उद्योगवार्ता

कोल्हापूरमध्ये एकदिवसीय ‘फूड स्टार्टअप सपोर्ट कार्यशाळा’

'स्मार्ट उद्योजक' मासिक वर्षभरासाठी घरपोच मागवून वाचा फक्त रु. ५०० मध्ये!

आजच वर्गणीदार व्हा! https://imjo.in/Xx7Uq6

Print this Page

फूड सायंटिस्ट असोसिएशन ‘ASFTi-मुंबई’ आणि ‘ओपेक्स’ स्टार्टअप एक्सलरेटर-कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने १९ जानेवारी रोजी कोल्हापूर येथे ‘फूड स्टार्टअप सपोर्ट कार्यशाळा’ आयोजित केली आहे. या एक दिवसीय कार्येशाळेचा प्रमुख उद्देश अन्नप्रक्रिया क्षेत्रात स्टार्टअप चालू करण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती पुरविणे हा आहे.

कार्यशाळेमध्ये बिसिनेस प्लॅन बनवणे, निधी उपलब्ध करणे, केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना यांची माहिती, FDA आणि FSSAI परवाना आणि त्यांचे पालन, मार्केट सर्व्हे आणि व्यवसायासाठी लागणार्‍या डिजिटल मार्केटिंगबद्दल माहिती दिली जाणार आहे.

Advertisement

ASFTi मुंबईचे अध्यक्ष निलेश लेले तसेच ओपेक्सचे सचिन कुंभोजे व अंजोरी परांडेकर हे या कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. अधिक माहितीसाठी ९५५२१०८८९९ यावर संपर्क करू शकता.

– प्रतिनिधी

Help-Desk
%d bloggers like this: