
उद्योजकाचे नाव : अनंता दिलीप कडू
व्यवसायाचे नाव : द डिजिटल अनंता लर्निंग अकॅडमी
जिल्हा : पुणे
अनंता दिलीप कडू यांची कहाणी ही प्रेरणेचा एक उत्तम नमुना आहे. पुण्यातील इंदापूर येथे जन्मलेल्या अनंताने तिथेच बी.कॉम.पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. त्यांच्या मनात नेहमी स्वतःचं काहीतरी वेगळं करण्याची, स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची तीव्र इच्छा होती.
लॉकडाऊनच्या काळात त्यांनी ठरवलं की कोचिंग बिझनेसमध्ये काहीतरी नवीन आणि प्रभावी करायचं, पण सुरुवातीला त्यांना योग्य मार्ग सापडत नव्हता आणि टेक्नॉलॉजीची माहितीही फारशी नव्हती. या प्रवासात त्यांना एक उत्तम मार्गदर्शक भेटले, ज्यांनी त्यांना स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शन केलं.
यातूनच अनंताने “Be a Lifelong Learner” हे तत्त्व अंगीकारलं आणि शेवटच्या श्वासापर्यंत सतत शिकत राहण्याचा निश्चय केला. त्यांचा विश्वास आहे की, जेव्हा तुम्ही सतत शिकता, तेव्हा तुमची कमाईही वाढते. फॉर्मल शिक्षण तुम्हाला नोकरी मिळवून देऊ शकतं, पण बिझनेस यशस्वी करण्यासाठी मार्केटिंग, सेल्स, टेक्नॉलॉजी, फेसबुक अॅड्स, फनेल बिल्डिंग यासारख्या हाय-इन्कम स्किल्सवर काम करावं लागतं.
अनंताचं स्वप्न मोठं आहे. त्यांनी ठरवलं की, पुढील तीन वर्षांत महाराष्ट्रात किमान १०,००० उद्योजकांना त्यांचा स्वतःचा कोचिंग बिझनेस सुरू करण्यासाठी किंवा ऑनलाइन कोर्स लॉन्च करण्यासाठी मदत करायची. एवढ्यावरच थांबायचं नाही, तर त्यांना त्यांचा बिझनेस स्केल करण्यासाठीही मार्गदर्शन करायचं.
उद्योजक होण्यापूर्वी अनंताने नोकरी केली, नंतर एजन्सी बिझनेस सुरू केला. उद्योजकीय जीवनात ते नवीन असले, तरी गेल्या सहा वर्षांपासून त्यांनी आपल्या स्किल्सवर सातत्याने काम केलं आहे. त्यांना कोचिंग बिझनेसमध्ये मोठा प्रभाव निर्माण करायचा आहे, लोकांच्या आयुष्यात बदल घडवायचा आहे आणि त्यांना उच्च दर्जाचं जीवन जगण्यासाठी प्रेरित करायचं आहे.
त्यांचा विश्वास आहे की, एका व्यक्तीच्या उत्पन्नात वाढ झाली, तरी संपूर्ण कुटुंबाचं जीवन बदलतं. बिझनेस बाहेरून सोपा वाटतो, पण त्यात अनेक स्ट्रॅटेजी आणि नियोजनाची गरज असते. अनंताला सुरुवातीला काय करायचं हे समजत होतं, पण योग्य मार्गदर्शनामुळे त्यांना स्पष्टता मिळाली.
तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा
'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.
🚀 अधिक माहितीत्यांचं ध्येय, त्यामागचं इमोशनल कारण आणि सतत शिकण्याची जिद्द यामुळे त्यांना अनेक अडचणींवर मात करता आली. त्यांनी योग्य मार्गदर्शक निवडला, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि टेक्नॉलॉजीची भीती दूर झाली.
ते सतत शिकतात, शिकवतात, फीडबॅक घेतात आणि आपल्या प्रॉडक्टमध्ये सुधारणा करतात. अनंताचा विश्वास आहे की, भारतात ऑनलाइन कोचिंग बिझनेस प्रचंड वेगाने वाढत आहे. या बिझनेसचं वैशिष्ट्य म्हणजे तो कमी भांडवलात सुरू होतो. फक्त नॉलेज, स्किल आणि एखाद्या क्षेत्रातलं तज्ज्ञ असणं गरजेचं आहे. अनंताचं म्हणणं आहे की, जर तुमच्याकडे लोकांना देऊ शकणारं मूल्यवान ज्ञान असेल, तर लोक तुम्हाला त्याबदल्यात पैसे द्यायला तयार असतात.
अनंताच्या या प्रेरणादायी प्रवासातून एक गोष्ट स्पष्ट होते की, स्पष्ट ध्येय, सतत शिकण्याची आवड आणि योग्य मार्गदर्शन यामुळे कोणताही उद्योजक आपलं स्वप्न साकार करू शकतो. त्यांचं मिशन आणि दृष्टिकोन पाहता, ते नक्कीच कोचिंग इंडस्ट्रीत मोठा बदल घडवून आणतील.
जन्मदिनांक : २ नोव्हेंबर १९८६
व्यवसाय स्थापना वर्ष : १४ जून २०२४
व्यवसायाचा पत्ता : इंदापूर, पुणे – 413106
संपर्क क्रमांक : 9860621097
ई-मेल : ananta_kadu211@rediffmail.com , support@anantadigitalschool.com
संकेतस्थळ : https://anantadigitalschool.com
तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा
तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.
'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:
- ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
- ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
- ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
- ✅ सोशल मीडिया प्रमोशन
तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.
🚀 येथे क्लिक करा

