Advertisement
उद्योगोपयोगी

छत्रपती शिवाजी महाराजांचे आर्थिक नियोजन आणि व्यवसाय

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


शिवाजी महाराजांचे स्मरण होत नाही असा व्यक्ती नाही किंवा दिवस नाही, पण जेव्हा आपण शिवाजी महाराजांची आठवण काढतो तेव्हा आपण शिवाजी महाराजांचे युद्धकौशल्य, त्यांचा गनिमी कावा, स्त्रीदाक्षिण्य ह्यासाठीच त्यांचे स्मरण करतो आणि आपण त्यांची तत्त्वे पाळण्याचा प्रयत्न करत असतो. पण अजूनही एक गोष्ट आहे जी नक्कीच पाळली पाहिजे ते म्हणजे आर्थिक नियोजन.

शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केलं ते फक्त युद्धकौशल्यावर अवलंबून नव्हते, तर त्यासाठी आर्थिक नियोजनदेखील महत्त्वाचे होते. शिवाजी महाराजांचे जर आपण उदाहरण घेऊन पुढे विचार करायचा झाला, तर सुरुवातीला आपण असे म्हणू शकतो की त्यांनी तोरणा ताब्यात घेताना एक स्टार्टअप सुरू केला व पुढे याचे मोठ्या Multi National Company (MNC) मध्ये रूपांतर झाले.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

तोरणा मोहीम ही स्टार्टअपची मुहूर्तमेढ

सुरुवातीला हातात काहीही नसताना आपल्याबरोबर त्यांनी आपल्यासारख्या पण वेगवेगळी कौशल्य असणाऱ्या साथीदारांची सोबत घेतली (स्टार्टअपची सुरुवात) (selection of partners), सुरुवातीला फक्त एकाच कामगिरीवर लक्ष केंद्रित केले. त्यात त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन काम केलं. (single project at a time, and involvement of owner). नंतर त्यातून येणाऱ्या सारा उत्पन्नाची (income reinvested) त्यांनी पुढच्या कामगिरीवर गुंतवणूक करायला सुरुवात केली.

टीम घडवणे

Drawing by Sayali Phansekar. Courtesy: Pixel.com

ह्यातून हळूहळू एक योध्यांची आणि विचारवंतांची फौज उभी झाली. त्यांना अनुभव देऊन त्यांनी त्यांच्यावर जबाबदाऱ्या सोपावल्या. त्यांनी एखाद्या कामगिरीवर एखाद्या मावळ्याला नियुक्त करताना त्या मावळ्याच्या अंगी असलेले कौशल्य, शक्ती, संयम ह्या गोष्टींचा विचार करून, ते कामगिरी सोपवत होते. (Team Building and Task Assignment). ह्या सगळ्यात महत्त्वाचे होते ते त्यांच्या साथीदारांनी त्यांना दिलेली साथ (Team Involvement).

सर्व मावळ्यांनी पण स्वराज्याचे काम हे आपले आहे अशा पद्धतीनेच हाती घेतले (ownership of work). उदाहरण घ्यायचेच झाले तर तानाजी मालुसरे यांनी घरातले मुलाचे लग्न सोडून कोंढाणा ताब्यात घेतला ह्यातून त्यांचे कामगिरीवर असलेले प्रेम दिसून येते, पण दुसरी गोष्ट सांगायची झाली तर शिवाजी महाराजांनी त्यांना फक्त सांगितले होते की कोंढाणा घ्यायचा आहे, त्यासाठी काय करायचे कसे करायचे आणि त्यासाठी कुठल्या गोष्टींचा अवलंब करायचा हे सर्व तानाजींनीच ठरवले, त्यांनी फक्त शिवाजी महाराजांना यशस्वी परिणाम दिला (result oriented work from team).

अशा पद्धतीची फौज उभारणे हेदेखील स्वराज्य स्थापन करतानाचे महत्त्वाचे पाऊल होते. त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना अशा पद्धतीने तयार केले होते की स्वराज्यात त्यांना असलेल्या स्थानापेक्षाही इतर राजे त्यांना अधिक वरच्या स्थानावर जागा देऊन स्वतःच्या गोटात सामावून घेतील, पण अशा पद्धतीची वागणूक दिली की कितीही मोठी संधी दिली तरी त्यांचे स्वराज्यावरचे आणि महाराजांवरची निष्ठा कमी होणार नाही. (Healthy Work environment)

स्टार्टअप फंडची उभारणी

एका स्तरावर पोहचल्यावर शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली आणि जबाबदाऱ्या वाटून दिल्या (segregation of work) हे सर्व करताना आर्थिक नियोजन हेदेखील शिवाजी महाराजांनी अतिशय योग्य पद्धतीने हाताळले. वेळ प्रसंगी कर्ज घेतलं, पण ते कर्ज घेताना त्यांनी एक गवताची काडी गहाण ठेवली होती, पण माझ्या स्वराज्यातील गवताची काडीही गहाण राहणार नाही हे तत्त्व त्यांनी पाळले आणि ती काडीही त्यांनी सावकाराकडून सोडवून घेतली (fund creation).

साऱ्यातून आलेले पैसे, त्याचे शिक्षण, संरक्षण, स्वच्छता, प्रशासन आणि भविष्यातील विस्तार ह्यासाठी योग्य पद्धतीने नियोजन केले (Budget and appropriation of funds).

शिवाजी महाराजांनी नवीन किल्ले बांधताना त्या परिसराचा अभ्यास, भौगोलिक परिस्थिती, तो किल्ला बांधल्यावर होणारा फायदा याचे व्यवस्थित नियोजन केले होते (capital investment) प्रत्येक डोंगरावर ते किल्ले बांधत नव्हते. शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले अजूनही सक्षम आहेत आणि परदेशातील अभ्यासक्रमात त्यांच्या व्यवस्थापन पद्धतीवर धडा आहे ह्यावरून त्यांची कामाची गुणवत्ता समजते (quality of work and processes).

महाराजांची आग्र्याहून सुटका झाली तेव्हा औरंगजेबालाच काय तर आत्ताच्या इतिहास संशोधकांनासुद्धा शिवाजी महाराजांच्या योजनेचा सुगावा शोधता आला नाही (secrecy of planning).

शिवाजी महाराजांनी एका स्तरापर्यंत यश प्राप्त केल्यावर राज्याभिषेक करून घेतला (change of organisational structure-we can say proprietary to private limited), जेणेकरून एक वेगळी प्रतिष्ठा प्राप्त होईल. व्यवसायातसुद्धा व्यवसायाच्या दृष्टीने वेगवेगळ्या गोष्टी आणि भविष्याच्या विस्तारासाठी तरतूद करणे गरजेचे आहे.

आताच्या काळात आपल्याला शिवाजी महाराजांच्या या आर्थिक नियोजनाची तत्त्व पाळणे खुप आवश्यक आहे. त्यातून एका छोट्या व्यवसायातून एखादा उद्योगमहर्षी तयार होऊ शकतो.

– कमलेश जोशी
9422530196 / 8237723906
(लेखक पुणेस्थित कर सल्लागार आहेत.)


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!