
उद्योजकाचे नाव : नितिन साळकर
व्यवसायाचे नाव : Intellectual Research And Development Matrix
जिल्हा : मुंबई
जन्मदिनांक : २६ ऑगस्ट, १९६६
व्यवसाय स्थापना वर्ष : २००९
१९९८ साली काही वैयक्तिक आणि व्यावसायिक कारणामुळे व्यावसायिक, मानसिक आणि भावनिक प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती. तेव्हा नितीन साळकर यांच्या एक गोष्ट लक्षात आली की व्यावसायिक सल्लागार मानसिक प्रश्नांची उत्तरे देत नाहीत आणि मानसोपचारतज्ज्ञ व्यावसायिक प्रश्नांची उत्तरे देत नाहीत.
इथूनच खऱ्या अर्थाने त्यांच्यातला उद्योजक जागा झाला आणि त्यांनी ही उणीव भरून काढण्यासाठी काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गोव्यात David Lincon यांच्याकडून एनएलपीचे प्रशिक्षण घेतले. नितिन साळकर एनएलपी प्रॅक्टिशनर होण्याआधी आर्थिक आणि वित्तीय सल्लागार म्हणून काम करत होते.
शिक्षण, करिअर निवड आणि उद्योजक या क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारची शिक्षणप्रणाली नाही आहे, असे कळून चुकले. संशोधनाअंती असे कळले की विद्यार्थी, पालक आणि उद्योजक निराश झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्यातली गुणवत्ता दडपली गेलेली आहे. त्यामुळे व्यवसाय विकासाची संधी दिसली.
खरे तर व्यावसायिक सल्लागार आणि मानसोपचारतज्ज्ञ दोघांशी एकमेकांचा संबंध येतो. त्यानंतर मानसशास्त्र आणि व्यवसायाविषयी शिक्षण घ्यायला सुरुवात केली. २००९ नंतर quantum learning – विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकास, career intellect test – करिअर गुणवत्ता विकास आणि entrepreneurial intelligence – उद्योजकीय गुणवत्ता विकास असे मोडेल तयार करून व्यवसायाला सुरुवात केली.
या प्रवासात कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला याबद्दल साळकर सांगतात, शिक्षण, करिअर निवड आणि उद्योजकता या सर्व विषयांचे प्राथमिक शिक्षण देणारी संस्था नाही आहे. सर्वस्वी पुस्तके आणि ‘गुगल’वर अवलंबून राहावे लागले.
वेगवेगळ्या विषयांचे व्यावसायिक सल्लागार एकत्रितपणे काम करत नाही आहे. हे सल्लागार त्यांची विषयातले तज्ज्ञ आहेत, परंतु त्यांना व्यवसाय सुरू, चालू, टिकवावा आणि विस्तार कसा करावा याबद्दल माहिती नाही आहे.
उद्योजकीय जीवनात बऱ्याच जणांची मोलाची साथ मिळाली. त्यांचा उल्लेख करायचा तर जागा अपुरी पडेल म्हणून साळकर यांनी या सगळ्यांची कृतज्ञता सूची आपल्याकडे तयार ठेवली आहे. प्रवास कठीण आहे. कार्य कठीण आहे, म्हणूनच करायचे आहे, अजूनही बराच मोठा पल्ला गाठायचा आहे.
नितिन साळकर यांना भविष्यात विद्यार्थी आणि उद्योजकांसाठी गुणवत्ता संशोधन केंद्राची स्थापना करायची आहे, जिकडे शैक्षणिक गुणवत्ता विकास, करिअर गुणवत्ता विकास आणि उद्योजकीय गुणवत्ता विकास यावर संशोधन करून जे सध्या त्यांच्याकडे मॉडेल तयार आहे, त्यात अजून नवनिर्माण करायचे आहे.
व्यवसायाचा पत्ता : A-२१, स्टारलाइन सोसायटी, गोराई – १, प्लॉट नं, २०, बोरीवली (प), मुंबई – ४०००९१.
संपर्क क्रमांक : ९३२१८९७९४१
ई-मेल : nitinsalkar@hotmail.com
संकेतस्थळ : www.intellectrdm.com


