‘विश्वविहार हॉलिडेज’ची फ्रँचायझी घेऊन घरबसल्या पर्यटन व्यवसाय सुरू करणाऱ्या उद्योजकांच्या यशोगाथा

संजय वझे व राजेंद्र जोशी या दोन मित्रांनी एकत्र येऊन २००९ मध्ये स्थापन केलेली ‘विश्वविहार हॉलिडेज’ या कंपनीने गेल्या सोळा वर्षांत पर्यटन क्षेत्रात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.दर्जेदार सहली, वैयक्तिक सेवा आणि ग्राहकांच्या अपेक्षांना प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनामुळे ‘विश्वविहार हॉलिडेज’ आज ७००+ गुगल रिव्ह्यूज आणि ५,०००+ समाधानी ग्राहकांसह पर्यटन क्षेत्रातील एक विश्वासार्ह नाव बनले आहे.

‘विश्वविहार हॉलिडेज’ केवळ टूर्स आयोजित करत नाही, तर प्रत्येक प्रवासात आनंद आणि समाधानाची अनुभूती देते. संजय वझे आणि राजेंद्र जोशी यांच्या नेतृत्वाखाली सेल्स, ऑपरेशन्स आणि लॉजिस्टिक्स यांचा सुंदर समन्वय या कंपनीला इतरांपासून वेगळे बनवतो.

‘विश्वविहार’ने फ्रँचायझी पार्टनरशिप प्रोग्राम सुरू केला आहे, जो दर्जेदार सहली विकण्याची आवड असणार्‍यांसाठी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची उत्तम संधी आहे. यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांतून कोणीही यात सहभागी होऊ शकते.

विशेषत: अर्ध वेळ व्यवसाय किंवा करिअर ब्रेकनंतर नव्याने सुरुवात करू इच्छिणार्‍या महिलांसाठी ही संधी आहे. ज्यांच्याकडे वेळ देणं शक्य आहे असे कोणीही यात जोडले जावू शकते. फ्रँचायझी पार्टनर्सना आकर्षक कमिशन, बोनस आणि टूर लीडर म्हणून काम करण्याची संधी इथे मिळते.

गेल्या दहा वर्षांत ‘विश्वविहार’ची फ्रँचायझी घेऊन स्वतःचा यशस्वी व्यवसाय करत असलेल्या या काही उद्योजकांचे अनुभव येथे देत आहोत.

फ्रँचायझीसाठी संपर्क – 9323666206 । 9920120183


‘विश्वविहार’चे पहिले फ्रँचायझीधारक वरुण लिमये यांचा दहा वर्षांचा प्रवास

Varun Limaye२०१४ साली ‘विश्वविहार हॉलिडेज’च्या फ्रँचायझी मॉडेलची सुरुवात झाली आणि पहिले फ्रँचायझीधारक ठरले रत्नागिरीचे तरुण उद्योजक वरुण लिमये. आज ते रत्नागिरी आणि पुण्यातून आपला व्यवसाय करतात. ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर व्यवसायाच्या शोधात असताना पर्यटनाची आवड त्यांना या क्षेत्राकडे घेऊन आली.

आई-वडिलांसोबत हिमाचल प्रवासाचा अनुभव घेतल्यानंतरच हॉबी आणि पॅशन एकत्र आणून व्यवसाय का करू नये? हा विचार त्यांच्या मनात आला. ‘विश्वविहार हॉलिडेज’चे संचालक संजय वझे यांच्याशी चर्चा करून त्यांनी ‘विश्वविहार’शी हातमिळवणी केली आणि आज दहा वर्षांहून अधिक काळ या क्षेत्रात सक्रिय आहेत.

लिमये स्वत: टूर लीडर म्हणूनही काम करतात. उत्तर भारत, कच्छ, काश्मीर अशा लोकप्रिय पर्यटनस्थळांवर त्यांनी शेकडो प्रवाशांना मार्गदर्शन केले आहे. त्यांचा ठाम विश्वास आहे की पर्यटन व्यवसायात टिकण्यासाठी केवळ पॅकेज विकणे पुरेसे नाही, तर ग्राहकांशी जवळीक ठेवणे, दर्जेदार सेवा देणे आणि प्रामाणिकपणे काम करणे महत्त्वाचे आहे.

‘विश्वविहार’ची तत्त्वे पारदर्शकता, ग्राहकांना पाहुणे मानून सेवा देणे आणि कामाच्या दर्जावर कधीही तडजोड न करणे यामुळेच ते या ब्रँडशी बांधिल राहिले आहेत.

सुरुवातीच्या काळात लिमये यांना या क्षेत्राविषयी विशेष माहिती नव्हती, पण कंपनीकडून मिळालेले प्रशिक्षण, मार्केटिंग साहित्य, लीड जनरेशन आणि प्रेझेंटेशनबद्दल मार्गदर्शन यामुळे त्यांची व्यावसायिक प्रगती झाली. काळानुसार पर्यटन क्षेत्रात डिजिटलायझेशन आले आणि ‘विश्वविहार’ने बुकिंग, डेटा मॅनेजमेंट, आफ्टर-सेल्स सर्विस यामध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून स्वत:ला अपग्रेड केले. या बदलांचा थेट फायदा फ्रँचायझीधारकांना झाला.

‘विश्वविहार हॉलिडेज’चे वैशिष्ट्य म्हणजे कस्टमाईज टूर पॅकेज. ग्राहकांच्या गरजा, तारखा आणि पसंती लक्षात घेऊन खास पॅकेज तयार केले जाते. उत्तराखंड, केरळ, राजस्थानपासून आंतरराष्ट्रीय स्थळांपर्यंत विविध टूरचे आयोजन केले जाते. धार्मिक यात्रा, ग्रुप टूर, लक्झरी टूर यामध्ये कंपनीने चांगली छाप सोडली आहे. सोलो ट्रिप किंवा छोट्या ग्रुपसाठीही चांगले पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रकारच्या प्रवाशाला योग्य पर्याय मिळतो.

वरुण लिमये यांचा वैयक्तिक अनुभवही या व्यवसायाशी घट्ट जोडलेला आहे. वरुण यांनी सुरुवातीला आंबा व्यवसायिक म्हणून काम सुरू केले होते. आंबा हे फळ सीझनला असल्याने त्यांना आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी मग वेगळा पर्यायासुद्धा हवा होता.

पुढे ‘विश्वविहार हॉलिडेज’च्या फ्रँचायझीच्या माध्यमातून तो मिळाला. नेटवर्किंगची ताकद त्यांना ठाऊक होती. या पार्श्वभूमीचा उपयोग त्यांनी पर्यटन व्यवसायात केला. आज ‘विश्वविहार’ची फ्रँचायझी हा त्यांचा पूर्णवेळ उत्पन्नाचा स्रोत आहे. आर्थिक स्थैर्य, व्यावसायिक आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व विकास या सर्व गोष्टी त्यांनी या प्रवासातून मिळवल्या.

एकविसाव्या वर्षी व्यवसाय सुरू केलेले लिमये आज एकतिसाव्या वर्षी आत्मविश्वासाने सांगतात की सचोटीने काम केले तर पर्यटन व्यवसायात यश निश्चित आहे. प्रवास आवडणार्‍या आणि लोकांशी कनेक्ट होण्याची तयारी असलेल्या कोणालाही हा व्यवसाय करता येतो.

ग्रॅज्युएशन असणे आवश्यक नाही; बारावी उत्तीर्ण किंवा इतर व्यवसायातील नेटवर्किंग असलेले लोकसुद्धा फ्रँचायझी घेऊन यशस्वी होऊ शकतात. त्यांच्या मते, पर्यटन व्यवसाय केवळ नफा कमवण्याचा मार्ग नाही, तर लोकांना आनंद देण्याची संधी आहे.

एक महत्त्वाचा प्रसंग लिमये शेअर करतात, पहलगाम हल्ल्यानंतरच्या काळात अनेक टूरमध्ये अनपेक्षित अडचणी आल्या, पण ‘विश्वविहार’ने प्रवाशांना कधीही एकटे सोडले नाही. विश्वास हा सर्वात मोठा आधार आहे, असे ते म्हणतात.

