Advertisement
उद्योजकता

पेटा आणि उजळा…

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


“पेटून उठावे, उठून उजळावे,
प्रकाशमान होण्यासाठी कधी तरी सूर्यासारखे जळून बघावे!…”

‘करंजीत सारण आणि जीवनात वळण’ योग्य नसेल तर करंजी असो वा आयुष्य, दोघांनाही रुचकर स्वाद येत नाही. आयुष्याला वळण देण्यासाठी तसेच उद्योगधंद्यात यश मिळण्यासाठी आणि उच्चांक गाठण्यासाठी फायर अप म्हणजेच पेटून उठण्याची गरज असते, असे आपण विविध माध्यमांतून ऐकत असतो, तरीही आपण पेटून उठत नाही किंवा जीवनात कर्तृत्व दाखवण्याची तयारी करत नाही, असे का?

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

उद्योगात इच्छाशक्ती प्रबळ लागते, योग्य मार्गदर्शन लागते किंवा संकटाला संधी करण्याची तयारी लागते. अशा प्रकारच्या उद्योगाला तांत्रिक बाबी आपल्याला वारंवार मासिके, पुस्तके किंवा कार्यशाळा यांच्या माध्यमातून मिळत असतात, तरीही आपल्या उद्योगाची पाटी कोरीच राहते आणि उद्योग क्षेत्रात फक्त दोन-पाच टक्के लोकच यशस्वी होतात, असे का?

या प्रश्‍नाचे उत्तर आपण दैनंदिन जीवनाच्या छोट्या छोट्या उदाहरणांवरून समजून घेऊ.

उदाहरण क्र. १ : जर आपण एक कागद घेतला आणि पाण्यात भिजवला, नंतर त्याला आग लावण्याचा प्रयत्न केला, तर त्याला आग लागेल का? आणि दुसरा प्रश्‍न आग का लागणार नाही? उत्तर अगदी सोप्पे आहे. आपला कागद ओला आहे, त्याच्यात पाण्याचा अंश आहे म्हणून कागद पेटत नाही. अगदी असेच असते आपल्या उद्योगधंद्यांचे होते.

आपल्या वैयक्तीक जीवनातील अनुभव, मित्रमंडळी, कुटुंब, रूढी, मान्यता या सर्व गोष्टींचा पगडा इतका जड असतो की उद्योगांसाठी लागणारी इच्छेची ठिणगी एका झटक्यात विझून जाते आणि आपल्या उद्योगाचा कागद कधीच फायर अप होत नाही. उद्योगाच्या गाडीला पुढे न्यायचे असेल तर फायर अपचे इंधन गरजेचे असते.

उदाहरण क्र. २ : जर आपल्याला जेवण बनवायचे असेल आणि आपण जेवण करण्यासाठी कुकर लावला आणि अन्न शिजवण्यासाठी गॅस किंवा स्टोव्हवर ठेवला तर गॅस पेटवल्याशिवाय कुकरमध्ये अन्न शिजणार नाही. आपल्याला गॅस पेटवायला लागणारच. उद्योगाचेही त्याचप्रमाणे आहे.

आपण उद्योग सुरू करतो, सर्व तयारी करतो, परंतु उद्योगात यशस्वी होण्यासाठी व परिपक्‍वतेसाठी गॅस लावायला विसरतो म्हणजे उत्तेजना किंवा प्रेरणा देऊन पेटून उठायला विसरून जातो. यश हवे तर इच्छा हवी, इच्छेसाठी प्रेरणा हवी आणि प्रेरणेसाठी जाज्वलता हवी. उद्योगात, जीवनात पुढे जायचे असेल किंवा हवे असलेले उच्चांक गाठायचे असेल तर फायरअप!

शेवटी जळल्याशिवाय उजळता येत नाही. उद्योग ही कोळशाची खाण आहे. जर आपण फक्त नकारात्मक किंवा नैराश्याच्या गोष्टींचा विचार केला तर ते फक्त कोळसा उगाळण्यासारखे आहे, कितीही उगाळला तरीही काळाच, त्यातून काहीही निष्पन्न निघणार नाही; पण याच कोळशाला इंधन म्हणून जाळले तर मात्र हवे असलेले परिणाम मिळतात आणि आपल्या उद्योगांचे इंजिन भरधाव पळते. त्यात आपल्याला योग्य संधी मिळवता आली तर आपल्याला याच काळ्या काळोखी कोळशाच्या खाणीत अकस्मात हिरेपण सापडतात.

पेटून उठण्याची गरज का?

इंधन पेटवायचे असेल तर एक ठिणगीसुद्धा पुरेशी असते आणि एकदा पेट घेतला तर सतत प्रज्वलित होण्यासाठी त्यात मध्ये मध्ये थोडे इंधन टाकावे लागते. आपल्या उद्योगांचेपण असेच असते, प्रेरणेच्या इंधनाशिवाय उद्योगाची गाडी सुरू होत नाही आणि सुरू झाली तरीही मध्ये मध्ये प्रेरणेचे इंधन टाकावे लागते. अशा वेळी लागते फायर अपसारखे इंधन जे उद्योजकाला पेटून उठवते आणि त्याची यश मिळवण्याची इच्छा वाढवते.

फायरअप कसे काम करते?

आपण लहानपणापासून जे अनुभव घेतो, ते मनाच्या एका कोपर्‍यात साठवले जातात. जर आपण या सर्व अनुभवांचा एक आढावा घेतला तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल की, गोष्टी चांगल्या असो वा वाईट आपल्या मनाला ज्या गोष्टी भिडतात त्याचे पडसाद आपल्या जीवनावर, जीवनशैलीवर उमटतात. या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्यावर नक्कीच होतो. अशा मनावर साठलेल्या जळमटांना जाळण्याचे काम फायर अप करते.

कधी एखादी चांगली किंवा वाईट घटना आपल्या वैयक्तिक जीवनाला, उद्योगाला कलाटणी देते आणि अचानक आपली प्रगती होते. विचार करा, जर आपण काही घटनांनी एवढे फायर अप होऊ शकतो, तर हीच परिस्थिती नेहमीच राहिली तर आपण किती यशस्वी होऊ शकतो.

नेहमीच फायरअप राहण्यासाठी काय करावे?

१. जुन्या आणि नको असलेल्या सवयींमध्ये बदल :

आपल्याला वाटते त्यापेक्षा जास्त आपल्या शरीराची आणि मनाची शक्ती असते, पण आपल्याला लहानपणापासून शारीरिक व मानसिक बळाची प्रचीती कधीच आलेली नसते; परंतु एखाद्या संकटात, जेव्हा एखादी गोष्ट असंभव दिसते, तेव्हा आपण आपली संपूर्ण शक्ती वापरण्याचा प्रयत्न करतो. एखादे संकट जसे बदल घडवून आणू शकते तसेच योग्य नियोजन आपल्या जीवनात बदल घडवून आणू शकते.

उदाहरणार्थ, जर मी सकाळी आठ वाजता उठते आणि मला सकाळी पाच वाजता उठायचे असेल तर मी एकाच दिवसात सकाळी पाच वाजता उठू नाही शकत आणि उठायचा प्रयत्न केला तरी मला तो उत्साह नाही राहणार, परंतु जर मी उठायचा प्लॅन केला तर मी जर आज, दिवस क्रमांक एकला सकाळी आठ वाजता उठत असेल तर उद्या दिवस क्रमांक दोनला सकाळी ७:५५ म्हणजे पाच मिनिटे आधी उठेन.

असे करत करत महिन्याच्या शेवटी मी पाच मिनिटे तीस दिवस = १८० मिनिट आधी, सकाळी पाच वाजता उठू शकते. हाच फॉर्म्युला आपण आपल्या उद्योगात आणि वैयक्तिक जीवनात प्रगतीसाठी लागू करू शकतो.

