स्वाक्षरीतला ‘स्व’


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


“चेक कितीचा लिहू?” समोर बसलेले गृहस्थ विचारत होते.

त्यांच्या तीन प्रिंटिंग प्रेसपैकी एका प्रेसचे वास्तू मी करून दिले होते त्याबद्दल तो चेक होता. स्वाक्षरी करता करता ते म्हणाले, कुणाकडे नसेल एवढा व्यवसाय माझ्याकडे चालत येतो. माझ्या सगळ्या प्रेस रात्रंदिवस चालतात, पण नफा हवा तसा होत नाही. त्यांनी मला चेक दिला.

त्या चेकवरील स्वाक्षरीने माझे लक्ष वेधून घेतले. मी त्यांना म्हटले, पुढच्या वेळी आपण भेटू तेव्हा तुम्ही केलेले तीन quotations घेऊन या. आपण बघू. त्यानंतरच्या आठवड्यात हे गृहस्थ तीन quotations घेऊन आले. आम्ही बसून ती quotations चेक केली. त्यानंतर मी त्यांना सांगितले की, आता तुमच्या प्रेसमध्ये फोन करून या जॉबसाठी खरोखर किती वेळ लागला आणि किती खर्च आला ते विचारा.

अर्ध्या तासात त्यांच्या प्रॉडक्शन मॅनेजरने त्या गोष्टी पाठवल्या. पहिल्याच जॉबमध्ये त्यांना ३० टक्के नुकसान दिसून आले. बाकीच्यांची स्थिती काही फारशी वेगळी नव्हती. त्यांना हे पाहून धक्काच बसला. ते लगेच म्हणू लागले, हे लोक काम बरोबर करत नाहीत. आळशीपणा करतात. आता त्यांना मी सरळ करतो वगैरे वगैरे.

अचानक त्यांचा चेहरा उजळला आणि त्यांनी माझ्याकडे रोखून पाहत विचारले, पण तुम्हाला कसे कळले, की असे होत असणार?

मी त्यांना त्यांची स्वाक्षरी दाखवली. त्याची सुरुवात मोठी होती, स्वाक्षरीला एक झोल होता, ती मध्येच तुटली होती आणि नंतर परत मोठी होत गेली होती. त्याचा अर्थ असा होता र्की, हा माणूस मोठ्या आवेशाने व्यवसाय करतो, जॉब्स घेऊन येतो, परंतु नंतर त्याचा पाठपुरावा करत नाही.

हा चांगला सेल्समन होऊ शकतो, परंतु बिझिनेसमन होण्यासाठी नफा होण्याची गरज असते त्याकडे ह्याचे फारसे लक्ष नाही. अर्थात कामाचा जोर असल्या कारणाने त्याची प्रेस सतत चालू असते; परंतु विक्रीनंतरच्या गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्याने तोटा होण्याचा संभव असावा असे अनुमान बांधता येते.

उपाय काय?

मी त्यांना सांगितले, यापुढे quotation करताना प्रॉडक्शन मॅनेजर आणि तुमच्या सहकार्‍याला एकत्र बसवा. त्यांना quotation करू द्या. शून्य नफा असलेले quotation, त्यानंतर त्यात जो तुम्हाला नफा हवा असेल तो करून तुम्ही ते quotation तुमच्या ग्राहकास द्या, हवी तर घासाघीस करा. प्रत्येक मोठा जॉब प्रेसच्या बाहेर जाताना त्यावर किती वेळ खर्च झाला याची नोंद ठेवा. बस.

आपले लेखन आपण जरी हाताने करत असलो तरी ते आपल्या मेंदूपासून येते. याला fine motor neuron movements असे म्हटले जाते. या तुमच्या attitude, aptitude, behaviour या गोष्टींकडे पाहण्यासाठी चांगल्या प्रकारे वापर केला जाऊ शकतो. म्हणूनच म्हटले जाते की, हस्ताक्षर म्हणजे मनाचा आरसा किंवा नकाशा. मग असा प्रश्न येतो की, त्यांनी आपली स्वाक्षरी बदलली तर फरक पडेल काय?

