मेडिकल प्रॉडक्ट गिफ्टिंग असा उपयुक्त आणि वेगळा पर्याय देणारे जितेंद्र नेमाडे

वाढदिवस, लग्न, गृहप्रवेश, सण-समारंभ, कंपनीतील फेस्टिव्हल गिफ्ट्स किंवा कर्मचार्‍यांचा केला जाणारा सन्मान असे अनेक समारंभ असतात इथे गिफ्ट देण्याची परंपरा कायम आहे, परंतु आजही गिफ्ट म्हटले की बहुतेक वेळा ड्रायफ्रूट्स, मिठाई, क्रोकरी किंवा सजावटीच्या वस्तूंचाच विचार होतो.

कालानुरूप थोडा वेगळा विचारसुद्धा होऊ लागलाय, तो म्हणजे मेडिकल प्रॉडक्ट गिफ्टिंग. फारसा परिचित नसला तरी लोकांसाठी उपयुक्त असा हा पर्याय आहे. आजच्या जीवनशैलीत आरोग्याशी संबंधित अनेक समस्या वाढत असल्याने उपयुक्त आणि आरोग्य जपणार्‍या मेडिकल प्रॉडक्टना गिफ्टिंग म्हणून प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे.

डोंबिवलीतील जितेंद्र नेमाडे यांचे ‘मेडिका एंटरप्राइझेस’ लोकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काम करतेय. जितेंद्र यांनी बायो-मेडिकल इंजिनियरिंगमधून मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर मल्टिनॅशनल कंपनीत तीन वर्षे नोकरी केली.

स्वत:चं काही तरी निर्माण करावं, या विचारातून त्यांनी २००० साली ‘मेडिका एंटरप्रायझेस’ नावाने आपल्या व्यवसायाची सुरुवात केली. मेडिकल इक्‍विपमेंट आणि सर्जिकल प्रॉडक्ट्स या क्षेत्रात त्यांनी गेल्या दोन दशकांत यशस्वी प्रवास केला आहे.

‘मेडिका एंटरप्रायझेस’कडे आज हजारांहून अधिक प्रॉडक्ट्स आहेत. हॉस्पिटलमध्ये लागणारे बेड, फर्निचर, मशिनरी तसेच रिपेअरिंग सेवा याशिवाय लहान-मोठी कंझ्युमेबल प्रॉडक्ट्स, रेकॉर्डिंग पेपर्स, रुग्णांसाठी घरगुती वापरातील उपकरणे यांचा समावेश आहे. मुंबईतील नामांकित रुग्णालयांपासून (जसे की जुपिटर, हिंदुजा, जसलोक) ते छोट्या क्लिनिकपर्यंत ‘मेडिका एंटरप्राइझेस’ने काम केले आहे.

Jitendra Nemadeडॉक्टर व हॉस्पिटल यांना आवश्यक गोष्टी पुरवतानाच रुग्णांसाठी घरी लागणारी उपकरणे उपलब्ध करून देण्याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. काही प्रॉडक्ट्स विक्रीसाठी असतात, पण काही प्रॉडक्ट खूप महागडी असतात मग अशी प्रॉडक्ट भाड्याने दिली जातात.

कोविड काळात मास्क, पीपीई किट्स, पल्स ऑक्सिमीटर, थर्मामीटर, ऑक्सिजन यांसारख्या साधनांची मागणी वाढली तेव्हा त्यांनी मोठ्या प्रमाणावर ती सेवा दिली. त्यामुळे त्यांच्या व्यवसायाने आव्हानांना सामोरे जात एक संधी निर्माण केली.

आरोग्य क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान सतत येत असते. डॉक्टरांच्या मागणीनुसार आधुनिक उपकरणे, घरच्या घरी तपासणीसाठी लागणारी साधने, तसेच संपूर्ण आयसीयू सेटअप घरी देण्यापर्यंतची सेवा ‘मेडिका एंटरप्राइझेस’ने सुरू केली. पेशंट डिस्चार्ज झाल्यानंतर घरी लागणारी भाड्याने मिळणारी साधने उपलब्ध करून देणे, ही त्यांची एक महत्त्वाची सेवा आहे.

आपल्याकडे पायाचे आरोग्य याविषयी जागरूकता नाही. ‘मेडिका’ने मेडिकल फुटवेअर सेंटर सुरू करून लोकांमध्ये पायाच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण केली. फ्लॅट फूट, पाय वाकडे होणे, मधुमेहामुळे होणार्‍या जखमा, पाठदुखी किंवा कंबरदुखी अशा समस्यांवर कस्टमाईझ्ड फुटवेअर तयार करून दिले जाते. याचा लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत अनेकांना फायदा होत आहे.

‘मेडिका एंटरप्रायझेस’ फक्त प्रॉडक्ट विक्रीपुरते मर्यादित नाही. रोटरी क्लब, लायन्स क्लब, सीनियर सिटीजन ग्रुप्स अशा ठिकाणी हेल्थ अवेअरनेस कॅम्प, फुट स्क्रीनिंग कॅम्प, हिअरिंग एड तपासणी अशा उपक्रमांतून ते लोकांपर्यंत पोहोचतात. सोशल मीडियाचा वापर करून आरोग्याशी संबंधित माहिती देण्याचं कामही ते सातत्याने करत आहेत.

‘मेडिका एंटरप्राइझेस’चा डॉक्टर व हॉस्पिटलना प्रॉडक्ट विक्री हा व्यवसाय आहे. तर रुग्णांच्या घरी लागणार्‍या सेवा देणे ही खरी सेवा आहे, असे नेमाडे मानतात. आतापर्यंत १५ हजारहून अधिक लोकांनी त्यांच्या सेवेचा लाभ घेतला असून मुंबईबरोबरच मुंबईबाहेरही काही प्रॉडक्ट्स ते पुरवतात.

आज गिफ्टिंगचे पारंपरिक पर्याय अनेक आहेत, परंतु उपयुक्तता आणि आरोग्य या दृष्टीने मेडिकल प्रॉडक्ट्स हा एक वेगळा आणि उपयोगी पर्याय आहे. यात छोट्या किमतींपासून ते प्रीमियम प्रॉडक्टपर्यंत विविध पर्याय उपलब्ध आहेत.

आज जवळपास प्रत्येक कुटुंबात कोणी ना कोणी मधुमेह, बीपी, सांधेदुखी किंवा लहान-मोठ्या आजारांनी त्रस्त असतो. अशावेळी गिफ्ट म्हणून मेडिकल प्रॉडक्ट दिले तर त्याचा उपयोग आरोग्याला होतो. घरी थर्मामीटर, ऑक्सिमीटर, बीपी मशीन, फर्स्टएड किट, आईस बॅग, हॉट वॉटर बॅग इ. वस्तू असणे अत्यावश्यक आहे.

एखाद्या कंपनीने आपल्या कर्मचार्‍यांना सणासुदीला अशा उपयुक्त किट्स दिल्या, तर ते केवळ गिफ्ट न ठरता कर्मचार्‍यांच्या आरोग्याची काळजी घेणारी एक पायरी ठरते. कुटुंबीय, नातेवाईक किंवा मित्रांना अशा भेटवस्तू दिल्यास त्यांना आरोग्य जपण्यासाठी प्रत्यक्ष मदत मिळते. आज लोक मोठी घरे, महागड्या गाड्या घेतात, पण फर्स्टएड किट घरात, गाडीत नसते. ही मानसिकता बदलायला हवी.

हे गिफ्ट केवळ वस्तू नसून आरोग्याबद्दलची जाणीव आहेत. त्यामुळे पुढच्या वेळी गिफ्ट निवडताना ड्रायफ्रुट्ससोबतच थर्मामीटर, बीपी मशीन, ऑक्सिमीटर किंवा फर्स्टएड किट यांचा विचार जरूर करा. ही भेट आपल्या आप्तस्वकीयांच्या आरोग्याची खरी काळजी घेईल.

संपर्क : 9820002890

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

books for life website Ad
Click here to visit: booksforlife.in
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
Smart Udyojak India Business Directory
आशिष पेटे : सौरऊर्जेने ग्रामीण महाराष्ट्रात घडवलेली हरितक्रांती व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस व्हिसिटिंग कार्डचं महत्त्व उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?