर्वच सेवा अथवा उत्पादनात ग्राहक महत्वाचा आहे. ग्राहक संतुष्ट असेल तर उद्योगाचे स्वास्थ्य चांगले राहते. सुरुवातीच्या काळात उद्योजकाची ही जास्त जबाबदारी असते की आपल्या ग्राहकांची आवड समजून घेणे. ग्राहक नाराज होणार नाहीत हे पाहणे. ग्राहक खुश असतील तरच उद्योग तगू शकतो. त्यामुळे ग्राहकांशी नाते दृढ करण्याची जबाबदारी ही उद्योजकाची असते.

एच आर व्यवस्थापक : तुमच्या विचार आणि उद्दिष्टांना सोबत घेऊन पुढे जाणारी एक सक्षम टीम तुम्ही उभी करता. त्यासाठी तुम्ही महत्वाची भूमिका पार पाडत असता. आपल्या सोबत काम करणार्‍या सहकार्‍यांच्या कौशल्य, प्रतिभा, शिक्षण, अनुभव, आणि व्यक्तिमत्व या सार्‍या गुणांना न्याय देण्याचे काम तुम्ही करत असता.

संभ्रमित : सुरुवातीच्या काळात उद्योजक हा संभ्रमावस्थेत असतो. त्याला सगळ्या भूमिका पार पाडाव्या लागतात. डेटा एण्ट्रीपासून कागदपत्रे तयार करण्याच्या सगळ्या गोष्टी करत असतो. भविष्यात या कामांसाठी माणसे नेमतो पण सुरुवातीच्या संभ्रमित काळात तो स्वतःच ही भूमिका पार पाडत असतो.

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?