आजवर ५०० पेक्षा जास्त लोकांना त्यांनी ‘विश्वविहार’सोबत आनंददायी प्रवास घडवून आणला आहे. त्यांचा अनुभव सांगतो की ‘विश्वविहार’सोबत जोडले गेले तर नव्या उद्योजकांना प्रशिक्षण, मार्गदर्शन, तांत्रिक सुविधा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक विश्वासार्ह ब्रँड मिळतो.

‘विश्वविहार’चे पहिले फ्रँचायझीधारक म्हणून वरुण लिमये यांची वाटचाल नव्या उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे. छंदाला व्यवसायात बदलण्याचा त्यांचा निर्णय केवळ आर्थिकदृष्ट्या नव्हे तर वैयक्तिक प्रगतीसाठीही फायदेशीर ठरला आहे. पर्यटनाची आवड, ग्राहकांशी जिव्हाळा आणि ‘विश्वविहार’चे बळकट नैतिक पाठबळ या सगळ्यांनी मिळून त्यांची कहाणी यशस्वी झाली आहे.

‘विश्‍वविहार हॉलिडेज’च्या फ्रँचायझीसाठी संपर्क
9323666206 । 9920120183


‘विश्वविहार’सोबत घरबसल्या यशस्वी पर्यटन व्यवसाय उभ्या करणार्‍या तृप्ती वर्तक

Trupti Vartakनोकरी, करिअर, घर आणि जबाबदार्‍या या सगळ्यांचा ताळमेळ घालणे हे विशेषत: महिलांसाठी सोपे नसते; पण योग्य संधी मिळाली तर घरबसल्यादेखील स्वत:चा व्यवसाय उभारता येतो आणि आर्थिक स्वावलंबन साधता येते. नाशिकच्या तृप्ती वर्तक यांनी हे प्रत्यक्षात करून दाखवले आहे.

मागील आठ वर्षांपासून त्या ‘विश्वविहार हॉलिडेज’ या ट्रॅव्हल अँड टुरिझम कंपनीची फ्रँचायझी यशस्वीरीत्या चालवत आहेत. तृप्ती वर्तक यांची शैक्षणिक पार्श्वभूमी ट्रॅव्हल क्षेत्राशी निगडित आहे. १९९७ साली त्यांनी गरवारे येथून ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि त्यानंतर अनेक नामांकित कंपन्यांमध्ये अनुभव घेतला, परंतु मुले लहान असल्याने कुटुंबालाही वेळ देणे आवश्यक होते. त्याच काळात ‘विश्वविहार’ने वर्क फ्रॉम होम हा पर्याय उपलब्ध करून दिला आणि तृप्ती यांनी तो संधी म्हणून स्वीकारला.

फ्रँचायझी घेतल्यानंतर त्यांना जाणवले की ‘विश्वविहार’ फक्त व्यवसायाची संधी देत नाही, तर आवश्यक ते सर्व प्रशिक्षण, मार्गदर्शन देते. सेल्स, मार्केटिंग, नेटवर्किंग, गेस्ट हँडलिंग यासारख्या कौशल्यांमध्ये त्यांनी प्रत्यक्ष ट्रेनिंग घेतले. कंपनी वेळोवेळी पोस्ट्स, कंटेंट, नवीन पॅकेजेसची माहिती देत असते. त्यामुळे ग्राहक मिळवणे आणि त्यांना टिकवून ठेवणे अधिक सोपे झाले.

ग्राहक सेवेत ‘विश्वविहार’ची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस अतिशय मजबूत आहे. तृप्ती सांगतात, आमच्या पाहुण्यांना त्यांच्या प्रत्येक छोट्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे आम्ही देतो. कोटेशन, हॉटेल, ट्रॅव्हल, गाडी, प्रवासातील सोयीसुविधा अशा सर्व गोष्टींबाबत पारदर्शक माहिती देतो. त्यामुळे ग्राहकांचा विश्वास बसतो आणि ते पुन्हा पुन्हा आमच्यासोबत प्रवास करतात.

आता तृप्ती यांच्या नावावरच थेट बुकिंग्स येतात. त्या म्हणतात, यातून आर्थिक प्रगती तर झालीच, पण घरबसल्या काम करून हे साध्य करता आले, ही खरी जमेची बाजू आहे. याचे श्रेय ‘विश्वविहार’चे संस्थापक संजय आणि राजेंद्र सर यांना आणि त्यांच्या सक्षम कार्यप्रणालीला जाते.

मुख्य म्हणजे या फ्रँचायझीसाठी पर्यटन क्षेत्रात काम करणारे किंवा शिक्षण घेतलेले असणे बंधनकारक नाही. गृहिणी, नोकरदार किंवा अगदी अतिरिक्त उत्पन्न शोधणारे कोणीही हे काम सहज करू शकतात.

दिवसातून चार तास दिले तरी हा व्यवसाय सुरू करता येतो. मुळात आपल्या नेटवर्कमधूनच ग्राहक मिळवता येतात. जसे एखादा चांगला सिनेमा पाहिला की आपण मित्रांना सुचवतो, तसंच ही सेवा आपल्या परिचयातील लोकांना सांगितली, समजावली की यातूनच लीड्स तयार होतात आणि पुढे या लीडच्या संपूर्ण प्रश्न, शंका यांची समाधानकारक उत्तरे कंपनीची संपूर्ण टीम द्यायला तत्पर असते.

ट्रॅव्हल क्षेत्र म्हणजे पैशांची मोठी उलाढाल. अशावेळी ग्राहकांना सुरक्षित सेवा देणे हे महत्त्वाचे ठरते. ‘विश्वविहार’ प्रत्येक टूरसाठी ऑनग्राऊंड सर्वे करून घेतो. त्यामुळे पाहुण्यांना उत्तम अनुभव मिळतो याची खात्री असते. ही शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी असल्याने फ्रँचायझीधारक निर्धास्तपणे काम करू शकतात.

तृप्ती यांना केवळ सेल्स आणि ग्राहक व्यवस्थापनातच नव्हे तर टूर असिस्टन्ट म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली. वेळोवेळी त्यांना रिवॉर्ड्स, बोनस आणि पुरस्कार मिळाले. त्यामुळे नवनवीन काम करण्याचा उत्साह टिकून राहिला. त्यांच्या मते, विशेषत: महिलांसाठी ही एक उत्तम संधी आहे. घर आणि व्यवसायाचा सुंदर मेळ घालता येतो. आर्थिक विकास, आत्मविश्वास आणि स्वत:ची ओळख हे तिन्ही एकाच वेळी मिळते.

तृप्ती वर्तक यांची ही यशोगाथा दाखवून देते की योग्य कंपनीची साथ, प्रशिक्षण आणि चिकाटी असेल तर वर्क फ्रॉम होममधूनही एक यशस्वी व्यवसाय उभारता येतो. ‘विश्वविहार’ची फ्रँचायझी म्हणजे केवळ आर्थिक प्रगतीची नाही, तर आयुष्याला नवीन दिशा देण्याची संधी आहे.

‘विश्‍वविहार हॉलिडेज’च्या फ्रँचायझीसाठी संपर्क
9323666206 । 9920120183


पहिले नऊ महिने एकही ग्राहक नव्हता… आता गेली तीन वर्षे बेस्ट परफॉर्मन्स अ‍ॅवॉर्ड विजेते

Leena Kulkarniकुटुंब प्रथम, पण करिअर थांबायला नको, असा विचार असलेल्या लीना कुलकर्णी यांनी ‘विश्वविहार हॉलिडेज’सोबत पर्यटन क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून मुंबईत चांगली नोकरी करत असताना २०१६ मध्ये पतीच्या बदलीनंतर बेंगळुरूला स्थलांतर करावे लागले.

नवीन शहर, लहान मुलगा आणि घरची जबाबदारी या सगळ्यात नोकरीसाठी बाहेर पडणं कठीण होतं, पण कामाविना स्वस्थ बसणं त्यांच्या स्वभावात कधीच नव्हतं. त्याच काळात एक विचार त्यांच्या मनात डोकावून गेला की घरातून काही करता आलं तर?

पर्यटनाची आवड त्यांच्या कुटुंबात होतीच. एकदा काश्मीरच्या टूरचा बेत अपूर्ण राहिला आणि तेव्हा मनात आलं आपणच ‘विश्वविहार’ची फ्रँचायझी घेऊन बेंगळुरूतून काम करू शकतो का? हा विचार त्यांनी आपल्या पतीला बोलून दाखवला. त्यावर त्यांनी थेट ‘विश्वविहार’चे संचालक संजय वझे यांच्याशी चर्चा करण्याचा सल्ला दिला.

सुरुवातीला सरांशी भेटून चर्चा झाली आणि मग त्यांच्यातील जिद्द आणि आत्मविश्वास याने संधीचं दार उघडलं गेलं. डिसेंबर २०१७ मध्ये अधिकृतपणे ‘विश्वविहार’ची फ्रँचायझी घेऊन त्यांच्या प्रवासाची सुरुवात झाली.

हा प्रवास मात्र सोपा नव्हता. पर्यटन क्षेत्राच कोणतेही ज्ञान नसताना सुरुवात करणं हे धाडसाचं काम होतं. शून्यातून शिकणं, प्रत्येक बारकावा समजून घेणं, ग्राहकांशी संवाद साधणं या सगळ्यात त्यांनी स्वत:ला झोकून दिलं. त्यांना पहिला ग्राहक मिळायला तब्बल नऊ महिने लागले.

या काळात त्यांनी संयम ठेवला, सतत शिकत राहिल्या आणि ‘विश्वविहार’च्या संचालकांकडून मार्गदर्शन घेत राहिल्या. व्यवसाय म्हणजे विश्वासाचं नातं, हे तत्त्व त्यांनी या काळात मनाशी घट्ट केलं. नंतर हळूहळू त्यांचा व्यवसाय आकार घेत गेला. बेंगळुरूत ‘विश्वविहार’ची ओळख निर्माण झाली. सुरुवातीला छोट्या ग्रुप्ससोबत काम सुरू झालं आणि नंतर मोठ्या टूर पॅकेजेसपर्यंत त्यांचा हातभार लागला.

मात्र ज्या वेळी गती येऊ लागली त्याच वेळी कोविडचा मोठा धक्का बसला. पर्यटन थांबलं, बुकिंग रद्द झाल्या, संपूर्ण उद्योग अडखळला; पण लीना हार मानणार्‍या नव्हत्या. त्यांनी पुन्हा नव्याने जोमाने सुरुवात केली. परिणामी मागील तीन वर्षे त्यांना बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड मिळत आहे. आज त्या दरवर्षी सुमारे साठ लाखांचा टर्नओव्हर करतात.

या यशामागे ‘विश्वविहार’चा ठाम पाठिंबा आहे. रात्रीचा कोणताही क्षण असो, डायरेक्टर्स फोन उचलून समस्येवर उपाय शोधतात. मार्केटिंग मटेरियल, ट्रेनिंग, डिजिटल पोस्ट्स अशी सर्व सोय कंपनी करून देते; पण त्याचा योग्य उपयोग करून नेटवर्किंग करणे, लोकांशी जोडलेले राहणे, ग्राहकांचा विश्वास जपणे हे मात्र फ्रँचायझीधारकांच्या हातात असतं आणि लीना याबाबतीत एक आदर्श ठरल्या.

आज त्यांचे अनेक ग्राहक पुन्हा पुन्हा त्यांच्याकडेच परत येतात. रिपीट गेस्ट हा त्यांचा सर्वात मोठा यूएसपी आहे. एखादा पाहुणा परदेशातून आला तरी त्यांचा विश्वास इतका घट्ट आहे की तो टूरसाठी पुन्हा त्यांच्याशीच जोडतो, कारण लीना फक्त टूर विकत नाहीत, तर ग्राहकांचा अनुभव सुरक्षित, आनंददायी आणि संस्मरणीय होईल यासाठी स्वत: जातीने लक्ष देतात.

‘विश्वविहार’ हे सर्वे करून जिथे टूर जाणार तेथील राहण्याची खाण्याची फिरण्याची अशा छोट्या छोट्या गोष्टींची खात्री करतात. हॉटेल्स, गाड्या, सुविधा अशा प्रत्येक गोष्टी त्यांनी स्वत: तपासून घेतलेल्या असतात. टूरदरम्यान एखादी अडचण आली तरी ग्राहकांशी सतत संपर्कात राहून त्या समस्येचं समाधान तातडीने करण्यावर त्यांचा भर असतो.

या प्रवासातून त्यांनी एक गोष्ट शिकली; पर्यटन हे फक्त व्यवसाय नाही तर लोकांशी नातं जपण्याचं माध्यम आहे. संयम, चिकाटी आणि प्रामाणिकपणा असेल तर या क्षेत्रात अपार संधी आहेत. आज बेंगळुरूसारख्या शहरात त्यांची ओळख ‘विश्वविहार’मुळे झाली आहे. एक महिला म्हणून पर्यटन क्षेत्रात त्यांनी स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

लीना कुलकर्णींचा प्रवास दर्शवतो की फ्रँचायझी म्हणजे केवळ उत्पन्नाचं साधन नाही, तर स्वप्नांना पंख देणारी संधी आहे. घर सांभाळत करिअर घडवायचं असेल, तर योग्य कंपनीचा आधार आणि स्वत:ची जिद्द यांचा मेळ जमलाच पाहिजे. ‘विश्वविहार’सोबतचा त्यांचा अनुभव हेच सांगतो की पेशन्स ठेवा, प्रामाणिकपणे काम करा, यश तुमच्या दारी नक्कीच येईल.

‘विश्‍वविहार हॉलिडेज’च्या फ्रँचायझीसाठी संपर्क
9323666206 । 9920120183


फक्त उत्पन्नाची संधी नाही, तर स्थिर व्यवसाय उभा करण्याचा मार्ग

Abhishek Dasgaonkarसंभाजीनगरचे अभिषेक दासगावकर मागील चोवीस वर्षे फार्मासिटिकल क्षेत्रात कार्यरत आहेत, परंतु २०१९ मध्ये त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘विश्वविहार’ची फ्रँचायझी घेतली आणि त्यानंतरचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी ठरला. सहा वर्षांत त्यांनी पाचशेपेक्षा जास्त पर्यटकांना अविस्मरणीय सहली दिल्या. हे आकडे नक्कीच महत्त्वाचे आहेत, परंतु या प्रवासामागची कहाणी आणि कंपनीने दिलेला आधार आणखी महत्त्वाचा आहे.

कठोर प्रशिक्षण आणि व्यावसायिक समर्थन

‘विश्वविहार’ची प्रमुख ताकद म्हणजे त्यांच्या प्रशिक्षित पद्धतीतून दिला जाणारा सततचा सपोर्ट. कंपनी दर पंधरा दिवसांनी विविध पर्यटनस्थळांची माहिती, अंदाजे खर्च, फ्लाइट पर्याय आणि प्रवासात घ्यावयाच्या खबरदारीबाबत सखोल प्रशिक्षण देते. व्यावसायिक ट्रेनर्स विक्रीतल्या तंत्रांवर, क्लायंटशी संवाद साधण्याच्या पद्धतींवर आणि योग्य टूर पॅकेज सुचवण्यावर कसब घडवतात. कंपनीकडून मिळणारे रेडीमेड मार्केटिंग मटेरियल आणि सोशल मीडियासाठी तयार पोस्टही फ्रँचायझीधारकांना मोठा फायदा देतात.

विश्वसनीयता वाढवणारे तंत्र

गुगल रिव्ह्यूज गोळा करणे, तात्काळ कोटेशन देणे आणि ऑपरेशनची जलद प्रक्रिया ही कंपनीची कार्यपद्धती आहे. अशा प्रगत यंत्रणेमुळे ग्राहकांचा विश्वास वाढतो आणि रिपीट क्लायंट्स तयार होतात. कंपनीकडे विविध ठिकाणांसाठी तयार केलेले कोटेशन आणि विस्तृत प्रॉडक्ट रेंज असल्याने प्रत्येक प्रश्नाला त्वरित उत्तर देता येते आणि डील्स लवकर क्लोज होतात.
प्रॅक्टिकल अनुभवाने आलेला आत्मविश्वास

अभिषेक यांनी सुरुवातीला फक्त पॅकेज विक्री केली; नंतर टूर लीडर म्हणून प्रत्यक्ष सहलींमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. प्रत्यक्ष अनुभवातून त्यांना ऑपरेशनल ज्ञान मिळाले आणि पुढच्या टूरमध्ये त्यांचे क्लायंट्स वाढले. चारधाम यात्रा, काश्मीर, युरोप व आफ्रिका अशी विविधता त्यांच्या कॅटलॉगमुळे त्यांना अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचायला मदत झाली.

वैयक्तिक आणि कौटुंबिक बदल

व्यावसायिक यशाबरोबरच हे काम त्यांच्यासाठी वैयक्तिक समाधानाचेही कारण बनले. प्रवासाची आवड वाढली, कुटुंबासोबत वेळ घालवण्याच्या संधी वाढल्या आणि कौटुंबिक नाते दृढ झाले. याशिवाय वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांशी जोडल्याने त्यांच्या नेटवर्कचा विस्तार झाला, ज्याचा फायदा त्यांच्या मूळ व्यवसायालाही झाला.

ही संधी कोणासाठी योग्य आहे?

ही फ्रँचायझी विशेषत: त्यांच्यासाठी योग्य आहे जे मुख्य नोकरी अथवा व्यवसाय सांभाळत असताना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत शोधत आहेत, ज्यांना लोकांशी संवाद साधायला आवडते, ज्यांना सोशल मीडियावर थोडा वेळ देता येतो आणि जे दररोज दोन-तीन तास सातत्याने काम करू शकतात.

अभिषेक दासगावकर यांचा अनुभव दर्शवतो की ‘विश्वविहार’ची फ्रँचायझी ही फक्त पर्यायी उत्पन्नाची संधी नाही, तर व्यवस्थित प्रशिक्षण, कंपनीच्या मजबूत सपोर्ट आणि सततच्या प्रयत्नांमुळे स्वत:चा स्थिर व्यवसाय उभा करण्याचा विश्वासार्ह मार्ग आहे. थोडा वेळ, सातत्य आणि ग्राहकांसाठी प्रामाणिक सेवा हे घटक असतील तर तुम्हालाही हा मार्ग यशस्वी करता येईल.

‘विश्‍वविहार हॉलिडेज’च्या फ्रँचायझीसाठी संपर्क
9323666206 । 9920120183


‘विश्वविहार’सोबत रागिणी पंडित यांचा यशस्वी प्रवास

Ragini Panditरागिणी पंडित यांचा प्रवास इतर अनेक महिलांसारखाच होता. करिअरमध्ये स्थिरावलेली नोकरी, फायनान्समधले एमबीए आणि त्यानंतर मातृत्वामुळे आलेला काही काळाचा ब्रेक. हा ब्रेक मात्र नव्या संधींचा शोध घेणार्‍या रागिणी यांचा प्रवास २०२२ मध्ये मात्र एक वेगळं वळण घेतो.

जेव्हा फेसबुकच्या माध्यमातून त्यांचा संपर्क ‘विश्वविहार’चे संस्थापक संजय सरांशी होतो. प्रवासाची आवड असलेल्या रागिणी यांनी कंपनीविषयी चौकशी केली आणि शेवटी ‘विश्वविहार’सोबत फ्रँचायझीधारक म्हणून आपली ओळख निर्माण केली.

‘विश्वविहार हॉलिडेज’ आपल्या फ्रँचायझीधारकांना वेळोवेळी प्रोफेशनल ट्रेनिंग देते. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ग्राहकांशी संवाद, मार्केटिंग तंत्र, सेल्स क्लोजिंग, समस्यांवर उपाययोजना अशा विविध बाबतीत मार्गदर्शन मिळते. ऑनलाईन मिटिंग्ज, इनहाऊस ट्रेनिंग, तसेच सरांचा थेट सहभाग यामुळे कामात आत्मविश्वास वाढतो. फक्त ट्रेनिंग घेणं नव्हे तर ते प्रत्यक्ष कामात उतरवणं महत्त्वाचं आहे, असं रागिणी सांगतात.

सेवेची गुणवत्ता हाच ग्राहकांचा विश्वास. रागिणींच्या मते, आमच्या टूर ग्राहकांना परवडतील आणि त्यांच्या आर्थिक गुंतवणुकीला योग्य न्याय देणार्‍या असतात. ग्राहक टिकवून ठेवणं हे केवळ किंमतीवर नाही तर उत्कृष्ट सेवेवर अवलंबून असतं. उदाहरणार्थ, पहलगाव येथे हल्ल्याच्या वेळी ‘विश्वविहार’ने केवळ आपलेच नव्हे तर इतर कंपन्यांचे पर्यटकही सुरक्षित बाहेर काढले. या कृतीमुळे कंपनीबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला.

ग्रुप टूर, फॅमिली ट्रिप, हनिमून, सोलो ट्रिपपासून ते कस्टमाईझ टूरपर्यंत अनेक पर्याय ‘विश्वविहार’ देते. रागिणी यांनी विशेषत: कस्टमाईझ ट्रिपमध्ये चांगली कामगिरी केली आहे. इतिहास आणि संस्कृती आवडणार्‍यांसाठी ओरछा, ओडिशा यांसारख्या अनोख्या ठिकाणांच्या टूर, तर शांततेसाठी उत्तरेकडील ट्रिप्स. ग्राहकांच्या आवडीनुसार टूर तयार करण्याची लवचिकता ही ‘विश्वविहार’ची खासियत आहे.

‘विश्वविहार’ सतत फ्रँचायझींना सांगते की ग्राहकांशी संपर्क ठेवा, फीडबॅक घ्या आणि त्यांच्या समस्या ओळखा. पॉझिटिव्ह फीडबॅक जितका महत्त्वाचा तितकाच निगेटिव्ह फीडबॅक सुधारणा करण्यासाठी आवश्यक आहे, असं रागिणी सांगतात. त्यामुळे ग्राहक पुन्हा पुन्हा ‘विश्वविहार’सोबत प्रवास करण्यास प्राधान्य देतात.

स्वत:चा व्यवसाय उभारणे कठीण असतं, पण स्थिर व अनुभवी कंपनीसोबत जोडल्यास काम सुलभ होतं. रागिणी सांगतात, मला माझ्या वेळेनुसार काम करता येतं, नवीन लोकांशी जोडलं जाता येतं आणि माझ्या आवडीचं क्षेत्र करिअर बनतंय. आतापर्यंत ४०-५० ग्राहकांना त्यांनी टूरवर पाठवलं आहे. कंपनीकडून मिळणारे ठराविक मानधन, बोनस आणि प्रोत्साहन हे त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करतं.

या प्रवासात रागिनींच्या मते सर्वात गरजेचं म्हणजे आवड आणि पेशन्स. सुरुवातीला लगेच ग्राहक मिळतीलच असं नाही. काही महिने रिकामे जातील, पण जर चिकाटी ठेवली तर या क्षेत्रात नक्कीच यश मिळतं, असं त्यांचं ठाम मत आहे.

रागिणी पंडित यांचा अनुभव हेच सांगतो की ‘विश्वविहार’ ही केवळ ट्रॅव्हल कंपनी नसून फ्रँचायझीधारकांना आत्मनिर्भरतेकडे नेणारी संस्था आहे. उत्कृष्ट ट्रेनिंग, वेळोवेळी मिळणारं मार्गदर्शन, ग्राहकांशी मजबूत नातं आणि सुरक्षित व दर्जेदार सेवा या सगळ्यामुळे ‘विश्वविहार’सोबत व्यवसाय करणं म्हणजे आपल्याला कामाचे समाधान देणारा असा पर्याय.

‘विश्‍वविहार हॉलिडेज’च्या फ्रँचायझीसाठी संपर्क
9323666206 । 9920120183

Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

books for life website Ad
Click here to visit: booksforlife.in
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
Smart Udyojak India Business Directory
आशिष पेटे : सौरऊर्जेने ग्रामीण महाराष्ट्रात घडवलेली हरितक्रांती व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस व्हिसिटिंग कार्डचं महत्त्व उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?