
स्त्री ही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या भूमिका प्रभावीपणे साकारत असते. घरच्या चार भिंतींच्या आत ती मुलगी, बहीण, बायको, आई, सून, वहिनी अशा अनेक भूमिका पार पाडते. उंबरठ्याच्या बाहेर पाऊल पडले की तीच स्त्री समाजात तिची स्वत:ची छाप सोडते ते तिच्या कर्तृत्वाने. मग ते क्षेत्र कोणतेही असो.
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव या सदैव दुष्काळी गावातील ‘महाकिसान फार्मर्स प्रोड्युसर कंपनी’च्या संचालक शीतल डोंगरे या आहेत. पदवीधर असलेल्या शीतल शेतकरी कुटुंबातून आहेत. महाकिसान फार्मर्स प्रोड्युसर या कंपनीची स्थापना करण्याची प्रेरणाही एक महिलाच आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अनिता माळगे या देशातली पहिल्या महिला शेतकरी उत्पादक कंपनी आहे. त्यांच्या कंपनीचे बाराशेपेक्षा जास्त महिला सभासद आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊनच या क्षेत्रात पाऊल टाकले.
‘महाकिसान’ ही शेतकरी उत्पादन कंपनी आहे. प्रत्येक अल्पभूधारक शेतकर्याला तंत्रज्ञानाशी संलग्न शेती करायला जमेलच असे नाही याची कारणे वेगवेगळी असतील. म्हणजे उदा. स्वत:चा मालकी हक्काचा ट्रॅक्टर घेऊन शेतात नांगरणी परवडत नाही. कारण हे खर्चिक आहे. मग अशा वेळी शेतकर्यांनी एकत्रित यावं आणि गटशेती करावी.
एकत्रित सगळ्यांनी असा ट्रॅक्टर खरेदी केला तर त्याचा लाभ सगळेच घेऊ शकतात. यातून शेतीमध्ये सुधारणा घडवून आणता येतात. अशा गोष्टींचा विचार करून कामाला सुरुवात झाली.
जूनमध्ये कंपनी स्थापन करण्यात आली. त्यानंतर जिल्हा पातळीवर नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन ही केंद्र सरकारची जी योजना आहे त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातून मुरघास निर्मितीच्या मशीन प्रकल्पासाठी ‘महाकिसान’चा अर्ज मंजूर झाला आणि त्याचवर्षी तो कार्यान्वित झाला. यात शेतकरी आणि आपण मिळून कंपनीची सुरुवात करू शकतो.
हळूहळू एक एक करता आज पाचशे शेतकरी सभासद म्हणून जोडले गेलेत. त्यामुळे प्रत्येक सभासदाची दोन एकर जमीन जरी गृहीत धरली तरी हजार ते दीड हजार हेक्टर एवढी जमीन कंपनीशी संलग्न आहे.
या कंपनीच्या माध्यमातून पशुखाद्यनिर्मिती व धान्य उत्पादनाचे पॅकिंग आणि ब्रॅण्डिंग करण्याचे काम केले जाते. मुरघास हे यांचे मुख्य पशुखाद्य आहे. सोलापूर जिल्हा, मंगळवेढा तालुका तसा दुष्काळी भाग. इथे पाऊस कमी असतो आणि येथील शेती जी आहे ती सर्वस्वी पावसावर अवलंबून असणारी शेती आहे.
गावात, परिसरात सगळेच लोक शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय करतात. महाराष्ट्रात पशुपालन करताना त्यांच्या चार्याचे व्यवस्थापन यावर काम होणे जास्त गरजेचे आहे हे जाणवले म्हणून मग पंजाब, हरियाणा गुजरात इथल्या दुग्धव्यवसायाचा अभ्यास करून जनावरांच्या चार्याचे व्यवस्थापन समजून घेतले.
तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा
'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.
🚀 अधिक माहितीयातूनच मग मुरघास म्हणजे मक्यापासून तयार केलेला ओला चारा आहे, जो गाईंना देऊ शकतो हे लक्षात आले. याचेही तीन प्रकार आहेत. खड्ड्यातला मुरघास, बॅगमधील मुरघास आणि गठ्ठ्यातला मुरघास.
खड्ड्यातला मुरघास जो आहे तो बनवण्यासाठी लागणारा खर्च, जागा याचा विचार केला तर छोट्या शेतकर्याला ते परवडत नाही. बागेतला चारादेखील एकाच वेळी तीन ते चार टन बागेमध्ये बनवून ठेवू शकत नाही. मुरघास जो चारा आहे तो मुरवलेला असतो आणि एकदा जर का त्याला हवा लागली तर तो खराब होतो. मग ज्यावेळी हे तंत्रज्ञान बघितलं त्यावेळी गठ्ठ्यातला मुरघास याचे मशीन घेतले. त्यापासून मग मुरघासनिर्मितीचा व्यवसाय सुरू केला.
आता ज्या शेतकर्यांचे मक्याचे उत्पादन जास्त आहे त्या सभासद शेतकर्यांचा मका आपण खरेदी करायचे व मुरघास तयार करायचा किंवा ज्याला लगेच मक्याच्या बदल्यात मुरघास हवाय त्याला भाडे तत्त्वावर मशीन द्यायची आणि मुरघास बनवून द्यायचा. काही असेही शेतकरी आहेत जे फक्त मका सप्लाय करतात.
अंदाजे प्रत्येक दिवशी दहा टन मुरघासनिर्मिती येथे होते. पशुखाद्यासोबत खते व बी बियाणे ही शेतकर्यांना वाटली जातात. अनेक वेळा अचानक खते व बी बियाणे याचा तुटवडा मग वेळीच बियाणे न मिळाल्याने नुकसान होते ते टाळता येते. आवश्यक परवानग्या कंपनीच्या नावे घेऊन गरजेला आपल्या सभासद शेतकर्यांसाठी खते आणि बी बियाणे हे हंगाम सुरू होण्यापूर्वी पूर्वनियोजन करून साठवले जातात.
मोठ्या प्रमाणात एकत्रित खरेदी केल्यामुळे सवलतीत बी बियाणं आणि खते मिळतात. मग ते अगदी अल्प मोबदला घेऊन शेतकर्यांना दिली जातात. सभासदांना एक हजार रुपये सभासद शुल्क आकारले जाते आणि त्याबदल्यात कंपनीचे दहा शेअर्स त्यांना दिले जातात. याचा फायदा असा की त्या हजार रुपयांच्या मोबदल्यामध्ये तो व्यक्ती शेतकरी कंपनीचा सभासद होतो याशिवाय कंपनीला जो काही नफा होतो त्यातही त्याला वाटा मिळतो.
मुरघास याची मागील पाच वर्षांपासून संपूर्ण देशामध्ये विक्री होते. राजस्थान, गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यात मुरघासविक्रीला जातो. साधारणपणे पहिल्या वर्षी शंभर टन, दुसर्या वर्षी पाचशे टन, तिसर्या वर्षी 1 हजार टन तर चौथ्या वर्षी बाराशे टन मुरघास विक्री झाला.
या वर्षीचा आमचे टार्गेट आहे की २ हजार टन मुरघासनिर्मिती करणे आणि विक्री करणे. चार हजार स्क्वेअर फुट जागेमध्ये बायडिंग मॅन्युफॅक्चरिंगच्या मशिनरी आहेत. बनलेला माल ठेवण्यासाठी मोकळी जागा आवश्यक असते तर यासाठी साधारण एक एकर जागा लागते. ती कंपनीला भाडेतत्त्वावर दिलेली आहे.
मुरघासावर ऊन, पाऊस कशाचाही परिणाम होत नाही. पण उंदीर, कीटक यापासून त्यांचे संरक्षण आवश्यक असते. यासाठी अर्धा ते पाऊण एकर एवढ्या जागेमध्ये कंपाउंड मारलेला आहे. मुरघासची गुणवत्ता जी आहे ती नंबर वन आहे. त्याचे कारण म्हणजे ते शास्त्रीय पद्धतीने बनवले जाते.
मुरघास बनवताना जे कल्चर वापरले जाते जे फर्मेंटेशन केले जाते ते प्रमाण महत्त्वाचे असते. याचे प्रमाण वाढले तर जनावराच्या शरीरावर परिणाम होणे अपचन होणे गॅसेस होणे अशा प्रकारचे आजार निर्माण होतात. यामुळे विशेष काळजी घेऊन तो बनवला जातो.
मुख्य म्हणजे टेस्टिंगशिवाय कोणालाही मुरघास देत नाही. २०२०-२१ च्या दरम्यान महाराष्ट्र सरकारचा स्मार्ट प्रोजेक्ट बाळासाहेब ठाकरे ग्रामीण उद्योजकनिर्मिती प्रकल्प हा महाराष्ट्र सरकारने वर्ल्ड बँकेच्या सहाय्याने घेतला होता तो फक्त उत्पादक कंपन्यांसाठीच होता.
यात प्रोजेक्टसाठी इन्फ्रास्ट्रक्चर निर्मिती, मशीनरी, अवजारांची बँक असा साधारण एक कोटी ४० लाखाचा प्रोजेक्ट सादर केला गेला आणि तो मंजूर झाला. त्या प्रोजेक्टमधून ६०० मेट्रिक टनची वखार बनवली. शिवाय क्लिनिंग, ग्रीडिंग याची मशीन खरेदी केली. यामुळे ते प्रती घंटा दोन मेट्रिक टन पॅकिंग करू शकले. मशिनरी शेड घेऊन सोबतच ६० मेट्रिक टन क्षमतेचा वजन काटा तयार झाला. आता हा सेटअप तयार आहे.
मंगळवेढा तालुका हा देशभरामध्ये ज्वारीचे कोठार म्हणूनसुद्धा ओळखला जातो. जी आय मानांकनप्राप्त तालुक्यातील ज्वारी आहे जिला ‘मालदांडी ज्वारी’ म्हणतात. पूर्ण देशांमध्ये या क्वालिटीची ज्वारी कुठेही मिळत नाही. म्हणूनच तिला जीआय मानांकन मिळाले आहे. तर ती ज्वारी प्रत्येक शेतकरी देशभरामध्ये विकू शकत नाही म्हणून शेतकर्यांकडून ज्वारीखरेदी करून त्याचे क्लिनिंग केले जाते.
एका किलोपासून २५ किलोपर्यंत पॅकिंग केले जाते आणि त्या ज्वारीचे देशभरामध्ये विक्री करण्याचे नियोजन आहे. मशिनरी इन्स्टॉल झालेले आहेत. ट्रायल्स घेतलेले आहेत. उत्पादने रिलायन्स स्मॉल किंवा डी-मार्ट असेल अशा ठिकाणी पाठवलेली आहेत. काही मान्यता यायच्या बाकी आहेत त्या आल्या की, प्रत्यक्ष काम सुरू होईल. संघटित शेतकर्यांमुळे कंपनीला पन्नास लाखाचे सहकारी कर्ज मंजूर होण्याची क्षमता निर्माण झाली.
संपर्क : 9638900444
तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा
तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.
'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:
- ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
- ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
- ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
- ✅ सोशल मीडिया प्रमोशन
तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.
🚀 येथे क्लिक करा

