Advertisement
उद्योगसंधी

वित्तसहाय्यक; उद्योजकांना कर्ज मिळवून देणारा मित्र

फक्त रु. ५०० मध्ये 'स्मार्ट उद्योजक' प्रिंट मासिक घरपोच मिळवा.

Book Now: https://imjo.in/Xx7Uq6

Print this Page

पैसा ही प्रत्येकाची गरज आहे आणि प्रत्येकालाच स्वत:च्या गरजा पूर्ण करण्यासाठी तो कमी पडतो. त्यामुळे त्याला कर्जाचा आधार घ्यावा लागतो. मात्र कर्ज मिळवणे हे म्हणावे तितके सोपे नाही. त्यासाठी तुम्हाला ठरावीक नमुन्यात अर्ज करावा लागतो. तरच बँक वा अन्य वित्तपुरवठा करणार्‍या संस्था तुम्हाला आर्थिक सहकार्य करू शकतात.

अनेक जणांना बँक वा वित्तसंस्थांना लागणार्‍या नमुन्यात अर्ज करणे जमत नाही किंवा कठीण पडते, कारण त्यांना त्या गोष्टीचा अनुभव नसतो. त्यामुळे अशा अनेक एजन्सीज् तुम्हाला कर्ज मिळवून देण्यात सहकार्य करतात. कर्जासाठी योग्य पद्धतीत अर्ज तयार करणे, त्यासाठी लागणार्‍या कागदपत्रांची पूर्तता करणे, कर्जदाराला त्याच्या गरजेनुसार कुठून आणि किती कर्ज मिळू शकेल याचे मार्गदर्शन करणे आदी बाबी येतात. त्याचा मोबदला म्हणून ठरावीक शुल्क वा कर्जरकमेच्या ठरावीक टक्के रक्कम मिळते.

आपल्यालाही आर्थिक वा बँकिंग क्षेत्राचे ज्ञान असल्यास आपण हा व्यवसाय सुरू करू शकता. गृहकर्ज, व्यापार कर्ज, वैयक्तिक कर्ज, मालमत्ता तारण कर्ज, सोने तारण कर्ज असे कर्जाचे विविध प्रकार असतात, त्यात तुम्ही ग्राहकांना सहकार्य करू शकता. शिवाय मोठमोठ्या कंपन्यांना प्रोजेक्ट फायनान्स लागते. त्यांची गरज ही काही करोड रुपयांचीसुद्धा असू शकते, अशा वेळी तुम्ही त्यांना प्रोजेक्ट लॉग होण्यासाठी सहकार्य करू शकता.

नवउद्योजकांना बँकेकडून कर्ज कसं मिळेल?


Paytm वापरकर्त्यांसाठी बंपर ऑफर

'स्मार्ट उद्योजक' मासिकाची वार्षिक डिजिटल वर्गणी

Paytm वर मिळवा आता फक्त ₹५० मध्ये.


FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: