1007 annual marketing

‘सक्सेस अबॅकस’ची फ्रँचायजी घेऊन ही गृहिणी घरबसल्या झाली उद्योजिका

शिक्षण झाले की नोकरी, व्यवसाय, लग्न, कौटुंबिक जबाबदार्‍या या चक्रात प्रत्येकजण गुरफटत जातो. आयुष्य सगळ्यांचे बदलते पण मुलींचे आयुष्य जरा जास्त बदलते. आज समाजात आपल्या आजूबाजूला अशा अनेक स्त्रिया असतात, ज्या उच्च शिक्षित असूनसुद्धा कौटुंबिक जबाबदार्‍या सांभाळता सांभाळता नोकरी, व्यवसाय किंवा अर्थार्जन यापासून वंचित राहतात. दरम्यानच्या काळात लोकांचे टोमणेही ऐकावे लागतात.

अनेक वेळा एवढे शिकूनही ही काय करतेय घरातच तर असते. एवढ्या शिक्षणाचा उपयोग काय? हे कानावर पडत असते. कधी उघडपणे कधी कुजबुज ऐकायला मिळत असते, पण ती स्त्रीसुद्धा पुरती अडकलेली असते. अशा अनेकजणी आहेत ज्या सांसारिक जबाबदार्‍या सांभाळत थोडा वेळ काढून स्वत:च्या अस्तित्वासाठी धडपड करून मार्ग शोधतात.

घर आणि व्यवसाय यांचा मेळ घालत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सज्ज असतात. अनेक वेळा पर्याय सापडत नाहीत किंवा आपल्याला जमेल का? आर्थिक नुकसान तर होणार नाही ना? अशा अनेक प्रश्नांनी घेरलेल्या असतात. अशा सर्व महिलांसाठी आपल्या अश्विनी प्रशांत फडतरे यांची गोष्ट नक्कीच प्रेरणादायी असेल.

मूळच्या सातारा जिल्ह्यातल्या करंजे गावच्या अश्विनी यांचे सासर सातार्‍यातील विसापूर. या नवर्‍याच्या नोकरीनिमित्त पुण्यात आल्या. त्या एमएस्सी आहेत. लग्नानंतर मुलांची जबाबदारी असल्यामुळे नोकरी व्यवसाय असे बारा वर्षे काही करता आले नाही.

अश्विनी सांगतात, खरं तर मुलं, कौटुंबिक जबाबदार्‍या सांभाळून काय करायचं हे मला समजतच नव्हतं. एक दिवस सहज फेसबुक चाळत असताना मला ‘सक्सेस अबॅकस’ची जाहिरात दिसली. मग मी ‘सक्सेस अबॅकस’चा वेबिनार केला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण घरात बसून काही तरी करू शकतो. आपण स्वत:चं अस्तित्व निर्माण करू शकतो.

तसं माझ्या संसारात काही कमी नव्हती. पण समाजात स्वत:च्या कर्तृत्वाने ओळख हवी होती. मला इथे आशेचा किरण दिसला. अगदीच आपल्याला जमले नाही तर आपल्या मुलांना तरी मी नक्कीच शिकवू शकेन हा विश्वास होता. म्हणून मग मी फ्रँचायसी घ्यायचे ठरवलं.

WhatsApp Channel Banner

मी जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा कोरोनाच्या पाऊलखुणा पुसल्या नव्हत्या. सगळे ऑनलाईन चालू होते. पण मी नीट माहिती घेतली. सार्‍या गोष्टी पडताळून पाहिल्या. मनात एक विश्वास निर्माण झाला आणि मगच फ्रँचाईजी घेतली. माझ्या नवर्‍याचीही खूप चांगली साथ मिळाली. त्यांच्याशी चर्चा करूनच मी ही फ्रँचाईजी घेतली.

मला खरं तर शिकवण्याचा कसलाही अनुभव नव्हता, पण ‘सक्सेस अबॅकस’ने मुलांना कशाप्रकारे शिकवायचं, समजून सांगायचं याबाबत प्रशिक्षण दिलं, मार्गदर्शन केलं. माझ्या सर्व प्रकारच्या शंकांचे निरसन केलं आणि मला तयार केलं.

२०२२ साली अश्विनी यांनी पिंपरी चिंचवड निगडी येथे आपल्या घरी ऑनलाईन क्लासेसचा सेटअप तयार करून व्यवसायाला सुरुवात केली. अबॅकसचे ऑनलाइन वर्ग त्या घेतात. पहिली जी बॅच सक्सेस झाली त्यामध्ये २६ अ‍ॅडमिशन होती. मग मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

त्यांनी वर्षभरात १२६ अ‍ॅडमिशन केलेले आहेत आणि शतकवीर हा सन्मान मिळवलेला आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी अडीचशेपेक्षा जास्त मुलांना शिकवले आहे. मग कंपनीकडून ट्रेनर म्हणून निवड झाली. मागील दोन वर्षात त्यांना ‘सक्सेस अबॅकस’ कंपनीकडून विविध पुरस्कारांनी सन्मानीतही करण्यात आले आहे.

‘सक्सेस अबॅकस’ कंपनीचा आणि विशेष म्हणजे कंपनीचे सीईओ किरण पाटील सरांचा फ्रँचायझीच्या सर्व आघाड्यांवर पाठिंबा मिळाल्याने आपले इच्छित ध्येय साध्य करता आले, असे प्रामाणिकपणे अश्विनी यांना वाटते. लग्नानंतर स्वत:ला आर्थिकदृष्ट्या सबळ करण्याचा प्रयत्न त्या करत होत्या, पण इतर जबाबदार्‍यांमुळे बारा वर्षे हे शक्य झाले नाही.

Sponsored Article

तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.

🚀 अधिक माहिती

success abacus franchise owner success story

या फ्रँचायसीमुळे आत्मविश्वास निर्माण झाला आणि ‘सक्सेस अबॅकस’मुळे आर्थिक सबलीकरण शक्य झाले आणि लोकांची तोंडेही बंद झाली. अशा अनेक महिला आहेत, ज्यांना त्यांच्या घरातील जबाबदार्‍यांमुळे किंवा काही व्यवधानांमुळे घराबाहेर पडून नोकरी किंवा व्यवसाय करता येत नाही तर अशा महिलांना अश्विनी मॅडम सांगतात, तुम्ही स्वत:वर विश्वास ठेवा आणि सुरुवात करा. मार्ग नक्की सापडतो. जसा त्यांना या फ्रँचायजीमुळे गुंतवलेला पैसा हा तीन ते चार महिन्यात परत मिळाला आणि नियमित अर्थार्जनसुद्धा सुरू झाले.

एखाद्याला ‘सक्सेस अबॅकस’ची फ्रँचाईजी घ्यायची असेल तर कंपनी खूप चांगले सहकार्य करते. चांगल्या पद्धतीत प्रशिक्षित करते. त्यामुळेच अश्विनी यांच्या वर्गात पुणे, मुंबई, परभणी, धुळे, जालना, बीड, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, अहिल्या नगर, नागपूर, नाशिक इतर राज्यातले जसे तेलंगणा, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील इतर ग्रामीण भागातले विद्यार्थीसुद्धा बसले आहेत.

ग्रामीण भागात अनेक मुलांना शिक्षण घ्यायचे असते, पण त्यांच्याकडे कोणते साधन उपलब्ध नसते त्यामुळे अशा मुलांनाही शिक्षण घ्यायला ऑनलाइन पद्धती मदत करते. नवीन नवीन व्यवसाय सुरू झाल्यावर जास्त समस्या येतात पण कितीही अडचणी आल्या तरी आपण ठरवलेले ध्येय साध्य करायचेच या विचाराने मार्गक्रमण करत राहायचे.

सुरुवातीला काम करताना सतत छोट्या छोट्या गोष्टीत मदत लागते, विचारावे लागते, पण हळूहळू आता सगळ्या गोष्टींची माहिती झाल्यामुळे स्वत: सर्व सांभाळता येते. नवीन नवीन पालकांचा विश्वासही बसायला वेळ लागला. पण आता ‘सक्सेस अबॅकस’सुद्धा नावारुपाला आले आहे. त्यामुळे विश्वास निर्माण झालाय. वय वर्षे सहा ते चौदा वर्षाची मुले कोर्स जॉईन करू शकतात.

साधारणपणे संध्याकाळी आठवड्यातून तीन दिवस हा वर्ग घेतला जातो. गणितीय पद्धती म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या पद्धती यात शिकवल्या जातात. या वर्षी चार बॅचेस आहेत त्यामुळे आठवड्यातून दोन-दोन दिवस एक बॅच मी घेते, असे अश्विनी मॅडम म्हणाल्या.

आमच्याकडे एक मुख्य आकर्षण म्हणजे नॅशनल लेव्हल अबॅकस कॉम्पिटिशन. प्रथम येणार्‍या विद्यार्थ्याला ‘सक्सेस अबॅकस’ एक लाखाची स्कॉलरशिपदेखील देते. या संपूर्ण प्रवासात ‘सक्सेस अबॅकस’चे सीईओ किरण पाटील सर यांच्याबरोबर सर्व ‘सक्सेस अबॅकस’ टीमचे खूप सहकार्य लाभले. तसेच माझे आई वडील, सासू-सासरे, माझ्या दोन चिमुकल्या मुलांचे, माझे बहीण भाऊ यांचेही सहकार्य लाभले.

‘सक्सेस अबॅकस’ फ्रँचायझीसाठी संपर्क : 8888560022

‘स्मार्ट उद्योजक’ मासिकात विशेष मुलाखत देऊ इच्छित असाल तर येथे क्लिक करा!

Author

  • pratibha shailesh rajput

    यांनी पदव्युत्तर पत्रकारितेत पदविका केली आहे. प्रिंट माध्यमांत काही काळ काम केल्यानंतर त्यांनी स्मार्ट उद्योजक हे मासिक सुरू केले.

    View all posts

तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.

'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:

  • ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
  • ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
  • ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
  • ✅ सोशल मीडिया प्रमोशन

तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.

🚀 येथे क्लिक करा
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top

🚀 व्यवसायात पुढे राहायचे आहे?

'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे वर्गणीदार व्हा!

३ महिन्यांची वर्गणी
फक्त ₹300
📈 व्यवसाय मार्गदर्शन
💡 मार्केटिंग टिप्स
🤝 प्रेरणादायी यशोगाथा
💰 आर्थिक नियोजन मार्गदर्शन


👉 आजच वर्गणी भरा