उद्योगवार्ता

‘अटल टिंकरिंग मॅरेथॉन’मध्ये ६५० पैकी पहिल्या ३० नवकल्पनांचे प्रदर्शन

'स्मार्ट उद्योजक' मासिक वर्षभरासाठी घरपोच मागवून वाचा फक्त रु. ५०० मध्ये!

आजच वर्गणीदार व्हा! https://imjo.in/Xx7Uq6

Print this Page

‘नीती आयोगा’च्या ‘अटल इनोव्हेशन मिशन’च्या (एआयएम) माध्यमातून विकसित झालेल्या पहिल्या ३० नवकल्पनांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या पूर्वसंध्येला हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या ३० नवकल्पनांना उद्योजकांनी सहकार्य केले आहे.

संपूर्ण देशभरातल्या अटल टिंकरिंग लॅबच्या माध्यमातून प्रयोग करण्यासाठी विद्यार्थ्यांना निवडक सहा विषय दिले होते. या सहा क्षेत्रातल्या आव्हानांना कशा पद्धतीने सामोरे जायचे आणि कोणत्या उपाय योजना करता येतील हे विद्यार्थ्यांना संशोधन करुन शोधून काढायचे होते.

Advertisement

सहा महिन्यात देशभरातून ६५० नवकल्पना यामधून आल्या आहेत. त्यापैकी प्रयोगातले वेगळेपण, कार्य करताना असलेली सुलभता अशा घटकांचा विचार करुन पहिल्या १०० नवकल्पनांची निवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना यासाठी स्वच्छ ऊर्जा, जल स्रोत, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, स्मार्ट संपर्क व्यवस्था आणि कृषी तंत्रज्ञान असे सहा विषय संशोधनासाठी देण्यात आले होते.

पहिल्या फेरीत निवडण्यात आलेल्या शंभर प्रयोगांना आणखी एक महिन्याचा अवधी देऊन त्यांच्या प्रयोगात अजून सुधारणा करून सादरीकरण करण्यात सांगण्यात आले होते. या सुधारित प्रयोगांचे परीक्षण शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील तज्ञांनी केले. या तज्ञांच्या समितीने आता उत्कृष्ट ३० नवसंकल्पना निवडल्या आहेत. या ३० नवसंकल्पनांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. देशभरातल्या २० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातल्या विद्यार्थ्यांनी हे ३० प्रयोग तयार केले आहेत. या सर्वोत्कृष्ट ३० नवसंकल्पना आणि त्यांचा पुरस्कार यांची घोषणा नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार करणार आहेत.

स्मार्ट उद्योजक । आजीव वर्गणी on 0% Interest EMI

Help-Desk
%d bloggers like this: