जेव्हा अंक बोलतात… आशिष जगताप यांचे जीवन बदलणारे अंकशास्त्र

aschish jaggtap numerologist in mumbai

आशिष जगताप [Numerologist in Mumbai] यांचा जीवनप्रवास हा एका सामान्य व्यक्तीपासून असामान्य यशापर्यंतचा आणि त्यानंतर आलेल्या आव्हानांवर अंकशास्त्राच्या (न्यूमरोलॉजी) माध्यमातून मात करणारा प्रेरणादायी असा प्रवास आहे. त्यांच्या जीवनातील अनुभव, त्यांनी स्वीकारलेले मार्ग आणि त्यांनी विकसित केलेली अंकशास्त्राची अनोखी पद्धत यामुळे आज ते अनेकांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. हा लेख त्यांच्या या अविरत प्रवासाचा आणि त्यांच्या कार्याचा आढावा घेतो, ज्यामुळे अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल ते घडवत आहेत.

आशिष जगताप यांचा जन्म मुंबईतील दादर येथील नायगाव येथे एका गिरणी कामगाराच्या कुटुंबात झाला. त्यांचे आजोबा गिरणी कामगार होते. त्यांचे वडील वकील असल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच शिस्त, मेहनत आणि शिक्षणाचे महत्त्व माहीत होते. १९९५ साली त्यांनी व्हीजेटीआय या नामांकीत कॉलेजमधून सिव्हिल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला आणि नंतर पुण्याच्या गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून पदवी प्राप्त केली.

शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी शापूरजी पालमजी कंपनीत एक वर्ष सिव्हिल इंजिनीअर म्हणून नोकरी केली, पण त्यांची स्वप्ने मोठी होती. १९९९ साली त्यांनी बांधकाम व्यावसायिक म्हणून स्वत:चा स्वतंत्र प्रवास सुरू केला.

पुढे एकवीस वर्षांत एक बिल्डर म्हणून त्यांनी १ हजारहून घरे बांधून विकली. या काळात त्यांनी कायद्याचे शिक्षणही पूर्ण केले, जे त्यांच्या व्यवसायासाठी गरजेचे होते. मेहनत, कौशल्य आणि दूरदृष्टीच्या जोरावर त्यांनी या क्षेत्रात आपले नाव प्रस्थापित केले, पण २०१८ साली त्यांच्या या यशस्वी प्रवासाला अचानक खीळ बसली.

२०१८ पासून आशिष यांच्या व्यवसायात अडचणी येऊ लागल्या. भागीदारांमधील मतभेद, फंडिंगच्या समस्या आणि सरकारी परवानग्या मिळवण्यातील अडथळे यामुळे त्यांचे काम जवळजवळ ठप्प झाले. मागील बावीस वर्षांत कधीही न आलेल्या या समस्यांचा परिणाम हा त्यांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावरही झाला.

त्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेह यासारख्या आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागले. रागाचा प्रकोप वाढला आणि भागीदारांशी संवादही संपला. या सगळ्यामुळे त्यांची भागीदारी जवळजवळ संपुष्टात आली.

या कठीण काळात आशिष यांनी हार न मानता समस्येच्या मुळाशी जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी विविध मार्गांचा अवलंब केला आणि या शोधात त्यांना युट्यूबवर मोबाइल न्यूमरोलॉजीचा एक कोर्स सापडला. येथूनच त्यांच्या जीवनात एक नवे वळण आले.

Smart Udyojak Business Ecosystem Popup

आशिष यांचे आध्यात्माशी कधीच फारसे नाते नव्हते, पण अडचणीच्या काळात माणूस आध्यात्माकडे वळतो आणि आशिष यांचेही तसेच झाले. मोबाइल न्यूमरोलॉजीचा अभ्यास करताना त्यांना अनेक गोष्टींचा उलगडा झाला. त्यांना समजले की प्रत्येक अंक हा ग्रहांशी जोडलेला असतो. उदाहरणार्थ १ हा अंक सूर्याशी संबंधित आहे, तर ६ हा अंक शुक्र ग्रहाशी जोडलेला आहे. काही अंकांचे संयोजन (कॉम्बिनेशन) ग्रहांच्या प्रतिकूल स्थितीमुळे त्रासदायक ठरू शकते.

आशिष यांनी स्वत:चा पंधरा वर्षांपासून कार्यरत असलेल्या मोबाइल नंबरचा अभ्यास केला आणि त्यांना आढळले की त्यातील अंकांचे संयोजन त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर नकारात्मक परिणाम करते आहे. याचाच त्यांच्या नातेसंबंधांवर आणि आरोग्यावर परिणाम झाला होता.

अंकशास्त्र ही ज्योतिषशास्त्राची एक शाखा आहे आणि जेव्हा व्यक्तीचा काळ अनुकूल असतो, तेव्हा अंकांचे चुकीचे संयोजन त्याला जाणवत नाही म्हणूनच एवढ्या वर्षांत आशिष यांनाही ते जाणवले नव्हते, पण आता काळ बदलला होता.

आशिष यांनी आपल्या मोबाइल नंबरमध्ये योग्य बदल केले आणि अवघ्या तीन महिन्यांत त्यांना सकारात्मक बदल जाणवले. प्रकृती स्वास्थ्यासाठी ते करत असलेले प्रयत्न म्हणजे नियमित व्यायाम आणि योग्य आहार याच्या जोडीला या न्युमरोलॉजिकल रेमेडीमुळे त्यांचा रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रणात आला. औषधे बंद झाली. या अनुभवाने प्रेरीत होऊन त्यांनी अंकशास्त्राचा सखोल अभ्यास सुरू केला आणि इतरांना मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतला.

आशिष यांचे अंकशास्त्रावरील कार्य हे शास्त्रशुद्ध आहे. ते व्यक्तीची जन्मतारीख, नावाचे आद्याक्षर आणि भाग्यांक यांच्या आधारे एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि समस्यांचे विश्‍लेषण करतात. त्यांच्या मते ९९ टक्के लोकांना आपल्या समस्यांचे मूळ कारण माहीतच नसते. मग यासाठी त्यांनी लोकांना कोणकोणत्या समस्या येऊ शकतात याशिवाय यावर अंकशास्त्र कसे परिणाम करते हे तपासले आणि स्वत:ची सेवा सुरू केली.

आशिष यांच्याकडे सर्वसामान्यपणे लोकांना कोणकोणत्या सेवा दिल्या जातात तर; जर एखाद्याला त्याच्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक यशाबद्दल जाणून घ्यायचे असेल तर प्रथम त्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्यांचा भाग्यांक आणि मूलांक काढून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल दिशादर्शन केले जाते.

या अभ्यासातून योग्य करिअर किंवा व्यवसाय सुचवला जातो. अगोदरपासून असलेल्या व्यवसाय किंवा नोकरीत जर समस्या असतील तर मग त्यांच्या जबाबदार्‍या किंवा भूमिका यात बदल करून कसे समस्यांचे परिणाम कमी होतील असे पाहिले जाते.

अनेक वेळा चुकीच्या अंकांच्या संयोजनामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतात, पण ते आपल्याला कळत नाहीत. अंकशास्त्रानुसार आवश्यक बदल करून तसेच रुद्राक्ष, क्रिस्टल यांसारख्या गोष्टींच्या साहाय्याने चांगले परिणाम दिसून येतात.

लग्न, भागीदारी किंवा कौटुंबिक नातेसंबंधांमध्ये अडचणी असल्यास दोन व्यक्तींच्या जन्मतारखांचे आणि अंकांचे संयोजन तपासून योग्य उपाय सुचवले जातात. उदाहरणार्थ लग्नापूर्वी दोघांचे अंकांचे सुसंगतपण (कम्पॅटिबिलिटी) तपासली जाते.

मुलांसाठी कोणते शिक्षण किंवा क्षेत्र योग्य आहे याचेही मार्गदर्शन केले जाते. एवढेच नाही तर मुलांच्या वर्तनातील समस्यांचे कारण आणि त्याच्या त्या वर्तनाचा कालावधी याबद्दलही सांगितले जाते. गाडीचा नंबर, घराचा नंबर, परदेश प्रवासाचे योग किंवा रिअल इस्टेटशी संबंधित समस्यांवरही उपाय सुचवले जातात.

आशिष यांची कार्यपद्धती ही वैज्ञानिक आणि सर्वसमावेशक आहे. ते प्रथम व्यक्तीची जन्मतारीख, नाव याची माहिती घेतात. यानंतर महादशा, अंतरदशा, नाडी ज्योतिष अशा गोष्टींचा अभ्यास करून उपाय सुचवतात. त्यांच्या सेवेमध्ये मोबाइल नंबरचे संयोजन सुधारणे, नावात आवश्यक बदल करणे, रुद्राक्ष किंवा क्रिस्टल यांचा वापर यांचा समावेश आहे.

या काही प्रातिनिधिक समस्या आणि त्यांचे उपाय सांगितलेत, पण दैनंदिन जीवनात येणार्‍या अशा अनेकविध समस्या ज्यांचे अंकशास्त्राच्या साहाय्याने निराकरण केले जाऊ शकते. आशिष जगताप सध्या लोकांचे असे अनेक प्रश्‍न नियमित सोडवत आहेत. त्यांच्या कार्याचा प्रभाव हा त्यांनी बदललेल्या अनेकांच्या जीवनातून दिसून येतो.

आतापर्यंत जगताप यांनी अनेकांना मार्गदर्शन केले आहे. त्यांचे ध्येय आहे की दरवर्षी किमान एक हजार लोकांच्या समस्यांचे निराकरण करायचे. त्यांच्या सेवेचे वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ समस्यांचे विश्‍लेषण करत नाहीत, तर व्यक्तीच्या गरजेनुसार त्याला सल्ला आणि उपाय ते देतात.

आशिष जगताप [Numerologist in Mumbai] यांचा प्रवास हेच दर्शवतो की माणसाच्या जीवनात आव्हाने कितीही मोठी असली, तरी योग्य दृष्टिकोन आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यावर मात करता येते. अंकशास्त्राच्या माध्यमातून त्यांनी स्वत:चे जीवन तर बदललेच आणि आता ते इतरांचेही जीवन बदलण्यासाठी तत्पर आहेत. त्यांचे म्हणणे आहे, समस्येचे मूळ समजले की उपाय आपोआप सापडतो.

आशिष जगताप यांचा जीवनप्रवास आणि त्यांचे अंकशास्त्रावरील कार्य हे प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी स्वत:च्या अनुभवातून शिकत इतरांना मार्गदर्शन करण्याचा मार्ग निवडला. त्यांच्या या कार्यामुळे अनेकांचे जीवन सकारात्मक दिशेने बदलत आहे.

जर तुम्हालाही तुमच्या जीवनातील आव्हानांवर मात करायची असेल, तर आशिष जगताप यांचे अंकशास्त्रआधारित मार्गदर्शन तुमच्यासाठी एक नवा मार्ग उघडू शकते. त्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक अंकात एक शक्ती आहे आणि ती शक्ती तुमचे जीवन बदलू शकते.

संपर्क : आशिष जगताप – 7039505552

Author

  • pratibha shailesh rajput

    यांनी पदव्युत्तर पत्रकारितेत पदविका केली आहे. प्रिंट माध्यमांत काही काळ काम केल्यानंतर त्यांनी स्मार्ट उद्योजक हे मासिक सुरू केले.

    View all posts
books for life website Ad
Click here to visit: booksforlife.in
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
Smart Udyojak Business Ecosystem Popup
आशिष पेटे : सौरऊर्जेने ग्रामीण महाराष्ट्रात घडवलेली हरितक्रांती व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस व्हिसिटिंग कार्डचं महत्त्व उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?