उद्योगसंधी

उद्योगसंधी : धान्य आणि जीवनावश्यक वस्तू घरपोच पुरवणे

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


आजकाल बहुतेक घरी नवरा-बायको नोकरी करतात. त्यामुळे दुकानातून अन्नधान्य, भाजीपाला आणणं, निवडणं, शिजवणं इत्यादी गोष्टींना त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही. मिळतो तो वेळ असल्या फालतू गोष्टींमध्ये घालण्यामध्ये त्यांना रस नसतो.

पाश्चिमात्य देशात बाजारातून कच्चा माल आणून, घरी निवडून, साफ करून शिजवणं ही तर विरळाच गोष्ट आहे. तर अशा वेळी तुम्ही ही तूट भरून काढू शकता. दाणाबाजारातून वा एखाद्या होलसेल व्यापाऱ्यातकडून मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य आणायचं, ते साफ करायचं, वजन करायचं, त्यास योग्य लेबल लावायचं.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

प्लॅस्टिकच्या पिशव्यात पॅक करायचं व विकायचं. भायखळा, दादर व नवी मुंबई या भाजीपाल्याच्या घाऊक बाजारपेठा आहेत. अन्नधान्याचा प्रश्नक नाही; पण भाजीसारखा नाशिवंत पदार्थ जास्त दिवस टिकवायचा असेल तर शीतपेटीत ठेवणं आवश्यक आहे. यासाठी मार्केटिंग सर्व्हे करून एखादी सोसायटी निवडणं आवश्यक आहे.

सुरुवातीला चार घरं मिळाली व चोख व्यवहार केलात तर गिऱ्हाईकं वाढतील व काही दिवसांनी महिन्याच्या बेगमीसाठी तुम्हाला आगाऊ पैसेही देऊ लागतील. शिवाय तांदूळ जेवढा जुना तेवढा चांगला व त्याला जास्त भाव नंतर येऊ शकतो. त्याचा साठा करायचा. यात सुमारे वीस टक्के नफा मिळू शकतो. मात्र हे मेहनतीचं काम आहे.

धंदा वाढल्यानंतर तुम्ही चार नोकर ठेवू शकता. जसजसा धंदा वाढेल तसतसे तुम्ही त्यात अधिक पदार्थांची भर घालू शकता. व्यवस्थित धंदा केलात तर एक-दोन वर्षांनंतर महिन्याला एका लाखाची उलाढाल करणं कठीण नाही. म्हणजे महिन्याला सुमारे पंधरा हजारांचा नफा.

हा मेहनतीचा व्यवसाय आहे. याला शारीरिक क्षमता व वजन उचलण्याची ताकद फार आवश्यक आहे. शिक्षणाची फार आवश्यकता नाही. पैलवान लोकांनी व्यायामशाळेत जाऊन वजने उचलायची व त्यासाठी स्वत:च पैसे द्यायचे त्याऐवजी हा व्यवसाय करावा. त्यामुळे शरीर सुदृढ राहील व चार पैसेही मिळतील.


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!