Advertisement
उद्योगसंधी

वित्त नियोजक : पैसा वाचवणारे व वाढवणारे व्हा!

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


पैसा हा बचत केल्याने वाढत नाही, तर त्याचे योग्य प्रकारे नियोजन केल्याने तो वाढतो. पैशाचे योग्य प्रकारे नियोजन करणे म्हणजे तो कुठे, कसा, किती प्रमाणात आणि कधीपर्यंत गुंतवावा याचे नियोजन करणे. असे नियोजन करणार्‍यांना वित्त नियोजक म्हणतात.

हा वित्त नियोजक तुमचा विमा, बचत, गुंतवणूक, वैयक्तिक जबाबदार्‍यांसाठीची तरतूद, तुमची स्वप्नं पूर्ण करण्यासाठीची तरतूद, तुमच्या निवृत्तीनंतरची तरतूद, तुमच्या पश्चात तुमच्या जीवनासाठीच्या आर्थिक गरजांची तरतूद अशा अनेक गोष्टींसाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने तुम्हाला नियोजनाचा सल्ला देतो.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

विमा, मेडिक्‍लेम, म्युच्युअल फंड आदी कोणतेही एखादे उत्पादन विकणे हे वित्त नियोजकाचे काम नसून तुमच्या गरजा आणि तुमची क्षमता याप्रमाणे काय काय करणे गरजेचे आहे याचा सल्ला देणे हेच त्याचे काम आहे. वित्त नियोजक म्हणून काम करण्यासाठी तुम्हाला ‘सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनिंग’ हा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. शिवाय एमबीए इन फायनान्स किंवा चार्टर्ड अकाऊंटंट आदी शिक्षण घेतलेले असेल तर उत्तम.

भारत सरकारच्या ‘सिक्युरिटिज अ‍ॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया’कडे (सेबी) वित्त नियोजक म्हणून नोंदणी करणे कायदेशीररीत्या व व्यावसायिक लाभाच्या दृष्टीनेही फायद्याचे ठरते.

स्मार्ट उद्योजक पोर्टलवर तुमची यशोगाथा मांडण्यासाठी येथे क्लिक करा

Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!