Advertisement
उद्योजकता विकास

प्रत्येक स्टार्टअप यशाबरोबर एक नवी कॅटेगरी निर्माण करतो

फक्त रु. ५०० मध्ये 'स्मार्ट उद्योजक' प्रिंट मासिक घरपोच मिळवा.

Book Now: https://imjo.in/Xx7Uq6

Print this Page

१६ जानेवारी, २०१६ रोजी विज्ञान भवनामध्ये ‘स्टार्टअप इंडिया’चा कार्यक्रम पार पडला आणि देशातील उद्योजकतेलाही मानाचे स्थान निश्‍चित झाले. नवउद्योजकतेला जणू स्टार्टअप्चा ‘बूस्ट’ मिळाला. मात्र नरेंद्र मोदींनी हेही स्पष्ट केले आहे की, ही संकल्पना काही फक्त माहिती तंत्रज्ञान, संगणक आणि मोबाइल यांच्यापुरती मर्यादित नाही.

भरीव आर्थिक गुंतवणूक, बिझिनेस इन्क्युबेटरची सुविधा, प्राप्तिकरात सूट आणि उद्योग उभारणीत अशासकीय हस्तक्षेप न करण्याच्या भूमिकेमुळे तरुण उद्योजक-उद्योजिकांना स्वत:च्या ‘स्टार्टअप’ची व्याख्या करण्यात आलेली नाही. तसेच करसवलतींची माहिती आपणास येत्या बजेटमध्ये मिळणार आहे. मात्र या स्टार्टअप इव्हेन्टमुळे देशात विशेषत: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्साहाचे वारे वाहू लागले आहे.

भारतात या क्षणी चार ते साडेचार हजार केंद्रे कार्यरत असून बंगलोर, दिल्ली, गुरगाव, मुंबई ही स्टार्टअप्ची प्रमुख केंद्रे आहेत. नवीन धोरणात प्रत्येक स्टार्टअप्मध्ये पाच व्यक्तींना रोजगार मिळावा, अशी अपेक्षा आहे. स्टार्टअप म्हणजे हायफाय किंवा लॅपटॉपशी संबंधित जग असा समज पसरू नये, असे पंतप्रधान मोदींनी या वेळी सांगितले तसेच शेतकर्‍यांनी मेहनतीने पिकवलेले धान्य वाया जाऊ नये यासाठी स्वस्त उपाय शोधा यावरही भर दिला. तसेच हस्तकलांचा जगभरात प्रसार व्हावा यासाठी दमदार अ‍ॅप बनवण्यास सांगितले आहे. सायबर सुरक्षा, आरोग्य क्षेत्र ही स्टार्टअप्ची प्रमुख क्षेत्रे आहेत.

२० ते २५ वर्षांपूर्वी टेक्नॉलॉजी हा शब्दप्रयोग सर्व प्रकारांच्या तंत्रज्ञानासाठी वापरला जायचा. आताच्या काळात टेक् म्हटल्याक्षणीच त्याची सांगड संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाशी घातली जाते आणि या क्षेत्रांपासून दूर असलेल्या व्यक्तींना हे काही तरी जादूचे ‘अलिबाबा’च्या गुहेसारखे आहे असे वाटते. मात्र यशस्वी स्टार्टअप्समध्ये खरोखर पाहायला गेले, तर तंत्रज्ञानाचा टेक्चा वाटा फारच थोडा असतो. उदा. म्हणून आपण आताच्या ई-कॉमर्स क्षेत्रातल्या कंपन्यांचे उदाहरण घेतले तर त्यांचे यश आपल्या मालाच्या खरेदी-विक्रीत असते, तर ‘टेक्’चा भाग विक्रीसाठी ग्राहक गोळा करणे आणि व्यवस्थापनाला अचूकपणा देणे यासाठी असतो. अब्जावधी डॉलरचे त्यांच्या कंपनीचे मूल्य खरे तर एक चांगली व्यवहार्य कल्पना शोधणे आणि राबवणे यामध्ये आहे.


Paytm वापरकर्त्यांसाठी बंपर ऑफर

'स्मार्ट उद्योजक' मासिकाची वार्षिक डिजिटल वर्गणी

Paytm वर मिळवा आता फक्त २० रुपयांत.


Subscribe ‘Smart Udyojak’ Magazine

विचार करण्यासारखी बाब आहे की, जर आपण सॉफ्टवेअर इंजिनीअर नसलो, तर स्टार्टअपची दारे आपल्याला बंद आहेत का? मुळीच नाही. OK. मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅपल, आयबीएम, गुगल यांचे प्रवर्तक सॉफ्टवेअर इंजिनीअर, इलेक्ट्रॉनिक इंजिनीअर किमानपक्षी इंजिनीअर असतील तरीसुद्धा स्टार्टअप्च्या नावीन्यपूर्ण उद्योजकता क्षेत्रात सर्व प्रकारच्या उद्योजकांना कल्पना करता येणार नाही एवढे आर्थिक यश मिळवता येईल.

उद्योजकतेविषयी आपल्याकडे फारसे बोलले जात नाही. उद्योजक म्हणा, संशोधक म्हणा, असा माणूस शेजारच्या घरात जन्माला यावा. हवे तर आपण त्याचे कौतुकसुद्धा करू; पण आपल्या घरात… अं! हं! अशी आपली मनोवृत्ती असते. आपल्याला धंद्यातला धोका नको असतो. आपल्याला नोकरीची शाश्‍वत गॅरंटी हवी असते. मात्र आताच्या काळात आपल्याला नोकरी सहजासहजी मिळणे शक्य नाही. तेव्हा आपण नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी देणारे होणे गरजेचे आहे.

आपल्याला यशस्वी स्टार्टअप उद्योजक होण्यासाठी आवश्यक असणार्‍या बाबी म्हणजे ठरवलेल्या स्टार्टअप्ससाठी लागणारी मनोवृत्ती आणि अर्थातच त्यासाठीची कौशल्ये :

आपण टेक्निकल पर्सन हायर करू शकतो. आऊटसोर्स करू शकतो किंवा ते ज्ञान एखाद्या ऑनलाइन कोर्सने शिकू शकतो. स्टार्टअप्सची वैशिष्ट्ये म्हणजे नावीन्यपूर्ण संकल्पना. महत्त्वाचे म्हणजे ही कल्पना scaleable असावी, वाढवता यावी, मोठी करता यावी. निरनिराळ्या ठिकाणी राबवता यावी, ग्राहकांच्या दृष्टीने ती कल्पना परवडणारी असावी. पूर्वीपेक्षा नव्या पद्धतीने त्यांना जास्त लाभ मिळाला पाहिजे. आपण या दृष्टीने आपल्या कानावर आलेल्या विविध स्टार्टअपचा अवश्य विचार करावा.

तसे पाहायला गेले तर स्टार्टअप्च्या कल्पना फार साध्या सोप्या असतात. जेसिका स्कॉर्पिओ यांनी विचार केला की, जर आपण आपली कार रोज वापरत नसू तर ती भाड्याने का देऊ नये? Get around हे त्यांच्या कंपनीचे नाव. त्यांना ४५ दशलक्ष डॉलरचे व्हेंचर कॅपिटल मिळाले आहे. आता एवढे खरे आहे की, त्यामुळे गाडीच्या मालकाला वर्षाला ६००० डॉलरचे उत्पन्न मिळते आणि ज्यांना गाडी खरेदी करणे परवडत नाही त्यांचे दरसाल ६००० डॉलर वाचतात! आता हे सांगायला हरकत नाही की, त्यांचे शिक्षण पॉलिटिकल सायन्स पदवीचे आहे.

पहा विचार करून. माझ्या माहितीप्रमाणे अजूनसुद्धा स्टार्टअप भारतात नाही. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक उद्योजकाला नावीन्यपूर्ण कल्पना आवश्यकच असते. अगोदरच प्रत्येक क्षेत्रात ‘मी मी’ Me too लोकांची गर्दी झालेली असते. उद्योजक त्यावर मात करण्यासाठी नवीन कल्पना राबवतो. किर्लोस्करांनी लोखंडी नांगर आणण्यापूर्वी सगळे शेतकरी लाकडी नांगराने शेती करत होते. लोखंडी नांगरामुळे जमिनीला जखम होईल इतका विरोध होता. पहिले सहा नांगर विकायला वर्ष लागले. पुढचा इतिहास आपणा सर्वांना माहीत आहेच.

एके काळी फक्त राजे-महाराजेच फक्त ‘कार’ वापरू शकत. हेन्‍री फोर्डने वेगळा विचार केला. प्रत्येक अमेरिकनाला, अगदी आपल्या फॅक्टरीत काम करणार्‍या कर्मचार्‍यालासुद्धा गाडी परवडली पाहिजे. अनेक अपयशांनंतर त्याला यश मिळाले. आता हे सांगितले तर हसू येईल की, त्या पहिल्या कारला रिव्हर्स गीअर नव्हता!

प्रत्येक स्टार्टअप त्याच्या यशाबरोबर औद्योगिक क्षेत्रात एक नवी कॅटेगरी निर्माण करतो

वाचा – विचार करा :- मी येथे आपणास स्टार्टअप्सच्या काही नावीन्यपूर्ण संकल्पना देत आहे. आता त्याला सरकारी भाषेत किंवा बँकांच्या भाषेत स्टार्टअप म्हणायचे का नाही हे आपल्याला यंदाच्या बजेटच्या वेळेसच कळेल.

१) सोयाबीन ही तर डाळ आहे :- आपण दरसाल डाळींची प्रचंड आयात करतो; किंबहुना असे म्हणायला हरकत नाही की, गेली २०-२५ वर्षे कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या सुधारलेल्या देशांतले शेतकरी भारतीय ग्राहकांसाठी डाळींची शेती करत आहेत. त्यांच्याप्रमाणेच म्यानमार आणि ब्रह्मदेशातले शेतकरीसुद्धा आपल्याला रोजचे वरण मिळावे म्हणून शेती करत आहेत. अशा वेळेला आपण देशात उत्पादन करणार्‍या लाखो सोया उत्पादकांकडे पहा. त्यांना भाव मिळत नाही.

मिळणारही नाही, कारण ते खाद्यतेलाच्या गिरण्यांसाठी सोयाबीनची शेती करतात. शेंगदाण्यात ४२ टक्के तेल असते, तर सोयाबीनमध्ये १८ टक्के. अर्थातच त्यांना भाव मिळत नाही. बरे. पेंढीतून तरी काही भले होईल अशी चिन्हे नाहीत, कारण आपण सोयाबीनची पेंढ कोंबड्यांना, गाईगुरांना, अगदी अमेरिकेतल्या डुकरांना खाऊ घालतो. याउलट गेली शेकडो वर्षे चीन, जपान या देशांतील जनता त्यांच्या प्रथिनांच्या गरजेसाठी रोजच्या आहारात सोयाबीनचा समावेश करत आहे.

सोयाबीन ही एक डाळ आहे. विश्‍वास बसत नसेल तर नखाने टरफल काढून चव घेऊन पाहा. सोयाबीन मांसाला पर्याय आहे आणि अर्थातच शिजवायला तसाच वेळ लागतो. आपण एक कोटीच्या आतल्या गुंतवणुकीत पर्यायी ‘रेडी टू इट’ अशी चवदार सोयाडाळ बाजारात आणू शकतो किंवा अगदी गृहोद्योगात डाळीचे पर्यायी पदार्थ बाजारात आणू शकतो.

२) गावोगावी तेलगिरणी :- एके काळी गावोगावी तेल-घाणी असायची. बैलाच्या शक्तीवर चालणार्‍या घाणीमध्ये गावातल्या गळिताच्या तेलबियांचे तेल काढले जायचे आणि त्यात रसायनांचा अंश नसल्यामुळे ते तेल आरोग्यदायक असायचे. आताच्या काळात सर्वात मोठे गळिताचे पीक म्हणजे सोयाबीन; पण सोयाबीनमध्ये तेलाचे प्रमाण कमी असल्यामुळे हे तेल solvent extraction पद्धतीने मोठमोठ्या गिरण्यांतच काढावे लागते.

अमेरिकेमध्ये आरोग्यदायक खाद्यतेलाची मागणी वाढल्यामुळे Bunge या महाप्रचंड कंपनीने सोयाबीनचे Expeller ने तेल काढणारी कंपनी नुकतीच विकत घेतली आहे. सोयाबीनचे तेल गाळणारे हे एक्स्पेलर नेहमीच्या एक्स्पेलरपेक्षा वेगळे असतात. मात्र दहा लाखांच्या गुंतवणुकीत आटोपशीर  लेारिलीं एक्स्पेलर मिळू शकतात. त्यात आपण सरकीचे तेल गाळू शकतो.

३) कापूस उत्पादकांसाठी वरदान ठरणारे तंत्रज्ञान :- शेतकर्‍यांच्या आत्महत्येच्या बातम्यांचा अधिक खोलात अभ्यास केला, तर हे शेतकरी प्रामुख्याने कापसाची शेती करतात. कापसाला भाव मिळत नाही, कारण जागतिकीकरणाच्या नादाने चीनमधल्या कापडगिरण्यांसाठी हा कच्चा माल पुरवत असतो.

कापसापासून कापड बनवण्यापर्यंत १) रुईमधली सरकी काढणे व कापसाचे गठ्ठे बांधणे २) सूत कातणे व ३) कापड विणणे या तीन पायर्‍या असतात. यामध्ये १) व ३) या क्रिया लघुउद्योगात खेड्यातही करता येतात. हातमागची वस्त्रे आपणास ओळखीची आहेत. सूत कातण्याची जी प्रक्रिया आहे त्यासाठी जर कमी गुंतवणुकीचे  – कमी क्षमतेचे तंत्रज्ञान वापरले तर गावोगावी कापसापासून कापडापर्यंतच्या प्रक्रिया लघुउद्योगात करता येतील. एवढेच नव्हे तर सरकीपासून प्रीमियम खाद्यतेल मिळू लागेल.

FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: