पैशाच्या मुळाशी जाणारा विचार – Money Roots ची प्रेरणादायी कथा
मनुष्य आयुष्यभर पैसा कमावण्यासाठी धडपडत असतो, पण त्या पैशाचं योग्य नियोजन करण्यासाठी वेळ देत नाही. हीच जाणीव एका शिक्षकाला झाली… आणि त्यातून जन्म झाला Money Roots – Foundation for Wealthy Life या आर्थिक साक्षरतेच्या चळवळीचा.
या संस्थेचे संस्थापक Pradeep Chaudhary यांनी ‘Foundation for Wealthy Life’ ही टॅगलाईन केवळ घोषवाक्य म्हणून नाही, तर ध्येय म्हणून स्वीकारली. त्यांचा विश्वास स्पष्ट आहे – भक्कम पाया असेल, तरच आर्थिक इमारत मजबूत उभी राहते.
शिक्षक ते Financial Educator – संघर्षातून घडलेलं व्यक्तिमत्त्व
उल्हासनगरमधील सर्वसामान्य कुटुंबात वाढलेले प्रदीप चौधरी यांनी बी.एस्सी. आणि बी.एड. पूर्ण करून १९९६ मध्ये शिक्षक म्हणून करिअरची सुरुवात केली. ताराबाई मोडक सरकारी डीएड कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून त्यांनी काम केले, पण सरकारी नोकरीतील मर्यादा आणि अस्थिरता पाहता त्यांनी आयुष्य केवळ नोकरीपुरते मर्यादित ठेवायचे नाही, असा निर्णय घेतला.
१९९७ साली पत्नी विद्या चौधरी यांच्या भक्कम साथीने त्यांनी ‘विद्यादीप कोचिंग क्लासेस’ सुरू केले. त्यांच्या शिकवण्याच्या वेगळ्या पद्धतीमुळे आणि विद्यार्थ्यांशी असलेल्या आत्मीय नात्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे करिअर घडले, परंतु २०१४ मध्ये त्यांनी सर्वांना आश्चर्यचकित करणारा निर्णय घेतला. यशाच्या शिखरावर असताना क्लासेस बंद करण्याचा!
कारण एकच विद्यार्थ्यांना हवा तसा वेळ देता येत नसेल तर थांबणं योग्य. हा निर्णयच त्यांच्या आयुष्यातील दुसऱ्या अध्यायाची सुरुवात ठरला.
विमा एजंट नव्हे, तर आर्थिक साक्षरतेचा दूत
सुरुवातीला एका मित्राच्या मार्गदर्शनातून त्यांनी LIC एजन्सी घेतली. अनेकांच्या दृष्टीने दुर्लक्षित असलेलं क्षेत्र त्यांनी सामाजिक ध्येयाशी जोडलं.
छोटे दुकानदार, कामगार, भंगार विक्रेते, तळागाळातील कर्मचारी यांना विम्याचं महत्त्व समजावून सांगणं, त्यांच्यासाठी योग्य योजना तयार करणं आणि आर्थिक सुरक्षिततेचं बी पेरणं… हे त्यांचं खरं मिशन बनलं.
त्यांनी स्वतःला अधिक सक्षम करण्यासाठी :
- फायनान्समध्ये MBA
- Chartered Financial Goal Planner
- Advanced Chartered Financial Goal Planner
- Qualified Personal Financial Professional
अशा पदव्या प्राप्त केल्या.
Money Roots – आर्थिक स्वातंत्र्याची शाळा
आज Money Roots हे केवळ Financial Advisory Center नाही, ती एक Financial Literacy Movement आहे.
आजची कामगिरी :
- ६,०००+ पॉलिसीहोल्डर्स
- ₹२५० कोटींचा विमा व्यवसाय
- ₹५० कोटींचा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ
- देशभर आणि परदेशातील ग्राहक
एकाच छताखाली २०+ सेवा :
- Life Insurance
- Mediclaim
- Mutual Funds
- Housing Loan
- Tax Planning
- General Insurance
- Business Insurance
- Will Making आणि बरेच काही…
प्रत्येक ग्राहकाची सविस्तर केस स्टडी करून त्यांच्या जीवनातील उद्दिष्टे, उत्पन्न आणि जबाबदाऱ्या लक्षात घेऊन वैयक्तिक Financial Planning केली जाते.
त्यांचा मंत्र स्पष्ट आहे :
“Client First हे पर्याय नाही, तो आपल्या कामाचा DNA असला पाहिजे.”
आर्थिक साक्षरता : केवळ व्यवसाय नाही, एक ध्येय
प्रदीप चौधरी विविध कंपन्यांतील अधिकारी, कर्मचारी, कामगार आणि उद्योजकांसाठी Financial Literacy Seminars घेतात. सोशल मीडिया, प्रदर्शनं, पॅम्फ्लेट्स यांद्वारे ते जनजागृती करतात. त्यांचा विश्वास, “आपला क्लायंट श्रीमंत झाला की आपणही होणारच. पण त्यासाठी प्रामाणिकपणा अनिवार्य आहे.”
यशामागची माणसं
प्रत्येक यशामागे काही हात असतात.
- पत्नी विद्या चौधरी – संघर्षकाळातील भक्कम आधार
- दिवाकर सोनवणे सर – शिक्षण क्षेत्रातील पहिली संधी
- मित्र अजीझ खान – व्यवसायाच्या सुरुवातीचा आधार
- स्व. केशव चौधरी
- रेखा व सुनील बर्हाटे (HPCL)
- श्रीनिवास बोबडे (Executive Engineer, SSEDC)
- निशांत महाजन (KDMC)
- संजय मोरे (General Secretary, MRMVKASA MSEDCL)
- डॉ. सायली संतोष चौधरी (MD)
ही मंडळी केवळ व्यावसायिक सहकारी नाहीत, ते आत्मीयतेने जोडलेले जिवलग मित्र आहेत.
या कथेतून शिकण्यासारखं काय?
- शिक्षण कोणत्याही क्षेत्रात उपयोगी पडतं
- प्रामाणिकपणा हा दीर्घकालीन यशाचा पाया आहे
- Financial Literacy ही आजची सर्वात मोठी गरज आहे
- योग्य मार्गदर्शन आयुष्य बदलू शकतं
सध्या पाच सदस्यांची कुशल टीम Money Roots सोबत कार्यरत आहे. पुढील उद्दिष्ट कंपनीला Private Limited स्वरूप देऊन राष्ट्रीय स्तरावरील विश्वासार्ह Financial Brand बनवणे. त्यांची पुढील पिढीही या क्षेत्रात पाऊल ठेवत आहे हीच त्यांच्या प्रवासातील सर्वात मोठी कमाई.



नमस्कार स्मार्ट उद्योजक,
तुमचा हा लेख अतिशय उत्तम आहे. एका व्यक्तीच्या ध्येयाला तुम्ही प्रसिद्धी दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
आर्थिक साक्षरता हा आजच्या काळातील अतिशय महत्त्वाचा विषय आहे. ज्याकडे गांभीर्याने पाहण्याची सवय सर्वसामान्यांना नाही. मी इथे मुद्दाम ‘सवय’ हा शब्द वापरत आहे.
चला तर मग आपणही ही सवय लोकांच्या अंगी बाणवावी ह्यासाठी आपले योगदान देऊ यात.