जरूर पडेल, परंतु एक तर स्वाक्षरी बदलणे एवढी सोपी गोष्ट नाही. त्याला बराच वेळ आणि प्रयत्न लागतो आणि सर्वात महत्त्वाचे की, बदललेल्या स्वाक्षरीमुळे तुम्ही तुमची शक्तिस्थाने तर गमावत नाही ना? त्या परिस्थितीत ‘भीक नको पण कुत्रा आवर’ अशी स्थिती येऊ शकते.

म्हणूनच आम्ही उद्योग ज्योतिष्यात स्वाक्षरी किंवा हस्ताक्षर यांचा नकाशा म्हणून वापर करतो. नकाशा आपल्याला परिस्थिती दाखवतो. नकाशावर पाणी पडले तर रस्त्यावर पूर येत नाही; परंतु पूर आलेला असताना कुठल्या मार्गाने आपल्याला बाहेर पडता येईल हे नकाशावरून कळू शकते आणि आपण त्याप्रमाणे वागले तर प्रसंगातून सुखरूप बाहेर पडू शकतो.

स्वाक्षरीवरून आपल्याला प्रॉब्लेमचा अंदाज येतो. तो अंदाज खरा आहे किंवा नाही हे आपल्याला उद्योगातील आकडेवारी पाहून, तेथे प्रत्यक्ष जाऊन, प्रश्न विचारून कळते. त्यानंतर अनुरूप असा उपाय करावयाचा, शक्यतो मूळ घडणीला रुचेल असा. उद्योग ज्योतिषाचा वापर केल्याने आपण प्रश्नाकडे, मूळ समस्येकडे लवकर जाऊन पोहाचतो. एकदा प्रश्न बरोबर कळला की उपाय करणे सोपे जाते.

आता प्रश्न असा येतो की आपण आपली स्वाक्षरी सर्वांगसुंदर बनवावी का? नाही तसे नाही. तुमच्या स्वाक्षरीत आणि त्यापरत्वे तुमच्या स्वभावात काही दोष असतीलही; परंतु आपल्याला हे पाहायचे आहे की हे दोष तुमच्या व्यवसायाला, या वेळेस त्रासदायक आहेत का? तसे असेल तर आपल्याला त्या दोषांवर वेगवेगळे उपाय करायला पाहिजेत, अन्यथा उपाय करायचा म्हणून उपाय करून फायदा काहीच नसतो.

आता याच गृहस्थांची स्वाक्षरी बघा. ती विक्रेत्यांसाठी अगदी अनुरूप आहे. विशेषतः मोठ्या ब्रँड नाव असलेल्या किंवा प्रसिद्ध कंपनीसाठी. येथे विक्रीसाठी नवे ग्राहक शोधणे किंवा ग्राहकांना जास्त प्रॉडक्ट विकणे यासाठी यांचे व्यक्तिमत्त्व उत्कृष्ट. चांगली कंपनी असल्याने नंतर पाठपुरावा करत बसण्याची गरज नसते म्हणून पाठपुरावा करत नाही हा दोष दृग्गोचर होत नाही.

तेच जर दुसर्‍या कंपनीत गेले तर या कारणामुळे त्यांचा परफॉर्मन्स खूप कमी दिसू लागतो. समस्येचे कारण अचूक शोधून काढणे हेच तर उद्योग ज्योतिषाचे वैशिष्ट्य आहे. सहा महिन्यांनंतर त्या गृहस्थांनी मला स्वतः येऊन सांगितले की, त्यांचा व्यवसायातील नफा आता बर्‍यापैकी वाढला होता.

– आनंद घुर्ये
९८२०४८९४१६
(लेखक प्राचीन भारतीय ज्ञान या विषयातले अभ्यासक आहेत)

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top