आपल्या देशाबाहेर इतर देशात वस्तू किंवा सेवा विक्रीसाठी आणि ग्राहक मिळवल्या जाणाऱ्या प्रक्रियेला निर्यात म्हणजेच एक्स्पोर्ट मार्केटिंग म्हटलं जात. महत्त्वाचे म्हणजे तुमच्या वस्तूची किंमत, त्याचा दर्जा आणि योग्य त्या प्रमाणात उपलब्धता असल्याशिवाय तुम्ही निर्यात मार्केटिंग करू शकत नाही.
एक्स्पोर्ट मार्केटिंगच्या पद्धती
तुमची कंपनी वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय पोर्टलवर रजिस्टर करा : आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक वेबसाइट्स आणि पोर्टल्स एखाद्या मोठ्या बाजारपेठेसारख्या म्हणजेच E-Commerse सारखे काम करतात. तिथून तुम्ही तुमच्या वस्तू आणि सेवांची मार्केटिंग चांगल्या प्रकारे करू शकता.
पर्यटक पोर्टलवर तुमच्या वस्तूची योग्य आणि नीट माहिती भरून फोटो किंवा व्हिडीओसहित अपलोड करा आणि तिथे रजिस्टर व्हा. जसे की, Indian Trade Portal, IndiaMart, ExportersIndia.com, exportfocus.com, IndiaTradeZone.com, alibaba.com किंवा Tradeindia.com या व अशा अनेक पोर्टलवर तुमच्या कंपनीचे उत्पादन माल किंवा सेवा यांची माहिती भरून त्याद्वारे अनेक देशातील ग्राहकांपर्यंत पोहचू शकता.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१२३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹३२१ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)अनेक पोर्टल्स विकत (पेड) कस्टमर तुमच्या वस्तूला आणून देतात. अशा प्रकारे हा आधुनिक काळाचा मार्केटिंगचा विषय वाढतच चालला आहे.
व्यापारी प्रदर्शन/ Trade Exibition मध्ये भाग घ्या : भारत सरकारमार्फत निर्यातदारांना आपल्या वस्तू विदेशी बाजारपेठेत पोहचवण्यासाठी अनेक इंडस्ट्रीजच्या वस्तूंचे प्रदर्शन भरवले जाते. त्यात तुम्हाला तुमचे प्रसिद्धी साहित्य Brochure, Presentation, Visiting Cards,, कंपनी जाहिरात व सॅम्पलसहित हजर राहून संवाद साधून चांगल्या प्रकारे मार्केटिंग करता येते.
मोठ्या शहरात अनेक तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय व्यापारी प्रदर्शने भरवली जातातच. त्याची माहिती तुम्हाला अनेक इव्हेंट वेबसाइट्सवरून मिळवता येईल. प्रामुख्याने प्रत्येक क्षेत्रात एक सरकारी संस्था असते ज्याला Promotion Council म्हणतात. जसे की Mechanical वस्तूंसाठी Engineering Export Promotion Council of India मसाल्यांसाठी Spice Board of India. अशा प्रत्येक संस्थेमार्फत एक्सपोर्टसाठी प्रदर्शने भरवली जातात. त्यात सहभाग घेणे महत्त्वाचे ठरते.
त्याचबरोबर Chember of Commerce, Chember of Commerce and Industries, Indian Chamber of Commerce, Federation of Indian Chambers of Commerce & Industry, Maharashtra Chamber of Commerce, Industry & Agriculture (MACCIA) या मार्फतसुद्धा अनेक प्रदर्शने भरवली जातात. या संस्थांचे सभासदत्वसुद्धा पुढील उद्योग वाटचालीत महत्त्वाचे ठरू शकते.
वस्तू-सेवा यांच्या मागणीप्रमाणे ज्या त्या देशातील ग्राहकांना लक्ष्य करणे : आपल्या वस्तू-सेवेला ज्या देशात जास्त ग्राहकपसंती किंवा मागणी आहे त्याप्रमाणे त्या देशावर लक्ष ठेवून त्याच देशावर जास्त प्रमाणात अनेक माध्यमातून मार्केटिंग करता येते. त्या संबंधीत देशात जाऊन अनेक व्यावसायिक भेटींच्या माध्यमातून अनेक संबंध तयार होतात.
ही मार्केटिंगची पद्धत असून यात ग्राहक किंवा संबंधित आयात करणार्या कंपनीशी नाते चांगले तयार होऊन एक विश्वासू संबंध तयार होतात. त्या देशात जावून मार्केटिंगसाठी, कंपनी सूची, उत्पादन सॅम्पल, व्हिजिटींग कार्ड आणि कंपनी प्रोफाइल असणे महत्वाचे ठरेल.
इंडियन ट्रेड पोर्टलवरून मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या वस्तूंचे आयात करणारे मुख्य देश आपल्याला माहिती करून घेता येतील किंवा DGFT वरून आपल्याला आपली टार्गेट कंट्री ओळखता येईल.
उदा. समजा जर डाळींब हे आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर पिकत असेल आणि त्याची निर्यात प्रामुख्याने सौदी अरेबिया, युरोप आणि बांगलादेश या देशांत होत असेल तर त्या देशांत आपण निर्यातीसाठी जास्त लक्ष दिले पाहिजे.
सोशल मीडिया एसईओ आणि इंटरनेट, सोशल मीडिया मार्केटिंग : आधुनिक काळातील सर्वात जास्त वापरली जाणारी आणि महत्त्वाची ही मार्केटिंगची पद्धत असून इंटरनेटच्या काही की-वर्ड्सच्या माध्यमातून योग्य त्या ग्राहकांपर्यंत या माध्यमातून आपण पोहचू शकतो.
एसईओ, आपले कंटेण्ट, की-वर्ड्स व कंपनी वेबसाइटच्या माध्यमातून कमी खर्चात आपण जास्त देशात पोहचू शकता. तसेच फेसबुक, लिंक्डइन, गुगल तसेच अन्य आंतरराष्ट्रीय पोर्टलवरून आपल्या कंपनीचे प्रोफाइल बनवून मार्केटिंग होऊ शकते.
ई-मेल मार्केटिंगसुद्धा याच प्रकारात मोडते. अनेक व्यवसायांना आपल्या उत्पादनांची व सेवांची माहिती इंटरनेट, ब्लॉग, सोशल मीडिया इत्यादींसाठी सतत नवनवीन कंटेंटची गरज असते. या पद्धतीच्या मार्केटिंगमध्ये सखोल अभ्यास आणि नेहमी सतर्क राहणे गरजेचे असते.
वस्तू-सेवांचा व्हिज्युअल सादरीकरण : या पद्धतीने तुमच्या वस्तूची पूर्ण माहिती समोरच्याला आपण देऊ शकतो. PPT Presentation आणि Video Presentation देता येते. सोशल मीडिया मार्केटिंगच्या माध्यमातून या मार्गाचा वापर करता येतो. ग्राहक आकर्षणाचा हा चांगला उपाय असून या माध्यमातून एक वेगळ्या दर्जाचे मार्केटिंग होत असते. उदा. Youtube किंवा वेबसाइट्स वरून व्हिडिओ माध्यम किंवा Presentation देऊ शकता.
मोफत नमुने पाठवून : विदेशातील काही आलेल्या मागणी किंवा Inquiry देणऱ्या कंपन्या किंवा ग्राहकांना फ्री सॅम्पल म्हणजेच नमुने पाठवणे, हा एक मार्केटिंगचा भाग असून आयात करणाऱ्या इतर देशात आपल्या मालाचे नमुने पाठवून आपण त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळवू शकतो. अशाप्रकारे गुणवत्ता वाढवून निर्यात करण्यास सुरुवात करू शकतो.
काही कंपन्या ज्या वस्तू आयात करणार्या कंपन्या आहेत; त्यांचा डेटासुद्धा विकत असतात. तो डेटा (Database) विकत घेऊन आपण त्या त्या वस्तू आयात करणाऱ्यांना आपण व्यवसायिक संवाद साधून सॅम्पल पाठवू शकतो. ही पद्धत अजूनही वापरात असून या माध्यमातून आपण ऑर्डर्स घेऊ शकतो.
वेगळ्या वस्तूंसाठी वेगळे ग्राहक : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अनेक देश मोठ्या प्रमाणावर निर्यात-आयात करत असतात. त्यांचे आपल्या देशाशी असलेले संबंध व्यापारीवृत्तीने आणखी जवळ येत असतात. वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या वस्तू किंवा माल आयात होत असतो.
आपल्या देशाशी अनेक देशांनी व्यापारी करारसुद्धा केलेले आहेत त्याची माहिती आपल्याला DGFT मध्ये उपलब्ध होऊ शकते. आपली जी वस्तू किंवा सेवा असते त्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर एक HS Number असतो त्याला HS CODE म्हणतात. तुम्हाला ज्या वस्तूची मार्केटिंग करायची आहे त्याचा HS CODE जाणून घेणे महत्त्वाचे असते.
समजा साखर आपल्याला निर्यात करायची असेल तर 84339000 हा त्याचा HS CODE असून HS CODE वरून आपण ज्या देशात या HS CODE ची निर्यात किंवा आयात झाली याची अनेक सरकारी पोर्टलवरून माहिती घेऊ शकतो. त्यावरून आपण त्या त्या देशात योग्य नियोजनबद्ध मार्केटिंग करू शकतो.
निर्यात मार्केटिंगचा होणार फायदा
- आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असल्याने ग्राहक वर्ग वाढीस लागतो.
- चांगल्या प्रकारचा हमीभाव मिळतो.
- आपल्या कंपनी/वस्तूचा दर्जा आणखीन वाढू शकतो.
- देशात विदेशी पैसा आल्याने अर्थव्यवस्थेवर चांगला परिणाम होतो.
- मागणी वाढून उत्पादन क्षमता वाढीस चालना मिळते.
- आपल्या कंपनीचा स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत व्यवसायासाठी एक चांगला दर्जा तयार होतो.
- ग्राहक आकर्षित होऊन वेगवेगळ्या वस्तू निर्यातीस चालना मिळते.
– आकाश आलुगडे
9579801138
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.