Advertisement
प्रायोजित

गच्चीवरची बाग

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


गच्चीवरची बाग हा आता विविध वृत्तपत्रांतून व सोशल मीडियावर ओळखीचा व परवलीचा शब्द होताना दिसून येत आहे. नावातूनच उपक्रमाचे महत्त्व व आपलेपण पोहोचताना दिसू लागले आहे. वाढत्या शहरीकरणाचे सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक, पर्यावरणीय तोटे व आरोग्य, शेती व मनोकायिक आजाराविषयीचे प्रश्‍न जसे जसे समोर येऊ लागले आहेत तसे तसे या विषयाची गरज लक्षात येऊ लागली आहे.

गच्चीवरची बाग म्हणजे…

शहरातील उपलब्ध जागा (जसे बाल्कनी, टेरेस, खिडकी, गॅलरी), उपलब्ध वस्तू (जसे प्लॅस्टिक कापड, बादल्या, टब, गोणपाट, शीतपेयाच्या बाटल्या, कुंड्या, तेलाचे डबे) व उपलब्ध नैसर्गिक, टाकाऊ संसाधने (जसे नारळाच्या शेंड्या, उसाचे चिपाड, पालापाचोळा, किचन वेस्ट) यांचा तंत्रशुद्ध पद्धतीने वापर करून आरोग्यदायी असा रसायनमुक्त भाजीपाला निर्माण करणे.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

या क्षेत्रातील फायदे लक्षात घेत आता मोठ्या कंपन्या, नर्सरीज व परदेशी कंपन्या आर्थिक फायद्यासाठी लक्ष न घालतील तर नवलच. शेतकरी जगवण्यासाठी हरित (खरे तर रासायनिक) क्रांती आणली गेली. कंपन्या मोठ्या झाल्या. शेतकरी आहे तेथेच राहिला. सर्व काही बाजाराधारित झाले. किमान सिटी फार्मिंग तरी या बाजारीकरणापासून दूर राहावे यासाठी ‘गच्चीवरची बाग’ प्रयत्नशील आहे.

आता लोक यात सहभागी होताना दिसत आहेत, कारण निसर्ग हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे.

ही आवड इतकी आदिम आहे जी निसर्गाशी घट्ट नातं सांगणारी आहे. पानं, फुलं, झाडे, जंगल यांची आवड नसलेला एकही सापडणार नाही, किंबहुना याच्याशिवाय आपण जगूच शकणार नाही. त्यामुळे ‘आवड तिथे सवड’ या म्हणीप्रमाणे लोक बागेसाठी वेळ देतात. तसेच पर्यावरणाचे विविधांगांनी रक्षण होत असल्यामुळे पर्यावरणप्रेमी यात सहभागी होताना दिसत आहेत.

आपल्या छोट्याशा कृतीतून, रोजच्या कामातून थोडा वेळ देण्यातून सेंद्रिय अन्ननिर्मिती होते. तसेच विविध झाडांचा, त्यांच्या वाढीच्या टप्प्याविषयी सहज अभ्यास होतो. तसेच हे तंत्र खर्च कमी फायदाच जास्त असा अष्टांगी फायदा देणारा आहे. त्यामुळे हा उपक्रम प्रत्येकाला हवाहवासा वाटतो.

‘गच्चीवरची बाग’चे तंत्र म्हणजे ‘झिरो मेन्टेनन्स व झिरो बजेट’ असे आहे. तुम्हाला फक्त तुमचा थोडा वेळ व थोडे कौशल्य वापरावयाचे आहे. बाकी सर्व काम हा निसर्ग करतो, किंबहुना निसर्गातील घटक (ऊन, वारा, पाऊस, माती, गांडूळ) करत असतात. आपण फक्त यांच्यासाठी जागा किंवा एक व्यवस्था करून द्यावयाची व वाट पाहायची.

गच्चीवरची बाग केवळ बागनिर्मितीचा आनंद देत नाही, तर ती एक प्रकारे सेंद्रिय शेतीची छोटीशी लॅब आहे आणि येणारा काळ हा रसायनमुक्त अन्ननिर्मितीचाच असेल यात शंका नाही, किंबहुना ती काळाची गरज आहे. तसेच ‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत स्वच्छ भारताचे आपण स्वप्न पाहत आहोत; पण यातील महत्त्वाची मेख कुणाच्या लक्षात येत नाही. ती म्हणजे स्वच्छता.

स्वच्छता म्हणजे आपले अंगण, परिसर साफ करायचा व जमा झालेला कचरा दुसर्‍यांच्या अंगणात जाऊन टाकायचा म्हणजे डंपिंग ग्रांऊडवर. अशी स्वच्छता गरजेची तर आहेच, पण त्याचा खरा मथितार्थ लक्षात घेतला तर…स…फा…ई… (सब चिजों का फायदेमंद इस्तेमाल) असा घ्यायला हवा. व त्याची सुरुवात ‘गच्चीवरची बाग’ या तंत्राद्वारे करता येईल.

या तंत्रात आपली माती आपण स्वत:च तयार करू शकतो. त्यासाठी परिसरातील पालापाचोळा, किचन वेस्ट व्यवस्थापनाच्या विविध व सोप्या पद्धती विकसित केल्या जात आहेत. तसेच बाजारातून कोणतेही खत विकत आणण्याची गरज नाही. असा हा उपक्रम आपल्या सर्वांच्याच व पर्यावरण रक्षणासाठी उपयोगी व पथदर्शी आहे.

– संदीप चव्हाण
8087475242

स्मार्ट उद्योजक पोर्टलवर तुमची यशोगाथा मांडण्यासाठी येथे क्लिक करा

Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!