गुंतवणूक सल्ला : पैसा गुंतवला तरच वाढतो…

बचत आणि गुंतवणूक या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बचत करता करता पैशांचा विनियोग योग्य रीतीने करणे तितकेच गरजेचे असते. जमशेदजी टाटा यांनी सांगितल्याप्रमाणे, “पैसा गुंतवला तर वाढतो”. त्यामुळे त्याचा योग्य विनियोग केला पाहिजे. म्हणजे काय तर तो सत्कारणी लागला पाहिजे.

योग्य वेळी योग्य ठिकाणी केलेली गुंतवणूक माणसाला अडचणीत उपयोगी पडते. आपण पैसे किती कमावतो त्यापेक्षा तो किती काटकसरीने वापरतो हे जास्त महत्त्वाचे आहे. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी बचतीबरोबरच गुंतवणूकही महत्त्वाची आहे.

आताच्या काळात स्थावर मालमत्ता, सोन्यातील गुंतवणूक, म्युच्यूअल फंड, मुदत ठेव असे पर्याय जे आपल्याला चांगले रिटर्न देतील. शेवटी कसे आहे “थेंबे थेंबे तळे साचे” या उक्तीप्रमाणे रोज केलीली थोडी थोडी बचत आणि गुंतवणूक कालांतराने ती मोठे स्वरूप घेईल, कारण आपल्याकडे दूरदृष्टिकोन असायला हवा. त्याखेरीज आपण आपली प्रगती करू शकणार नाही.

पैसा सर्वस्व नाही, पण सर्वकाही करण्यासाठी पैसा लागतो, हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे गुंतवणूक ही काळाची गरज बनली आहे. ती आपण सर्वांनी आत्मसात केली पाहिजे.

अर्थकारेन: समृद्धी

– सचिन व्यवहारे
976440012

Author

books for life website Ad
Click here to visit: booksforlife.in
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
Smart Udyojak India Business Directory
आशिष पेटे : सौरऊर्जेने ग्रामीण महाराष्ट्रात घडवलेली हरितक्रांती व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस व्हिसिटिंग कार्डचं महत्त्व उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?