डॉ. अभिनव बोरकर : आयुर्वेद आणि आधुनिक उपचारांचा समन्वय साधणारे संवेदनशील डॉक्टर

Dr Abhinav Borkar Pune Atman Healthcare

Dr Abhinav Borkar Pune

डॉ. अभिनव बोरकर हे पुण्यातील Integrative Medicine तज्ज्ञ असून आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्राचा समन्वय करून रुग्णांना परिणामकारक उपचार देतात. ‘Atman Healthcare’ या क्लिनिकद्वारे ते Preventive Healthcare आणि Result-Oriented Treatment साठी ओळखले जातात.

‘रुग्ण नुसता बरा झाला नाही, तर बरा राहिला पाहिजे’, या विचाराला जीवनमंत्र मानून ‘स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणं। आतुरस्य विकार प्रशमनम्’ या तत्त्वानुसार कार्य करणारे डॉ. अभिनव बोरकर हे आधुनिक आणि आयुर्वेदिक उपचारपद्धतींचा सुंदर संगम घडवणारे संवेदनशील डॉक्टर आहेत.

पुण्यातील ‘Atman Healthcare’ या क्लिनिकचे ते संस्थापक असून O.N.P. Hospital मध्ये Operation Theatre Administrator म्हणूनही ते कार्यरत आहेत. रुग्णाकडे केवळ आजार म्हणून न पाहता, त्यांच्या वेदना समजून घेणं आणि उपचारांसोबत विश्वास देणं, ही त्यांच्या कामाची खासियत आहे.

डॉ. बोरकर यांचे शिक्षण बहुआयामी आहे. त्यांनी BAMS पूर्ण केल्यानंतर PG DGO (Obstetrics and Gynaecology) आणि PG DHM (Hospital Management) अशी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचार आणि व्यवस्थापन या दोन्ही क्षेत्रांमध्ये त्यांना उत्तम प्रभुत्व आहे.

त्यांना वैद्यकीय क्षेत्राची ओढ शालेय जीवनातच लागली. कुटुंबात वैद्यकीय पार्श्वभूमी नसतानाही लोकसेवेची इच्छा आणि घरातील आयुर्वेदिक वातावरणामुळे त्यांनी या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. दहावीनंतर क्लिनिकमध्ये काम करताना त्यांनी वैद्यकीय क्षेत्र जवळून पाहिले आणि आयुर्वेदात करिअर करण्याचा निर्धार केला.

२०१५ मध्ये डॉक्टर झाल्यानंतर त्यांनी Obstetrics आणि Gynaecology मध्ये पुढील शिक्षण घेतले. २०१७ मध्ये सिंहगड रोड, पुणे येथे त्यांनी ‘Atman Healthcare’ या क्लिनिकची स्थापना केली. त्यानंतर २०१९ पासून ते O.N.P. Hospital मध्ये Operation Theatre Administrator म्हणून कार्यरत आहेत.

त्यांच्या कामाचा मुख्य आधार आहे – Result Oriented Practice. आयुर्वेद आणि आधुनिक उपचारपद्धतींचा समतोल वापर करून ते रुग्णांच्या गरजेनुसार उपचार देतात. हार्मोनल इम्बॅलन्स, फर्टिलिटी, PCOD यांसारख्या समस्यांवर ते आयुर्वेदिक उपचारांसोबत आधुनिक तपासण्या आणि उपचारांची सांगड घालतात.

Smart Udyojak Business Ecosystem Popup

केवळ एकाच उपचारपद्धतीचा आग्रह न धरता, रुग्णाला लवकर आणि योग्य परिणाम मिळावा यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात. त्यांच्या मते, उपचाराइतकाच संवाद आणि विश्वास हादेखील महत्त्वाचा घटक आहे.

पहिल्याच भेटीत सर्व काही सांगणं शक्य नसतं, त्यामुळे वेळ देऊन, संवादातून आणि गोपनीयतेच्या आधारे रुग्णांशी विश्वासाचं नातं निर्माण करणं हे त्यांच्या उपचारपद्धतीचं वैशिष्ट्य आहे. रुग्णाच्या चेहऱ्यावर दिसणारं समाधान हीच त्यांच्या कामाची खरी पावती आहे.

Business articles वाचा

डॉ. बोरकर यांचा विशेष भर Preventive Healthcare वर आहे. २०१६ पासून ते दरवर्षी पुण्यातील माधव सदाशिव गोळवलकर शाळेतील सुमारे बाराशे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करतात. विशेषतः मुलींमध्ये मासिक पाळीच्या काळातील बदल, काळजी आणि पोषण याबाबत ते मार्गदर्शन करतात.

लठ्ठपणा, डायबिटीस, हायपरटेन्शन, स्ट्रेस, वंध्यत्व आणि PCOD या समस्या वाढत चालल्या आहेत. या समस्या निर्माण होण्याआधीच त्यांना रोखणं गरजेचं आहे, याबाबत ते सातत्याने जनजागृती करतात.

शाळांमध्ये ‘आयुर्वेद आणि Preventive Health’ या विषयांवर मार्गदर्शन, निबंध स्पर्धा आणि आरोग्य शिक्षण उपक्रम ते राबवतात. मुलांमध्ये कौशल्य विकास व्हावा यासाठी ‘कमवा आणि शिका’ ही संकल्पना त्यांनी मांडली आहे.

फर्टिलिटी समस्यांबाबत त्यांचा दृष्टिकोन अत्यंत संवेदनशील आहे. नैसर्गिकरीत्या गर्भधारणा न होणाऱ्या दांपत्यांना ते आधी मानसिक आधार देतात. जीवनशैली सुधारण्यावर भर देतात आणि अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच IVF सारखे पर्याय सुचवतात.

कोरोना काळातही त्यांनी आपले क्लिनिक सुरू ठेवून रुग्णसेवा अखंड ठेवली. त्या काळात अनेक अडचणी असूनही त्यांनी सेवा थांबवली नाही.

भविष्यात विविध हॉस्पिटल्स आणि क्लिनिक्सना एकत्र आणून रुग्णांना एकसमान आणि दर्जेदार सेवा मिळावी, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. सध्या ते या दिशेने मार्गदर्शनाचे काम करत आहेत.

डॉ. अभिनव बोरकर हे केवळ डॉक्टर नाहीत, तर संवेदनशील व्यक्तिमत्व आहेत. त्यांना संवादाची आवड असून ते आकाशवाणी पुणे येथे उद्घोषक म्हणूनही कार्य करतात. त्यामुळे त्यांचा शांत, संयमी आणि समजूतदार स्वभाव अधिक प्रभावीपणे दिसून येतो.

शाळकरी मुलांच्या आरोग्यासाठी अजून मोठ्या प्रमाणावर काम करायचे, हे त्यांचे ध्येय आहे. आयुर्वेदाचा व्यावहारिक उपयोग समाजापर्यंत पोहोचवणे आणि आरोग्यदायी जीवनशैली निर्माण करणे हा त्यांचा उद्देश आहे.

डॉ. अभिनव बोरकर यांचे व्यक्तिमत्व म्हणजे ज्ञान, सेवा आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी. त्यांच्यासाठी वैद्यकीय सेवा ही केवळ व्यवसाय नसून एक सामाजिक जबाबदारी आहे.

📞 संपर्क : 9011557188

Author

  • pratibha shailesh rajput

    यांनी पदव्युत्तर पत्रकारितेत पदविका केली आहे. प्रिंट माध्यमांत काही काळ काम केल्यानंतर त्यांनी स्मार्ट उद्योजक हे मासिक सुरू केले.

    View all posts

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

books for life website Ad
Click here to visit: booksforlife.in
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
Smart Udyojak Business Ecosystem Popup
आशिष पेटे : सौरऊर्जेने ग्रामीण महाराष्ट्रात घडवलेली हरितक्रांती व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस व्हिसिटिंग कार्डचं महत्त्व उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?