इस्टेट एजंट; एक बिनभांडवली व्यवसाय

इस्टेट एजंट हा एक बिनभांडवली व्यवसाय म्हणता येईल. जमिनी, फ्लॅट, बंगले, रो-हाऊस, दुकान, ऑफिस इत्यादी विकणे वा भाड्यावर देणे यासाठी प्रत्येकालाच इस्टेट एजंटची गरज भासते. इस्टेट एजंट हे जमीन व वास्तुविषयक गोष्टींकडे लक्ष ठेवून असतात.

एखाद्याला घर विकायचे वा भाड्यावर द्यायचे असल्यास त्याला स्वत:ला ग्राहक शोधणं शक्य नसतं. अशावेळी इस्टेट एजंट हे ग्राहक आणि विक्रेता यामधील दुवा होतात. ग्राहक व विक्रेता यामधील दुवा होऊन सर्व व्यवहार पारदर्शकरीत्या पार पाडावेत, हेच इस्टेट एजंटचे काम असते, त्यासाठी त्याला दोन्ही पक्षांकडून ब्रोकरेज मिळते.

ते काही टक्क्यांमध्ये असते. विविध बिल्डर व विकासक हे आपल्या प्रोजेक्टच्या मार्केटिंग व विक्रीसाठी अशा इस्टेट एजंटना बिझनेस असोसिएट्स वा सेल्स एजंट म्हणून नेमतात. अशावेळी ग्राहकांना इस्टेट एजंटना ब्रोकरेज द्यावे लागत नाही. त्यांना बिल्डर वा विकासकाकडूनच त्याचा मोबदला मिळतो. घर हा प्रत्येकाच्य जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे त्यात हयगय करून चालत नाही.

त्यामुळे ग्राहकाला पसंत पडेपर्यंत घर वा जागा दाखवाव्या लागतात. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी विशेष काही शिक्षणाची गरज लागत नाही. स्वत:चे ऑफिस सुरू करायचे असल्यास दुकान व आस्थापनाचा परवाना काढणे पुरते. व्यवसायासंबंधिक काही संघटना वा असोसिएन्स असतात त्यांचे सभासदत्व घेणे सोयीचे ठरते.

– टीम स्मार्ट उद्योजक 

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?