Advertisement
उद्योगोपयोगी

करा स्वत:च्या व्यवसायाला फायनान्स

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v

स्वत:चा उद्योगधंदा सुरू करण्याचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे. उद्योजक म्हणून स्वत:ला उभं करण्याची. भारतात स्थानिक पातळीवर करण्यासारखे अनेक उद्योग संधी उपलब्ध आहेत आणि राष्ट्रीय बाजारपेठही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. हे सर्व सुरू करण्यासाठी तंत्रज्ञानाचीही साथ चांगली मिळू शकते.

निश्चित ध्येय आणि प्रचंड इच्छा शक्ती असणाऱ्या व्यक्तीकडे व्यवसायाच्या वेगवेगळ्या कल्पना असतील तर तो चांगला उद्योजक बनतो. पण जर योग्यरित्या आर्थिक नियोजन केले तरच त्याचा हा प्रवास सुखकर होऊ शकतो. व्यवसायात येणाऱ्याने स्वत:चे दोन प्रकारचे आर्थिक नियोजन करणेचे गरजेचे असते.


फक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा!

या वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak

एक म्हणजे व्यवसायिक आणि दुसरे म्हणजे त्याचे वैयक्तिक. याप्रकारे आर्थिक नियोजन केलेले असले की, त्या उद्योजकाचा उद्योग नफ्यात येईपर्यंत तो व्यवसाय आणि वैयक्तिक खर्च चांगल्याप्रकारे हाताळू शकतो.

उद्योग सुरू केल्यानंतर काही काळ हा उद्योग ना नफा तत्वावरच चालवावा लागतो. वेळेला आपण गृहित धरून चालत नाही. जोपर्यंत व्यवसाय हा स्वत:च स्वत:च्या पैशावर सुरू राहत नाही तोवर आपल्याला पैशाचं नियोजन काळजीपूर्वकच करावं लागतं. पै-पैचा हिशोब ठेवला गेला पाहिजे. यासाठी योग्य त्या आधुनिक सॉफ्टवेअरची माहिती करून हिशोब नेहमी काटेकोरपणे मांडून ठेवला पाहिजे. यासाठी खेळत भांडवल उभं राहिपर्यंत हे प्रत्येक उद्योजकाने नियमित आणि काटेकोरपणे केलच पाहिजे.

सुरुवातीला आपण जे आर्थिक नियोजन करतो त्यात केवळ आजचा विचार न करता पुढील कमीत कमी १२ ते १४ महिन्याच्या व्यावसायिक भांडवलाची सोय उद्योजकाने वेगवेगळ्या स्वरूपात करून ठेवलेली असली पाहिजे. उदा. बँक, Fix Deposit, Mutual Funds, etc. म्हणजेच गरजेला त्याचा उपयोग होतो.

खरंतर उद्योजक जेव्हा उद्योग सुरू करतो त्यावेळी त्याने धोका पत्करलेला असतो. त्यामुळे या सगळ्या व्यक्तिरिक्त त्याची वैयक्तिक बचत मात्र यातून वेगळी असायला हवी.

जर तुमच्या उद्योगात गुंतवणूकदार वेगळा असेल तर, त्याला कमीत कमी ३ महिन्यातून एकदा तरी व्यवसायाच्या स्थितीची सतत माहिती द्यायला हवी. त्यामुळे त्यांनाही परिस्थितीची माहिती असेल. उद्योजकाने त्याच्या उद्योगात त्याच्या कुंटुंबातील एखाद्या व्यक्तीला स्वत:सोबत व्यवसायात घेतले तर त्याला त्याचा खूप फायदा होऊ शकतो. तो त्याला आवश्यक असणाऱ्या विश्वास आणि पाठींबा या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये त्यामुळेही त्याच्यापुढे उभ्या राहणाऱ्या अनेक समस्यांना सामोरे जाताना त्याला थोडी मदत होते.

– टीम स्मार्ट उद्योजक


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!