Advertisement
उद्योगसंधी उद्योजकता

फ्रॅन्चायजी घेणे म्हणजे व्यवसायात भागीदार होणे

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v

स्वत: कंपनी उभी करणं, ती वाढवणं, तिचा ब्रॅण्ड प्रस्थापित करणं हे प्रत्येकालाच सहज शक्य नसतं. अशा वेळी दुसर्‍या प्रस्थापित कंपनीचे नाव, ब्रॅण्ड व बिजनेस मॉडेल वापरून कमी गुंतवणुकीत आपल्यालाही स्वत:चा व्यवसाय सुरू करता येतो. अशा प्रकारच्या बिजनेस मॉडेलला ‘फ्रॅन्चायजिंग’ म्हणतात.

‘फ्रॅन्चायजिंग’मध्ये मोठ्या, प्रस्थापित ब्रॅण्डशी करार करून त्यांच्या नावे व्यवसाय करता येतो. याचा फायदा म्हणजे मोठ्या ब्रॅण्डच्या नावे बिझनेस केल्याने ग्राहक मिळवणे सोपे जाते.


फक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा!

या वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak

प्रस्थापित कंपनीची उत्पादन वा सेवा पुरवण्याची पद्धती विकसित झालेली असते ती तुम्हाला अवलंबवावी लागते. मॅकडोनाल्ड, केएफसी, पिझा हट, डोमिनोज् इ. या जागतिक पातळीवरील फ्रॅन्चाइजी देणार्‍या काही कंपन्या तसेच डीटीडीसी कुरियर, नॅच्युरल्स, अमुल आइस्क्रीम, कॅफे कॉफी डे आदी काही भारतीय फ्रॅन्चायजी देणार्‍या कंपन्या आहेत.

एखाद्या कंपनीची फ्रॅन्चायजी घेण्यासाठी तिला अर्ज करावा लागतो. तुम्ही कुठे फ्रॅन्चायजी उघडू इच्छिता, त्यातून कंपनीला कसा फायदा होईल हे मांडावे लागते. त्यानंतर मूळ कंपनीने निश्‍चित केलेली राशी भरावी लागते व कंपनीच्या मंजुरीनंतर तुम्हाला कंपनीच्या अटी व शर्तीप्रमाणे व्यवसाय करावा लागतो. विक्रीतील निश्‍चित केलेला हिस्सा रॉयल्टी रूपात मूळ कंपनीला देणे बंधनकारक असते.

भारतात अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांना जिल्हा व तालुका पातळीवर आपला व्यवसाय वाढवायचा आहे. अशा कंपन्यांना आपण योग्य प्रकारे प्रस्ताव मांडला असता त्या कंपनीच्या गुडविलच्या आधारे आपल्याला यशस्वीरीत्या व्यवसाय करता येऊ शकतो.

कमी गुंतवणुकीमध्ये फ्रॅन्चायजी घेता येऊ शकतील अशा काही कंपन्या :

हे ई-बुक खरेदी करण्यासाठी जाहिरातीवर क्लिक करा.

अमुल आइस्क्रीम, तळवलकर्स जीम, स्टेशनरी बाझार, गिफ्ट मग्स, प्रेस्टो, मोहन इम्प्रेशन्स, Officeyes.com, कार्ट्रीज वर्ल्ड, क्‍वॉलिटी वॉल्स, बास्किन्स रॉबिन्स, वाडीलाल आइस्क्रीम, FabMart.com, फर्न्स एन् पेटल्स, फ्लोरिस्टा, आर्चिज्, मेक माय ट्रिप, थॉमस कूक, कॉक्स अ‍ॅण्ड किंग्स, डीटीडीसी कुरिअर, ब्ल्यू डार्ट एक्स्प्रेस, ब्लेझ फ्लॅश कुरिअर, ओव्हरनाइट एक्स्प्रेस, मोतीलाल ओस्वाल सिक्युरिटीज्, शेअरखान, कॉफी डे एक्स्प्रेस, ग्लोरीआ जीन्स कॉफी, री-फील, ग्रील्झ, फ्रेश अ‍ॅण्ड नॅच्युरेले, स्नॅकोझ्, क्‍लब लॅपटॉप, सनशाइन केबाब्स, द चॉकलेट रूम, लेओनिडास्, एसकेआय कॅपिटल सर्व्हिसेस, व्हेंच्युरा सिक्युरिटीज्, वेलइंडिया ग्रुप, सीएफएस फायनान्शियल सर्व्हिसेस, मॅक्समाइंड अ‍ॅबॅकस अ‍ॅण्ड वेदिका अ‍ॅकॅडेमी, विणा वर्ल्ड, केसरी टूर्स, एसआयपी अकॅडेमी, जयंती कठाळे यांचे अन्नपूर्णा रेस्टॉरंट, पितांबरी शॉप, मिसळ दरबार, येवले चहा, साईबा चहा, प्रेमाचा चहा, इत्यादी.

– टीम स्मार्ट उद्योजक


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!