२. पेटून उठा, जळू नका :

पेटणे आणि जळणे या दोघांतील फरक भल्याभल्या लोकांना समजत नाही. फायर अप म्हटले तर लोकांना वाटते स्वत:ला त्रास देणे आणि जाळणे; परंतु उद्योगधंद्यात प्रगती करायची असेल तर पेटून उजळावे. जसा एखादा दिवा पेटून सर्वांना प्रकाश देतो त्याचप्रमाणे स्वत:ला प्रकाशमान करावे; पण काही लोक स्वत:ला कापरासारखे जाळून घेतात आणि भराभर जळून राख करतात. हीच खबरदारी प्रत्येक उद्योजकाने घेणे अनिवार्य आहे.

3. सातत्य :

कोणत्याही गोष्टीत सातत्य असेल तर सुरू राहते. उद्योगात प्रगती हवी तर सातत्य हवे. सातत्य हे उद्योगधंद्यात ऑक्सिजनचे काम करते. सातत्य नसेल तर मोठ्यातील मोठा उद्योग मनोरा कोलमडून पडतो. खास, विशेषत: महिला उद्योजिका आणि बचत गट मोठ्या उत्साहाने उद्योगधंदे सुरू करतात, पण त्यांच्या उद्योगात सातत्य सापडत नाही. घर, कुटुंब, जबाबदार्‍या या ओझ्याखाली ‘सातत्य’ हा शब्द डिक्शनरीतून निघून जातो.

उद्योगात काही गोष्टींमध्ये सातत्य हवे :

  • नवीन गोष्टी शिकणे
  • नवीन गोष्टी शिकवणे
  • उद्योजकांना मित्र बनवणे
  • उद्योगांना कौटुंबिक स्थान मिळवून देणे

४. स्टार्टअप फॉर स्टँडअप :

नावीन्यपूर्ण विचार उद्योगांना उभारी देते आणि उच्चांक गाठण्याची संधी मिळवून देते. म्हणून नवीन नवीन कल्पनांचा विचार करा, त्यातूनच नावीन्यपूर्ण उद्योगांचे पर्व सुरू होईल.

‘एक नवीन कल्पना, शंभर नविन संधी मिळवून देते!’

५. संकटांवर मात, संधी शोधण्याची साथ :

संकट ही नेहमी त्रास घेऊन येण्यापेक्षा तुम्हाला उजळवण्याचे किंवा संधी मिळवून देण्याचे सर्वांत मोठे साधन असते. जेवढे मोठे संकट तेवढीच मोठी संधी प्राप्त होते. म्हणून प्रत्येक संकटाकडे संधी म्हणून बघावे.

६. माईड सोक अ‍ॅन्ड माइंड स्क्‍वीझ :

माणसाचे मन एका स्पंजसारखे असते, सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी शोषत असते. जर स्पंज घाणीत ठेवला तर तो घाण शोषून घेतो तसेच आपले मन दररोज दिवसभर विविध विचार, अनुभव, कृतीमधून घाण आपल्या मनावर साठवते. असा घाण आणि जंतुमय झालेला जीर्ण मनाचा स्पंज साफ करण्याची आणि स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे. म्हणून दररोज झोपण्याआधी दिवसभरातील चांगल्या आणि वाईट गोष्टी सोडून द्यायला हव्या आणि स्वच्छ मनाने झोपावे म्हणजे आपण नेहमी चार्ज अप (प्रज्जलित) राहतो.

७. शक्तीचा योग्य उपयोग :

आपली शारीरिक आणि मानसिक शक्ती जिथे आपण केंद्रित करतो, तिथे ती लेझर बीमसारखी काम करते, म्हणून आपण शक्तीचा उपयोग एका इंधनासारखा करावा आणि जपून व आवश्यक ठिकाणीच खर्च करावा म्हणजे आपण नेहमीच चार्ज अप म्हणजे फायर अप राहतो.

मित्रांनो, उद्योगाचे जाते दोन चाकांवर असते. एक चाक जे स्थिर आहे, ते म्हणजे आपले ज्ञान, कौशल्य, सदाचार, नीतिमूल्य आणि तत्त्व आणि दुसरे चाक म्हणजे जे सतत फिरत राहाते ते म्हणजे फायर अप, प्रेरणा. दोन्ही चाके योग्य प्रकारे वापरली तर नक्कीच उद्योगात प्रगती करू शकू.

– डॉ. शिवांंगी झरकर
9867815253


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!