1007 annual marketing

AI च्या जमान्यात पारंपारिक पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांना सहकार्य करण्यासाठी ‘GlassMate Media’ सुरू करणारे सुदर्शन दिवेकर

Udyojak Sudarshan Divekar

उद्योजकाचे नाव : सुदर्शन दिवेकर

व्यवसायाचे नाव : GlassMate Media

जिल्हा : ठाणे

माझा जन्म महाराष्ट्रातील रायगड जिल्हा, म्हसळा तालुक्यातील नेवारूळ या खेडेगावात झाला. मी मुंबई विद्यापीठातून एम कॉम पूर्ण केले असून, फिल्म एडिटिंग, Graphic Designing, VFX आणि AI Mastery, Social Media Marketing यामध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत.

WhatsApp Channel Banner

मी LeapForWord या शैक्षणिक संस्थेत आठ वर्षांहून अधिक काळ Offline + Online मीडिया मॅनेजमेंटमध्ये काम केले. त्या अनुभवातून मला व्यवसायांशी थेट काम करण्याची संधी मिळावी आणि त्यांच्या ब्रँडिंगमध्ये योगदान द्यावे, असे वाटले. त्यामुळे मी २०२४ मध्ये GlassMate Media ची स्थापना केली.

उद्योजक होण्याआधी मी मीडिया, डिजिटल मीडिया आणि ब्रँड मॅनेजमेंटमध्ये एक प्रमुख भूमिका बजावत होतो. विशेषतः शैक्षणिक क्षेत्रातील व्हिडिओ कंटेंट, सोशल मीडिया स्ट्रॅटेजी आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये मी काम केले आहे.

मी स्वतःच्या कल्पनांवर आणि कौशल्यांवर आधारित व्यवसाय सुरू करून अधिकाधिक व्यवसायांना मीडिया आणि ब्रँडिंगमध्ये मदत करावी, अशी माझी इच्छा होती. माझ्या अनुभवानुसार, आजच्या AI च्या जमान्यात असे खूप सारे छोटे-मोठे व्यवसाय आहेत, जे अजूनही पारंपारिक पद्धतीने व्यवसाय करतात आणि जगभरातून येत असलेल्या संधींना मुकतात.

अशा व्यवसायांना योग्य डिजिटल ओळख मिळणे गरजेचे आहे जेणेकरून त्यांच्या नफ्यात थोडीफार भर पडेल आणि मी माझ्या आजवरच्या अनुभवातून त्यात योगदान देऊ शकेन असे मला नेहमी वाटत असते म्हणून उद्योजक होण्याचा निर्णय घेतला.

व्यवसाय सुरू करताना मला अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागले. सर्वप्रथम अतिशय कठीण म्हणजे उत्तम पोस्टवरील चांगला जॉब सोडण्याचा निर्णय घेणे, पहिल्या टप्प्यात क्लायंट मिळवणे आणि नेटवर्क वाढवणे, योग्य टीम तयार करणे, स्टार्टअपसाठी भांडवलाची उभे करणे, व्यवसायाच्या ऑनलाईन उपस्थिती बळकट करणे असे एक एक प्रश्न सोडवत गेलो.

Sponsored Article

तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.

🚀 अधिक माहिती

पुढे GlassMate Media च्या माध्यमातून सर्वात पहिला मोठा Client मी जिथून या क्षेत्राची सुरुवात केली ती LeapForWord ऑर्गनायझेशन झाली. नंतर आम्ही EAP India, NextBrick Consultancy, Marico, Prakruti Foundation, SIMBA Scientific Investing, TrueChem, Vista Chemicals, VINS Chemi, FabBox, Atlas SkillTech University आणि GroFo Foundation यांसारख्या ब्रँड्ससाठी काम केले व अजूनही करत आहोत.

आमच्या दर्जेदार सेवा आणि क्लायंटच्या समाधानामुळे आमचा व्यवसाय चांगला विस्तारतो आहे. LeapForWord मध्ये कार्यरत असताना मी राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण क्षेत्रातील मोठ्या डिजिटल मीडिया (DD National) मोहिमेचे नेतृत्व केले. अनेक ब्रँड्ससाठी प्रभावी ब्रँड स्ट्रॅटेजी आणि मीडिया सोल्युशन्स तयार करून त्यांना अधिक यशस्वी करण्यात योगदान दिले आहे.

माझ्या आजवरच्या प्रवासात कुटुंबाची आणि मित्रांची मोलाची साथ मिळाली. LeapForWord चे संस्थापक आणि आजी-माजी सहकारी मार्गदर्शकांकडून मिळालेला अनुभव आणि पाठिंबा माझ्यासाठी महत्त्वाचा ठरला. माझ्या पहिल्या क्लायंट्सनी माझ्यावर विश्वास ठेवून मला प्रकल्प दिले, त्यामुळे व्यवसायाला वेग मिळाला.

भविष्याची आमचा उद्देश GlassMate Media ला एक प्रमुख मीडिया एजन्सी बनवण्याचा आहे. पुढील काही वर्षांत आम्ही अधिक इनोव्हेटिव्ह कंटेंट, AI-आधारित मीडिया सोल्युशन्स आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये विस्तार करण्याची योजना आखत आहोत.

आम्हाला पारंपारिक, सामाजिक व नवीन व्यवसायांना आणि संस्थांना त्यांच्या ब्रँड स्ट्रॅटेजीमध्ये व मार्केटिंगमध्ये मदत करायची आहे, जेणेकरून त्यांना व्यवसायात वेगाने वाढ करता येईल.

जन्मदिनांक : ४ मे १९९५

व्यवसाय स्थापना वर्ष : 2024

व्यवसायाचा पत्ता : मुंबई, महाराष्ट्र

संपर्क क्रमांक : 8097803740

ई-मेल : glassmatemedia@gmail.com | info@glassmatemedia.com

संकेतस्थळ : www.glassmatemedia.com

Table of Contents

Author

तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.

'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:

  • ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
  • ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
  • ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
  • ✅ सोशल मीडिया प्रमोशन

तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.

🚀 येथे क्लिक करा
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top

🚀 व्यवसायात पुढे राहायचे आहे?

'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे वर्गणीदार व्हा!

३ महिन्यांची वर्गणी
फक्त ₹300
📈 व्यवसाय मार्गदर्शन
💡 मार्केटिंग टिप्स
🤝 प्रेरणादायी यशोगाथा
💰 आर्थिक नियोजन मार्गदर्शन


👉 आजच वर्गणी भरा