ज्या ज्या ठिकाणी खाद्यपदार्थ बनवले जातात किंवा त्यांची विक्री केली जाते किंवा साठवले जाते त्या सर्व व्यवसायांना फुड परवाना म्हणजेच FSSAI लायसन्स बंधनकारक आहे.
FSSAI भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण ही संस्था आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांची स्वायत्त संस्था आहे. अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ हे भारतात अन्न सुरक्षा आणि नियमन संबंधित मजबुती नियम आहे ज्या अंतर्गत FSSAI स्थापन करण्यात आले आहे.
FSSAI परवाना किंवा FSSAI नोंदणी कोणत्याही अन्न व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आवश्यक आहे. FSSAI नोंदणी सर्व खाद्यपदार्थ संबंधित व्यवसायांसाठी आवश्यक आहे. एक चौदा अंकी नोंदणी/परवाना क्रमांक पॅकिंग छापलेले किंवा व्यवसायाच्या आवारात प्रदर्शित करणे आवश्यक आहे.
FSSAI परवाना कोणासाठी आवश्यक आहे?
डेअरी युनिट, तेल प्रोसेसिंग युनिट, कत्तलखाणा मांस प्रक्रिया युनिट, Relabellers आणि Re-packers, प्रत्येक Manufacturer किंवा अन्न प्रक्रिया युनिट, स्टोरेज यूनिट, घाऊक विक्रेता, किरकोळ विक्रेता, वितरक, पुरवठादार, ढाबा, खानावळ,क्लब/कँटीन, अन्न कॅटरिंग, हॉटेल, उपहारगृह, Restaurant, खाद्यपदार्थ दुध वाहतुक, Marketer, फेरीवाला, निर्यातकार आणि आयातकार, E commerce / Online Food Delivery, फास्ट फूड, चायनीज सेंटर.
FSSAI परवाना फायदे काय आहेत?
- अन्न व्यवसाय अनेक कायदेशीर लाभ मिळू शकतात.
- ग्राहक जागरूकता निर्माण होते.
- आपण FSSAI लोगो ग्राहकांना आपापसांत एक सदिच्छा तयार करू शकता.
- अन्न सुरक्षा सुविधा
- संशोधन आणि विकास क्षेत्रातील सुरक्षा राखण्यासाठी जबाबदार आहे.
- व्यवसाय विस्तार एक मोठी संधी
FSSAI परवाना प्रकार
FSSAI नोंदणी :
ज्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल १२ लाखांपेक्षा कमी आहे त्यांना FSSAI नोंदणी आवश्यक आहे.
FSSAI State License:
- ज्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल १२ लाखांपेक्षा जास्त आणि २० कोटीपर्यंत आहे त्यांना FSSAI State License आवश्यक आहे.
- उत्पादन युनिट दररोज दोन टनपर्यंत क्षमतेचे, दुग्धव्यवसाय युनिट दररोज ५० हजार लिटर
- 3 स्टार तारांकित हॉटेल्स आणि वरील, repackers आणि relebelling युनिट, क्लब उपाहारगृहे, सर्व कॅटरिंग व्यवसाय हे उलाढाल कशीही असली तरी राज्य परवान्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
FSSAI Central License :
- ज्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल २० कोटीपेक्षा जास्त आहे त्यांना FSSAI Central License आवश्यक.
- निर्यातकार आणि आयातकार आणि E-commerce यांना FSSAI Central License अनिवार्य.
FSSAI परवान्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
Basic नोंदणी प्रमाणपत्र – आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, पत्याचा पुरावा (विजेचं बिल किंवा भाड्याचा करार)
FSSAI State/Central License – आधार कार्ड/पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, पत्याचा पुरावा (विजेचं बिल किंवा भाड्याचा करार), पाणी तपासणी अहवाल (for Manufacturer and Hotel Restaurant), अन्न वर्ग यादी,उपकरणे यादी, युनिटचा फोटो, ब्लू प्रिंट (For Manufacturer processor only), इतर (व्यवसायानुसार)
FSSAI परवान्याची वैधता
एक ते पाच वर्षांसाठी अर्ज करू शकता. त्यानंतर नुतनीकरण करणे.
FSSAI नुतनीकरण
- FSSAI फूड लायसन्सच्या उशीरा नूतनीकरणाची फी टाळण्यासाठी परवान्याची मुदत संपण्याच्या ३० दिवसांपूर्वी नूतनीकरण करणे आवश्यक आहे. मुदत संपण्याच्या ३० दिवस आधी नूतनीकरण केले नाही तर मुदतीच्या संपण्याच्या दिवसापर्यंत ₹१०० प्रती दिन दंड म्हणून भरावे लागतात.
- मुदत संपल्यानंतर FSSAI नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरण करता येत नाही.
- मुदत संपल्यानंतर फुड लायसन्ससाठी नवीन अर्ज करावा लागतो याची नोंद घ्यावी.
FSSAI नोंदणी किंवा परवान्यासाठी कसा अर्ज करावा?
- एफएसएसएएआय परवाना नोंदणी प्रक्रियेचा खाली उल्लेख केला आहे FSSAI च्या अधिकृत वेबसाईटवर.
- नोंदणीसाठी आम्हाला 9511760650 या क्रमांकावर Whatsapp करा.
- आम्ही तुम्हाला तुमच्या व्यवसायनुसार तुम्हाला FSSAI नोंदणी प्रकार आंणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रे यासाठी मार्गदर्शन करू.
- दिलेल्या 9511760650 या Whatsapp क्रमांकवर किंवा आमच्या ई-मेल वर तुमची व्यवसायिक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे पाठवा.
- आम्ही तुमचा अर्ज FSSAI च्या अधिकृत वेबसाईटवर तुमचा अर्ज दाखल करू.
- तुम्हाला दोन दिवसांमधे तुम्हाला FSSAI पावती मिळेल.
- FSSAI प्रमाणपत्र किंवा परवाना तुम्हाला तुमच्या WhatsApp किंवा ई-मेल वर मिळेल.
- (FSSAI नोंदणी साठी १० शासकीय कामाचे दिवस)
- (FSSAI परवाना साठी ३०-४५ शासकीय कामाचे दिवस)
– Shriram Bankar
WhatsApp: 9511760650
Email: shriconsultant7@gmail.com
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.