उद्योजकता विकास

मी कोणता व्यवसाय सुरू करू?

'स्मार्ट उद्योजक' मासिक वर्षभरासाठी घरपोच मागवून वाचा फक्त रु. ५०० मध्ये!

आजच वर्गणीदार व्हा! https://imjo.in/Xx7Uq6

Print this Page

स्मार्ट उद्योजकचा संपादक म्हणून महाराष्ट्रभरातून रोज अनेक फोन येत असतात. यापैकी बरेच फोन हे मी कोणता व्यवसाय सुरू करू, हा प्रश्न विचारणारे असतात. लोकांना फोनवर या प्रश्नाचे नेमके काय उत्तर द्यावे हा एक मोठा प्रश्नच असतो.

मुळात आपण रोजगारनिर्मितीच्या दोन प्रमुख मार्गांचा विचार करणे गरजेचे आहे. त्यातील पहिला धोपटमार्ग, जो सर्वसाधारणपणे बहुतांश स्वीकारतात तो म्हणजे नोकरी. ठराविक शिक्षण व कौशल्य संपादन केल्यानंतर आपण एखाद्या आस्थापनेच्या विकासात हातभार लावण्यासाठी तेथील उपलब्ध संधी ही नोकरी स्वरूपात स्वीकारतो. त्या आस्थापनाकडून पगार रूपात त्याचा यथायोग्य मोबदलाही मिळतो. ठराविक पगारासाठी स्वीकारलेला नोकरीचा हा पर्याय हे बहुतांश लोकांच्या रोजगाराचे साधन आहे.


‘स्मार्ट उद्योजक’चे आजीव वर्गणीदार होऊन आमच्याशी एक दीर्घकालीन नाते जोडा व UNLIMITED लाभ मिळवा.

आजीव वर्गणीदार होण्याचे फायदे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.


रोजगार मिळवण्याचे दुसरे साधन म्हणजे ‘स्वयंरोजगार’ दुसर्‍या आस्थापनाकडून पगाराची अपेक्षा न ठेवता स्वतः स्वतःचा रोजगार निर्माण करणे हे स्वयंरोजगारात अपेक्षित आहे. स्वयंरोजगाराची वाट निवडून त्यावर मार्गक्रमण करणे म्हणजे उद्योजकता. पुढे हाच उद्योजक स्वतःसोबत इतर लोकांसाठीही रोजगारनिर्मिती करत असतो.

मी कोणता व्यवसाय सुरू करू असा प्रश्न ज्यांना असेल त्यांनी प्रथम मी का व्यवसाय सुरू करू या प्रश्नाचं उत्तर शोधलं पाहिजे. रोजगार व स्वयंरोजगार या दोन्ही मार्गांना स्वतःचे महत्त्व आहे. यातील एक चूक व एक बरोबर असे काही नसते. विषय असतो तुमच्या आवडी व निवडीचा.

या दोनपैकी एकदा जर का तुम्ही स्वयंरोजगार हा मार्ग निवडला की तुम्हाला उद्योजकीय मानसिकता तयार करायला हवी. उद्योजकीय मानसिकता तयार झाली की उपलब्ध संधी तुम्हाला सहज दिसू शकतील व या संधीचे सोने कसे करायचे हेही तुम्हाला कोणाला विचारावे लागणार नाही.

शैलेश राजूपत

FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: